रजनीकांत हा महामूर्ख आणि अडाणी माणूस आहे

सुब्रमण्यम स्वामी

आग्रा: 'रजनीकांत हा महामूर्ख आणि आडाणी माणूस आहे. या आडाण्याला राजकारणात आणण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत,' अशा शब्दांत सुब्रमण्यम स्वामींनी रजनीकांत यांची खिल्ली उडवली आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर तेथील राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला जोर आला आहे. तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय असलेल्या रजनीकांत यांना आपल्याकडं खेचण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. तामिळनाडूतीलच असलेल्या स्वामी यांना मात्र भाजपची ही भूमिका रुचली नसल्याचं दिसतंय. त्यामुळंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्व संवाद केंद्रातर्फे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली. 'रजनीकांत हा आडाणी माणूस आहे. भारत आणि पाकिस्तानची राज्यघटना त्याच्यासमोर ठेवली तर कुठली राज्यघटना कुठल्या देशाची आहे, हेही त्याला सांगता येणार नाही,' असं स्वामी म्हणाले. स्वामी यांच्या या वक्तव्यामुळं रजनीकांत यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न फसण्याची चिन्हं आहेत.

 


Social Sharing

About us

Feed back

Careers

Advertise with us

Contact us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.