सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील

2018-01-13

सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील

मुंबई : एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.  महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले? गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही असंही ते बोलले आहेत. 
भारतीय जनता पक्षाच्या दोन पुढाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्या दोन्ही नेत्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही हे आम्ही इथे नम्रपणे सांगू इच्छितो. शिवसेना सत्तेत राहून सरकारवर टीका करते असे ज्यांना वाटते त्यांनी भाजपच्या मंत्र्यांची वक्तव्ये गांभीर्याने घ्यायला हवीत. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर व गिरीश बापट यांनी गेल्या चारेक दिवसांत गमतीशीर विधाने करून लोकांचे मनोरंजन केले आहे अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  विकासकामांसाठी पैसा नाही, असे राज्याचे एक मंत्री सांगतात, पण कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन असेल नाहीतर समृद्धी महामार्ग, कर्जबाजारी होऊन सावकारी करण्याचा प्रकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या विनाशाकडे नेत आहे काय? मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांच्या घोषणा रोज सुरू आहेत व त्या घोषणांचा पाऊस पाहिल्यावर राज्याची तिजोरी भरभरून वाहते आहे असेच वाटते, पण फडणवीस सरकारचे मंत्री मात्र काही वेगळेच सांगत आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
सरकारातील आणखी एक मंत्री गिरीश बापट यांनी तर नवाच फटाका फोडला. कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी बजावले आहे, ‘‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, नंतरचा काही भरवसा नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे.’’ यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सारवासारव अशी की, बापट यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचे वक्तव्य हे कार्यकर्त्यांत प्रेरणा आणि जोश निर्माण करण्यासाठी होते. नव्या राजवटीत मराठी भाषेचे वाप्रचार, म्हणी व शब्दांचे अर्थही बदलले जात आहेत. हे असे बोलणे म्हणजे जोश निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी असेल तर विषयच संपला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 
बापट यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. आता त्यात आणखी एका वादाची भर त्यांनी टाकली. काय मागायचे असेल तर आताच मागा असे बापट म्हणतात. अर्थात मागून उपयोग नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जनता मागेल ते द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसेच देत नाहीत असे जर मंत्री असलेले बबनराव लोणीकरच म्हणत असतील तर मंत्र्यांचे बोलणे तरी किती मनावर घ्यायचे, हा प्रश्न निर्माण होतो. हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.