टी-20 मध्ये अंपायर्सची गंभीर चूक

2018-01-12

टी-20 मध्ये अंपायर्सची गंभीर चूक

विशाखापट्टणम : कर्नाटकच्या डावादरम्यान अंपायर्सनी केलेली चूक हैदराबादच्या संघाला चांगलीच महागात पडली. या चूकीमुळे हैदराबादला अवघ्या दोन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटकने हैदराबादच्या संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. 
अंपायरच्या चुकीमुळे कर्नाटकच्या धावसंख्येत दोन धावांची भर पडली आणि  अखेर दोन धावांनीच हैदराबादचा पराभव झाला. त्यानंतर हैदराबादचे खेळाडू चांगलेच नाराज झाले, अखेरीस धावसंख्येत बदल केल्यामुळेच पराभव झाल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. दुस-या षटकातील चौथ्या चेंडूवर हैदराबादचा खेळाडू मेहंदी हसनने सीमा रेषेवर चेंडू अडवला.  हसनच्या पायाने सीमा रेषेला स्पर्ष केला होता.  पण त्यावेळी पंचांनी रिप्ले पाहण्याची तसदी न घेता केवळ दोन धावा दिल्या.  
या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना करुण नायरच्या 77 आणि गौतम गंभीरच्या 57 धावांच्या खेळीच्या बळावर 20 षटकांमध्ये 5 बाद 203 पर्यंत मजल मारली. पण हैदराबादची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी अंपायर उल्हास गंधे आणि अभिजीत देशमुख यांनी कर्नाटकच्या धावसंख्येत दोन धावांची वाढ केली. म्हणजे 5 बाद 205 अशी नवी धावसंख्या कर्नाटकची झाली. हैदराबादने अखेरच्या षटकापर्यंत पराभव स्वीकारला नाही, मात्र त्यांना बरोबर 9 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली, आणि अवघ्या दोन धावांनी त्यांचा पराभव झाला.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

क्रीडा बातम्या

.
डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणा-या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.

.
भारतीय संघाने सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव करत मालिका ५-१ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवत २०४ धावांचं लक्ष्य भारताला दिलं. प्रत्युत्तरात भारताने फक्त ३२.१ षटकांत २ गडी गमवत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.

.
केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

.
सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या एकेरी आण दुहेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने भारताने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने हाँगकाँगला ३-२ अशी मात दिली. सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेचे नेतृत्व सिंधूकडे सोपवण्यात आले असून नेतृत्वाला साजेशा खेळ करत सिंधूने भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.