नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी

2018-01-12

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी

मुंबई : मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही.त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून त्यांनी  नौदलाची  माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन न देण्याची भाषा ही सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेली आहे त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणा-या तरंगत्या हॉटेलसाठी नितीन गडकरी एवढे आग्रही का आहेत? गडकरींना या तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे?याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून भाजपाचा राष्ट्रवाद हा भोंगळ असून तो खाजगी व्यापाऱ्यांकरीता लागू होत नाही असा टोला सावंत यांनी लगावला. काँग्रेस पक्षाला आणि भारताच्या सर्व नागरिकांना भारतीय नौदलाचा अभिमान आहे असेही सावंत म्हणाले.
२६/११च्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. या अगोदरही मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षिण मुंबईतील हेलीपॅडसारख्या व पुनर्निमाण प्रकल्पांना भारतीय नौदलाने आक्षेप घेतला होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. हे समुद्रमार्गे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्पष्ट झालेले आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबईत नौदल असणे आवश्यक आहे. नौदलाला मुंबईबाहेर काढून, उद्दाम भाषा वापरून, नौदल अधिका-यांचे मानसिक खच्चीकरण करुन केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नितीन गडकरींना पाकिस्तानला मदत करायची आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.