अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रवर्ग

2018-01-11

अनाथ मुलांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रवर्ग

मुंबई : राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
       मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे बुधवारी वितरण करण्यात आले. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांना सरकार दिलासा देणार अशी घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, काही दिवसांपूर्वी एक मुलगी मला भेटायला आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ती उत्तीर्ण झाली असली तरी खुल्या वर्गात नोकरी मिळण्याकरिता तिला एकच गुण कमी पडला. जातीचे किंवा अन्य कोणतेही प्रमाणपत्रही नसल्याने तिला नोकरी मिळाली नाही. तिल्या खुल्या प्रवर्गात स्थान द्यायचे की अनुसूचित जाती आणि जमातीअंतर्गत नोकरी द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. अनाथ मुलांना त्यांच्या आई-वडिलांची माहिती नसल्याने त्यांच्यासाठी विशेष प्रवर्गाची आवश्यकता असल्याचे मला वाटत होते. मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जानेवारी 2018 चा लोकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशील ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ हा पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाशित करण्यात आला आहे. या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

नुकताच प्रदर्शित झालेल्या बारायण चित्रपटात संभाजीराजेंच्या गंभीर प्रसंगाचे भावनिक भांडवल करत राजेशिर्के घराण्याची बदनामी केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यांनी केलेला हा खोडसाळपण संतापजनक व निषेधार्ह असून या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा सुहास आबासाहेब राजेशिर्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 21 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत कराड येथील न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव वर्षा पारगावकर यांनी दिली आहे.

बांधकाम केलेल्या घराची नोंद करून उतारा देण्यासाठी व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी 1 हजार 500 रूपयांची लाच स्विकारताना अंबवडे बुद्रक, ता. साताराच्या ग्रामसेवक सचिन भरतराव गायकवाड (वय 37) याला लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

नोकरी बातम्या

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.


.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, सातारा येथे दि. 11 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सचिन जाधव यांनी दिली आहे.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे.

.
भारतीय वायू सेना दलामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारुन (ग्रुप एव्स ट्रेड व ग्रुप वाय ट्रेड ) भरती होणार आहे. ग्रुप एक्स ट्रेड 10 +2 पास गणित,भौतिकशास्त्र, इंग्रजी विषयास 50 टक्के गुण किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिीकी डिप्लोमा कोर्स 50 टक्के गुण. जर डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय नसेल तर 10 वी मध्ये विषयात 50 टक्के गुण आवश्यक. तर ग्रुप वाय ट्रेड:-10+2पास,प्रत्येक विषयात 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.