भारताची स्किइंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी

2018-01-10

भारताची स्किइंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी

एरझुरुम  : भारताच्या आंचल ठाकुरने इतिहास रचाला. तिने आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. याचबरोबर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे. आंचल ठाकुर हिमाचल प्रदेशची खेळाडू आहे. 
                मनालीमधील २१ वर्षीय आंचलने तुर्कस्तानमधील एरझुरुममध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तिने स्ललॉम रेस प्रकारात ही कामगिरी केली. या ऐतिहासिक विजयानंतर आंचल म्हणाली ‘मी बरेच महिने सराव करत होते. त्याचाच फायदा झाला. मी सुरुवात चांगली केली त्यामुळे मला आघाडी कायम राखता आली.’ 
               या ऐतिहासिक विजयावर भारतातून आंचलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आंचल ठाकुरचे अभिनंदन केले आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत असलेले मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . ज्यांच्यावर हल्ला झाला त्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मात्र अटक करण्यात आली आहे . त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे .भिडे एकबोते जोडगोळीला अटक केल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होणार नाहि.त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .

सुरुचि राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून यामध्ये आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहाजणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनगाव ते खिंडवाडी ता.सातारा रस्त्यावर दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा.चिलेवाडी ता.कोरेगाव सध्या रा.आळजापूर ता.फलटण) हा युवक शुक्रवारी झालेल्या अपघातात ठार झाला.

क्रीडा बातम्या

.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची उपशाखा असणार्‍या सनातन संस्थेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचे पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.

.
चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी दिलीप कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले.

.
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत

.
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पापुआ न्यू गिनीवर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील कर्णधार पृथ्वी शॉने सुपर कामगिरी केली


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.