भारताचा विकासदर ७.३ टक्के राहणार

2018-01-10

भारताचा विकासदर ७.३ टक्के राहणार

नवी दिल्ली : अहवालानुसार २०१७ मध्ये चीन ६.८ टक्के या वेगाने पुढे जात होता. भारताच्या तुलनेत हा वेग केवळ ०.१ टक्क्यांनी अधिक आहे.केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकताच भारताचा विकास दर घटण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर मोदी सरकारवर देशभरातून टीका करण्यात आली. 
आता जागतिक बँकेने केंद्र सरकारला दिलासा देणारे वृत्त दिले आहे. सरकारकडून करण्यात येत असलेल्या व्यापक सुधारणा व उपायांमुळे जगातील विकसनशील अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत भारतामध्ये विकासाची अधिक क्षमता असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेने बुधवारी २०१८ साठी भारताचा विकासाचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नव्हे तर बँकेच्या मते, पुढील दोन वर्षे भारत ७.५ टक्क्यांच्या दराने पुढे जाऊ शकतो. जागतिक बँकेने २०१८ ग्लोबल इकानॉमिक प्रॉस्पेक्ट प्रकाशित केले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सुरूवातीला बसलेल्या धक्क्यांमुळे २०१७ मध्ये भारताचा विकास दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.
जागतिक बँकेच्या डेव्हलपमेंट प्रॉस्पेक्ट्स ग्रूपचे संचालक आयहन कोसे म्हणाले की, येत्या दशकात उभरत्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताच्या विकासाचा उच्च दर असेल. छोट्या कालावधीच्या आकड्यांवर त्यांचं लक्ष केंद्रित नाही. एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेत विशाल क्षमता असल्याचे ते म्हणाले.मंदगती प्राप्त झालेल्या चीन अर्थव्यवस्थेशी तुलना करताना भारत विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जात असल्याचे ते म्हणाले. मागील तीन वर्षांतील भारताच्या विकासाचे आकडे चांगले राहिले आहेत. अहवालानुसार २०१७ मध्ये चीन ६.८ टक्के या वेगाने पुढे जात होता. भारताच्या तुलनेत हा वेग केवळ ०.१ टक्क्यांनी अधिक आहे. २०१८ मध्ये चीनच्या विकासाचा अंदाजे दर हा ६.४ टक्के राहील. येत्या दोन वर्षांत हा अंदाज आणखी घटून क्रमश: ६.३ आणि ६.२ टक्के राहील.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

देश विदेश बातम्या

.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कारवाई केली असून, यामधील काही कारवाया 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होत्या. मात्र सध्या भारतीय लष्कर कोणताही गवगवा न करता अत्यंत शांतपणे सीमेपार जात सर्जिकल स्ट्राईक करत आहे. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान नियंत्रण रेषेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही कारवाई नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आल्याचंच जगभरातून सांगण्यात येत होतं.

.
सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सकाळी बारामुल्ला परिसरातील पट्टन भागात जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

.
पाकिस्तान नव्या अणुबॉम्मची निर्मिती करत असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने दिला आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. पाकिस्तान भारतावर मोठा अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १७ शाळकरी विद्यार्थी ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

.
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु आहे. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, 28 तासाहून अधिक काळानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरुच आहे. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.