बाबासाहेबांच्या श्रेष्ठत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जिग्नेश मेवाणीचा डाव महाराष्ट्रात उधळून लावा :खा.अमर साबळे

2018-01-08

बाबासाहेबांच्या श्रेष्ठत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जिग्नेश मेवाणीचा डाव महाराष्ट्रात उधळून लावा :खा.अमर साबळे

पुणे : बाबासाहेबांच्या दृष्टिकोनापेक्षा माझा दृष्टीकोन वेगळा असू शकतो तसेच बाबासाहेबांचा शब्द म्हणजे ‘पत्थर की लकीर नहीं है’ असे वक्तव्य करून बाबासाहेबांच्या श्रेष्ठत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या व लाल सलाम करणाऱ्या जिग्नेश मेवाणीचा लाल डाव महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी उधळून लावावा असे आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड येथे केले.
गुजरातचे निवनर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी आंध्रप्रदेश येथील एका जाहीर कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी हे धक्कादायक विधान केले होते. या विधानाचा राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी खरपूस समाचार घेतला.
यावेळी खासदार साबळे म्हणाले की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले, माता-भगिनींच्या उद्धारासाठी हिंदू कोड बिल दिले, देशाला संसदीय लोकशाही दिली, मजुरांसाठी मानवतावादी कायदे केले व शेवटी विश्वाला शांतीचा व अहिंसेचा मार्ग दाखविणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातून दलितांचा उद्धार केला. असे बाबासाहेब हे आम्हा सर्व अनुयायांचा श्वास आहे. त्यामुळे कोणताही आंबेडकरप्रेमी बाबासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊ शकत नाही. मात्र आमदार झाल्यानंतर शिंगे फुटलेला जिग्नेश मेवानी हा त्यांच्याविषयी बेताल वक्तव्य करत आहे ही बाब संतापजनक आहे. अशा मेवाणीला सोबत घेत महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत हा महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर प्रेमींचा अपमान आहे.
बाबासाहेबांच्या विचारांना नाकारणारा जिग्नेश मेवानी व वारंवार देशद्रोही विधाने करणारा उमर खालिद या देशविरोधी व आंबेडकर चळवळीविरोधातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात बाबासाहेबांचे नाव घेत त्यांच्याच विचारांना विरोध करत, लोकशाहीचा द्रोह करत हे राजकारण पुढे जाणार असेल तर देशात अराजक माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार साबळे यांनी यावेळी दिला.
देशातील आंबेडकर प्रेमींनी व भगवान गौतम बुद्धांच्या धम्मावर विश्वास असणाऱ्या नागरिकांनी बाबासाहेबांनी देशाला दिलेली लोकशाही प्रणाली मान्य नसणाऱ्या अशा अविवेकी शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहनही खासदार साबळे यांनी शेवटी केले.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.