भारतीय संस्कृतीसाठी स्वामी प्रभूपाद यांची मोलाची भूमिका – खासदार अमर साबळे

2018-01-08

भारतीय संस्कृतीसाठी स्वामी प्रभूपाद यांची मोलाची भूमिका – खासदार अमर साबळे

पुणे : आपल्या भारत देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचा जगभर प्रचार आणि प्रसार करून ही संस्कृती विश्ववंदनीय करण्यासाठी स्वामी प्रभूपाद यांची मोलाची भूमिका असून त्यांचे कार्य अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.इस्कॉन, पुणे यांच्यावतीने श्री.श्री. जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक महामहोत्सवाचे आयोजन पुणे येथील न्यु इंग्लिश स्कुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवाला शुभेच्छा देताना राज्यसभा खासदार श्री. अमरजी साबळे बोलत होते.
          यावेळी लोकनाथ प्रभुजी महाराज यांच्याहस्ते खासदार साबळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रबोधानंद सरस्वती महाराज, राधेश्याम प्रभू, श्वेतदीप प्रभू, राज्यमंत्री दिलीप कांबळे व पुणे महानगरपालिकेचे शहर सुधारणा समिती सभापती लडकत हे मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, मनुष्याचे जेंव्हा वय वाढत जाते तेंव्हा त्याची शाररिक शक्ती कमी होते व मनुष्य निवृत्तीच्या दिशेने मार्गक्रमण करतो. परंतु वयाच्या 70व्या वर्षी प्रभूपाद स्वामींनी भारतीय संस्कृती विश्वापर्यंत पोहचविण्यासाठी जे कार्य केले आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
परमार्थिक संस्काराच्या माध्यमातून देशातील युवकांचे चारित्र्य निर्माण करणे व देश सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच देशाची संस्कृती विश्वगुरूपदी स्थानापन्न करण्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भगवतगीता व श्रीमत भागवतात सांगितलेली विचारधारा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणे आपले आद्यकर्तव्य असून आपण स्वामी प्रभूपादांच्या आशिर्वादाने आपण हे कर्तव्य नक्की पार पाडू असा आशावाद खासदार साबळे यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान, खासदार साबळे यांच्या हस्ते नारळ वाढवून रथयात्रेची सुरवात करण्यात आली. यावेळी त्यांनी रथाचा दोरखंड ओढून व रथाचा रस्ता स्वच्छ करून आपली सेवा दिली.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.