पोलिसांनीच केली ‘एमपीएससी’ परीक्षेत कॉपी

2018-01-07

पोलिसांनीच केली ‘एमपीएससी’ परीक्षेत कॉपी

पुणे :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २४ डिसेंबरला घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेत पोलिसांनीच ‘मास कॉपी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
      राज्यातील पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर शहरातील परीक्षा केंद्रावर झालेल्या या परीक्षेत काही ‘पोलिस’ परीक्षार्थींनी समूहचर्चा करून तर काहींनी थेट एकमेकांच्या बाकावर जाऊन पेपर सोडविल्याचा आरोप पोलिसांनीच केला आहे. या संपूर्ण प्रकाराची तक्रार देखील पोलिसांनी आयोगाकडे केली आहे. मात्र, आयोगाने तक्रारींकडे दुर्लक्ष केले आहे.  एमपीएसीने पुणे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर येथील परीक्षा केंद्रावर २४ डिसेंबरला ३२२ पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा घेतली. या परीक्षेची पूर्व परीक्षा १७ सप्टेंबर रोजी पार पडली. या परीक्षेला पोलिस दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेले २५ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी बसले होते. तर, मुख्य परीक्षेत चार हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थी होते. परीक्षार्थींनी पेपर सुरू झाल्यावर अर्ध्या तासानंतर कठीण प्रश्न हे ‘ग्रुप डिसक्शन’द्वारे सोडविले. शेवटची १५ ते २० मिनिटे चर्चा करून २० पेक्षा अधिक अवघड प्रश्न सोडविले.
   परीक्षेला बसणारे सर्व पोलिस खात्यातील परीक्षार्थी असल्याने सुपरवायझरनेदेखील त्यांना गैरप्रकार थांबविण्याच्या सूचना दिल्या नाहीत, असे कळते. या परीक्षेच्या दोन्ही पेपरच्या उत्तरतालिका एमपीएससीने प्रकाशित केल्या आहेत. या उत्तरतालिकेच्या तपासणीनुसार मासकॉपी करणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रामाणिकपणे पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थ्यांपेक्षा जादा गुण मिळाले आहे. काही परीक्षार्थ्यांना ३०० पैकी २५० पेक्षा अधिक गुण मिळत असल्याची माहिती आहे. या परीक्षेचा निकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला नसल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. औरंगाबाद आणि नागपूरच्या केंद्रावर देखील असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी एमपीएससीकडे पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.