सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद

2018-01-05

सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले असून एक पोलीस गंभीररित्या जखमी झाला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता. 
गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या हल्ल्याची आठवण ताजी व्हावी, असा हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला. सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. 
अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला. काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम उघडली असून त्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत पण त्याचवेळी दहशतवादीसुद्धा सुरक्षापथकांना टार्गेट करत आहेत. 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

देश विदेश बातम्या

.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कारवाई केली असून, यामधील काही कारवाया 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होत्या. मात्र सध्या भारतीय लष्कर कोणताही गवगवा न करता अत्यंत शांतपणे सीमेपार जात सर्जिकल स्ट्राईक करत आहे. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान नियंत्रण रेषेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही कारवाई नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आल्याचंच जगभरातून सांगण्यात येत होतं.

.
सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सकाळी बारामुल्ला परिसरातील पट्टन भागात जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

.
पाकिस्तान नव्या अणुबॉम्मची निर्मिती करत असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने दिला आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. पाकिस्तान भारतावर मोठा अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १७ शाळकरी विद्यार्थी ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

.
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु आहे. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, 28 तासाहून अधिक काळानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरुच आहे. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.