70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार

2018-01-05

70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार

मुंबई : 2018 हे वर्ष एसटी परिवहन मंडळासाठी परिवर्तनाचं वर्ष ठरणार आहे. सत्तर वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषणा केली.
          6 जानेवारी 2018 रोजी मुंबई सेंट्रलमधल्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या 31 विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे. यावेळी नाविन्यपूर्ण योजनांचं सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.गेल्या 70 वर्षात एसटीच्या गणवेशाबाबत कोणीच गांभीर्याने विचार केला नव्हता. एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिलं जायचं. ते कापड पसंत 'न' पडल्यामुळे कर्मचारी आपल्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करुन गणवेश स्वतः शिवून घेत.
        हे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिले, तर नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता? हे ओळखणे अवघड होत असे. साहजिकच एकाच पदावर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्याच्या गणवेशामध्ये रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्य दिसून यायचं. अर्थात यातून गणवेशाची एकसंधता निघून जाते, असं रावते म्हणाले.रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मंडली. केवळ संकल्पना मांडून ते थांबले नाहीत, तर केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या 'राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश 'डिझाईन' तयार करण्यासाठी पाचारण केलं.

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये उरळी कांचन येथील आई आणि मुलाचा समावेश आहे.

.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांना अखेर दिल्लीत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीत ही कारवाई केली. डीएसके यांना दिल्लीतील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आता त्यांना पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येईल.

.
शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. त्याचा खिशात सूसाईड नोट सापडली असून कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य करीत असल्याचे त्यात म्हटले आहे.

.
बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

.
निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ नक्कीच मिळत असते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार अमर साबळे हे आहेत. त्यांच्या या पक्षनिष्ठेच्या बळावर पिंपरी चिंचवड शहरातील पहिलं मंत्रिपद त्यांना मिळू शकते, असे भाकीत खासदार ए. टी. नाना पाटील यांनी वर्तवले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.