प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल

2018-01-04

प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे.  यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. 
       आयोगाने ‘द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन रुल्स आॅफ प्रोसिजर २०१४’ यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार निवडीचा नियम बदलण्यात आला असून, ते राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. पूर्वी एकूण पदांच्या ८ आणि १० पट या निकषानुसार परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जात होते. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निकष मागील वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन बदलानुसार प्रवर्गानुसार प्रत्येक पदासाठी १२ पट परीक्षार्थींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार गुणांचा कटआॅफ निश्चित केला जाणार आहे. एखाद्या प्रवर्गातून १२ पट परीक्षार्थी न मिळाल्यास कट आॅफखाली आणला जाईल. तसेच हे परीक्षार्थी त्या प्रवर्गामधील पदांसाठी पात्र ठरतील. सप्टेंबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याविषयी आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, आयोगाकडून घेतल्या जाणाºया बहुतेक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्याचा विचार होता. नवीन निर्णयानुसारप्रत्यक्षात प्रत्येक पदामागे १५ ते १६ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापूर्वी ८ ते १० परीक्षार्थींची निवड केली जात होती.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

नोकरी बातम्या

.
राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, तसेच कर सहायक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षा एकत्रित न घेता स्वतंत्रपणे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रिया कार्यपद्धती ही हायकोर्टाच्या आदेशांचा सरळसरळ अवमान करणारी आहे. त्यामुळे कन्टेंप्ट ऑफ कोर्टअंतर्गत राज्य सरकारवर कारवाई का करू नये, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला दिलेली स्थगिती कायम ठेवली.

.
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

.
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.