कोल्हापूरातील करवीर वाचन मंदिरात अंधांसाठी अब्रार सॉफ्टवेअर

2018-01-04

कोल्हापूरातील करवीर वाचन मंदिरात अंधांसाठी अब्रार सॉफ्टवेअर

कोल्हापूर - करवीर नगर वाचन मंदिरातर्फे वाचकांसाठी नित्य नवे उपक्रम केले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून 2010 मध्ये अंधांसाठी ब्रेल ग्रंथालय विभाग सुरू केला. याबरोबर अंधांसाठी अब्रार नामक सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले.ग्रंथालय विभाग आणि सॉफ्टवेअरचा लाभ अनेक अंध विद्यार्थी, व्यक्ती घेत आहेत. ब्रेल ग्रंथालयात विविध नामवंत लेखकांची पुस्तके, चरित्रे आहेत. या पुस्तकांनी अंध व्यक्तींच्या जीवनात जगण्याची असीम जिद्द निर्माण केली. आठवड्यातून किमान चार ते पाच अंध व्यक्ती या ग्रंथालयात येऊन वाचनाचा आनंद मिळवितात.
              पुणे येथील ब्रेल विभागाच्या संपादिका मीरा बडवे यांनी करवीर नगर वाचन मंदिर संस्थेला ब्रेल भाषेत रूपांतरित केलेल्या 47 पुस्तकांचे 89 खंड पाठवून दिले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या गणेश भक्त मंडळाने संस्थेला अंध विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे अब्रार हे अत्याधुनिक उपकरण भेट दिले. नागपूर येथील सक्षम संस्थेने हे उपकरण विकसित केले आहे. माधव नेत्रपेढीने ते प्रचारात आणले. याबरोबर ब्रेल विभागातील पुस्तकांची यादीही उपलब्ध आहे. यामध्ये 125 पुस्तकांचा समावेश आहे.''  अंजली निगवेकर, संगीता निकम, वसंत सुतार, श्रद्धा धोंगडे, प्रणाली कांबळे, अक्षदा सूर्यवंशी अशा अनेक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. खाली जमीन, वर आकाश, थैलीभर गोष्टी, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे आई समजून घेताना, चाकाची खुर्ची, वीणा गवाणकर यांचे एक होता कार्व्हर, गोष्टी माणसांच्या, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप अन्‌ आम्ही, डॉ. अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग, वाईज अँड अदरवाईज, महाश्‍वेता, पुण्यभूमी भारत अशा पुस्तकांचा लाभ विद्यार्थी घेतात. 
          अब्रार उपकरणामुळे एकावेळी आठ ते दहा विद्यार्थी अभ्यास करू शकतात. अब्रार हे ऑडिओ रेकॉर्डिंगचे मशिन आहे. यात विद्यार्थी कोणतेही व्याख्यान रेकॉर्ड करून ते ऐकू शकतात. हे उपकरण वापरासाठी सोपे आहे. याचा चांगला उपयोग अंध विद्यार्थ्यांना होतो.  ब्रेल ही भाषा नव्हे; तर ती एक डॉटस्‌ नामक सिस्टम आहे. अंध व्यक्ती किंवा डोळ्यांना कमी दिसते, अशा व्यक्ती या डॉटस्‌ना स्पर्श करून पुस्तके वाचू शकतात. याबरोबर शिक्षक, पालक, अन्य लोक जे डोळस आहेत, अशांनाही ब्रेल लिपी वाचता येते. काही लोक म्हणतात, की ब्रेल ही वैश्‍विक भाषा आहे. जगातील अन्य भाषा ब्रेलमधील वर्णमालेचा उपयोग करतात. लुईस ब्रेल यांच्या नावावरून ही लिपी तयार केली.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत असलेले मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . ज्यांच्यावर हल्ला झाला त्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मात्र अटक करण्यात आली आहे . त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे .भिडे एकबोते जोडगोळीला अटक केल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होणार नाहि.त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .

सुरुचि राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून यामध्ये आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहाजणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनगाव ते खिंडवाडी ता.सातारा रस्त्यावर दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा.चिलेवाडी ता.कोरेगाव सध्या रा.आळजापूर ता.फलटण) हा युवक शुक्रवारी झालेल्या अपघातात ठार झाला.

टेक-गॅजेट बातम्या

.
मोबाईलमधील जुने कॉल डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर ते वेळीच शोधणे आणि मिळवणे खूप कठीण काम आहे. आता मोबाईलमध्ये जुने कॉल डिटेल्स शोधायचे असतील तर ही प्रक्रिया सुलभ होण्याची शक्यता आहे. आता mubble app नावाच्या अ‍ॅपमुळे जुने कॉल डिटेल्स शोधणे सहज शक्य होणार आहे. तुम्हाला 7-30 दिवस जुने कॉल डिटेल्स mubble app या अ‍ॅपमुळे शोधणे शक्य होणार असून ते पीडीएफ फाईलच्या स्वरूपात मिळतील. जो इमेल आयडी अ‍ॅपमध्ये द्याल त्याच इमेल आयडीवर कॉल डिटेल्स दिले जातात. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरमध्ये मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अवघ्या दोन मिनिटांत परवानगी मिळताच कॉल डिटेल्सही मिळतील.

.
ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.


.
व्हॉट्सअॅप आज आपल्या आयुष्यातील एक भाग झालाय.सकाळी उठल्या उठल्या आपण सगळेच पहिलं दर्शन घेतो ते व्हॉट्सअॅपचं. व्हॉट्सअॅप थोड्या वेळ बंद पडलं, तरी राहवत नाही. पण आता कदाचित तुमच्या फोनवरचं व्हाॅट्सअप बंद कायमचं बंद पडू शकतं.

.
सध्या व्हॉटस् अ‍ॅपशिवाय अनेकांचे पान हलत नाही. जगभर लोकप्रिय असलेल्या या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक नवे फिचर्स आणले जातात. व्हिडीओ कॉलिंगसारख्या अशाच काही वैशिष्ट्यांमुळे व्हॉटस् अ‍ॅप दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत गेले आहे. आता आणखी एक नवं फिचर व्हॉटस् अ‍ॅपने यूजरसाठी आणलं आहे. या फिचरमुळे आता व्हॉटस् अ‍ॅपवरून लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहे. अनेक द‍ृष्टीने हे फिचर महत्त्वाचं ठरणार आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.