पुण्यातील 19 वर्षांची तरुणी सायकलवरुन करणार जगभ्रमंती

2018-01-04

पुण्यातील 19 वर्षांची तरुणी सायकलवरुन करणार जगभ्रमंती

नवी दिल्ली : पुण्यातील 19 वर्षाची तरुणी 130 दिवसांमध्ये सायकलवरुन जगभ्रमंती करणार आहे. हा तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास आहे. मूळची पुण्याची असणाऱ्या या 19 वर्षीय मुलीचे नाव वेदांगी कुलकर्णी असे आहे. जगभरातील प्रत्येक देशांमध्ये सायकलवरुन प्रवास करुन ती नवा विक्रम आपल्या नावे करण्याच्या तयारीत आहे. वेदांगी कुलकर्णी इंग्लंडमध्ये बॉर्नमाऊथ युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स विभागात दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. वेदांगी आपल्या जगभ्रमंतीला ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या शहरापासून सुरुवात करणार आहे. वेदांगीला सायकलवरुन स्वार होत संपूर्ण जगाला सर्वात वेगवान फेरी मारुन नवा विक्रम आपल्या नावे करायचा आहे. यासाठी तिनं आपली तयारीही सुरु केली आहे. ती रोज 320 किमी सायकल चालवण्याचा सराव करत आहे. विशेष म्हणजे जगभ्रमंतीसाठी वेदांगीनं कोणत्याही संघटनेचा पाठिंबा घेतला नाही. 
            मिरर'च्या वृत्तानुसार, वेदांगी ऑस्ट्रेलियावरुन यूएसच्या अलस्कावरुन न्यूझीलंडला जाणार आहे. त्यानंतर कॅनडा, पोर्तुगल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेनमार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीनला जाणार आहे. वेदांगीनं सांगितलं की, या प्रवासापासून ती #StepUpAndRideOn हा अभियान सुरू करणार आहे. महिला जगात न घाबराता काहीही करु शकतात. त्यांना घाबरण्याचे कारण नाही हे अभियान सुरु करण्यामागील उद्देश आहे.  29 हजार किमीचा हा प्रवास ती कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे. भविष्यात लिव्हिंग एडव्हेंचर, शेअरिंग दी  एडव्हेंचर या नावानं ती लघुपट करणार आहे.  
            वयाच्या 17 व्या वर्षी वेदांगीने सायकल चालवण्यास सुरुवात केली. तिचे वडील या जगभ्रमंतीचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी सांगितले की या यात्रेदरम्यान, वेलिंगटन (न्यूझीलंड) आणि स्पेन येथून प्रवास करणं सर्वात कठीण आहे. हे दोन जागा व्यवस्थित पार केल्यास दोन ग्रह पार केल्यासारखं आहे.  जुलै 2016 मध्ये वेदांगी कुलकर्णीनं भारतातील सर्वात कठिण असलेला रस्ता यशस्वीरित्या पार केला होता. तिनं मनालीतील अतिशय धोकादायक अशा मार्गानं सायकल चालवली होती. 29 हजार किमी प्रवासांमध्ये अडचण येऊ नये म्हणून ती रोज सहा ते आठ तास सलग सायकल चालवण्याचा सराव करत आहे. ट्रायल म्हणून तिनं 14 हजार किमी सायकल चालवली आहे.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत असलेले मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . ज्यांच्यावर हल्ला झाला त्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मात्र अटक करण्यात आली आहे . त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे .भिडे एकबोते जोडगोळीला अटक केल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होणार नाहि.त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .

सुरुचि राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून यामध्ये आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहाजणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनगाव ते खिंडवाडी ता.सातारा रस्त्यावर दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा.चिलेवाडी ता.कोरेगाव सध्या रा.आळजापूर ता.फलटण) हा युवक शुक्रवारी झालेल्या अपघातात ठार झाला.

क्रीडा बातम्या

.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची उपशाखा असणार्‍या सनातन संस्थेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचे पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.

.
चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी दिलीप कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले.

.
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत

.
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पापुआ न्यू गिनीवर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील कर्णधार पृथ्वी शॉने सुपर कामगिरी केली


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.