कोळसा खाण घोटाळा : तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

2018-01-02

कोळसा खाण घोटाळा : तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती

नवी दिल्ली : कोळसा खाण घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मधू कोडा यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यासोबतच 25 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 22 जानेवारीला पुढील सुनावणी होईपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. सोबतच दंहावरही स्थगिती आणली होती. मधू कोडा सध्या दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 
         मधू कोडा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अपक्ष आमदार होते. झारखंड विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीदेखील होता.कोडा यांनी तिकीट दिलं नाही. यानंतर मधू कोडा यांनी अपक्ष लढत निवडणूक जिंकली. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने मधू कोडा यांनी भाजपा नेतृत्वातील अर्जून मुंडा सरकारला समर्थन दिलं होतं. सप्टेंबर 2006 मध्ये मधू कोडा यांच्यासहित अन्य तीन अपक्ष आमदारांनी मुंडा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अल्पमतात आलेलं भाजपा सरकार पडलं. यानंतर युपीएने त्यांना मुख्यमंत्रीपद देत आपलं सरकार स्थापन केलं. 
         याआधी कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी पटियाला हाऊसच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स बजावले होते. तसेच याप्रकरणी हिंदालको कंपनीचे कुमार मंगलम बिर्ला, पी.सी.पारेख यांच्यासह आणखी तिघांना आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले होते. गुन्ह्याचा कट, विश्वासघात आणि भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील तरतुदींनुसार न्यायालयाने समन्स बजावले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने यापूर्वी मनमोहन सिंग यांची चौकशी केली होती. 

 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

देश विदेश बातम्या

.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कारवाई केली असून, यामधील काही कारवाया 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होत्या. मात्र सध्या भारतीय लष्कर कोणताही गवगवा न करता अत्यंत शांतपणे सीमेपार जात सर्जिकल स्ट्राईक करत आहे. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान नियंत्रण रेषेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही कारवाई नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आल्याचंच जगभरातून सांगण्यात येत होतं.

.
सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सकाळी बारामुल्ला परिसरातील पट्टन भागात जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

.
पाकिस्तान नव्या अणुबॉम्मची निर्मिती करत असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने दिला आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. पाकिस्तान भारतावर मोठा अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १७ शाळकरी विद्यार्थी ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

.
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु आहे. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, 28 तासाहून अधिक काळानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरुच आहे. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.