बॉक्सिंगमध्ये साताºयाचे नाव जगभर करा : गोपाल देवांग यांचे गौरवोद्गार

2018-01-01

बॉक्सिंगमध्ये साताºयाचे नाव जगभर करा : गोपाल देवांग यांचे गौरवोद्गार

सातारा : ‘मेरी कोम, विजेंद्रसिंह यांच्यापेक्षा महाराष्ट्रातूनही चांगले बॉक्सर घडू शकतात. हा खेळ फिजिकल फिटनेस येतो. तसेच जेणे करून ते तुमचं, तुमच्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करतील,’ असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांनी व्यक्त केले.सातारा तालीम संघाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७७ व्या युवा मुलांच्या व १६ व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग बोलत होते.
        यावेळी छत्रपती शिवाजीराजे भोसले, प्रा. नितीन बानुगडे- पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, सीआयएफसीचे कमांडट प्रशांत जगताप, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बी. जी. आगवणे, महासचिव भरतकुमार व्हावळ, राज्याचे खजिनदार एकनाथ चव्हाण, सीआयडीचे पोलिस निरीक्षक भूषण आडके, राज्याचे सचिव डॉ. राकेश तिवारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्रगोपाळ देवांग म्हणाले, ‘मी २३ वर्षापासून बॉक्सिंग खेळतो आहे. मेरी कोम ही लहान असल्यापासून तिचा खेळ पाहिला आहे. ती खूप मेहनत घेते. विजेंद्रसिंगही मेहनत घेतो. नियमित सराव करतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्या पाल्यांनाही तुम्ही बॉक्सिंगमध्ये करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण द्या. तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, ते तुमचे नाव उज्ज्वल करतील,’ असे त्यांनी सांगितले.
         प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘राजधानी साताऱ्यात बॉक्सिंगची स्पर्धा होतेय ही अभिनंदनाची बाब आहे. साताऱ्याला मातीतल्या कुस्तीचा इतिहास आहे. तसा मुष्टीयुद्धाला सात हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.’महाभारताच्या काळात भीम आणि दुश्शासनाचे मुष्टीयुद्ध झाल्याचे ऐकले होते. हा क्रीडा प्रकार वेगळ्या जाणिवेचा आहे. आॅलिम्पिकपर्यंत मजल जाऊ शकते. हॉलिवूडपट निघाले, आता बॉलिवूडमध्येही बाक्सिंगपटूवर चित्रपट निघाले आहेत. नवीन पिढीने अशा खेळाकडे आकर्षण होऊ लागले आहे.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

क्रीडा बातम्या

.
भारतीय संघाने सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव करत मालिका ५-१ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवत २०४ धावांचं लक्ष्य भारताला दिलं. प्रत्युत्तरात भारताने फक्त ३२.१ षटकांत २ गडी गमवत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.

.
केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

.
सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या एकेरी आण दुहेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने भारताने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने हाँगकाँगला ३-२ अशी मात दिली. सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेचे नेतृत्व सिंधूकडे सोपवण्यात आले असून नेतृत्वाला साजेशा खेळ करत सिंधूने भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

.
खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या 7 व्या दिवशी, मंगळवारी भारोत्तोलनात महाराष्ट्राच्या जेर्मी लालरीनुंगा व तृप्ती माने यांनी सुवर्णपदके पटकावली. यासह मुले व मुलींच्या भारोत्तोलनात महाराष्ट्राने 2 रौप्य व 3 कांस्यपदकांची कमाई करून महाराष्ट्राला पदकतालिकेत आघाडी मिळवून दिली. राज्याला एकूण 59 पदके मिळाली आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.