महाराष्ट्र केसरीत खटावच्या प्रशांतला ब्रॉंझपदक

2017-12-26

महाराष्ट्र केसरीत खटावच्या प्रशांतला ब्रॉंझपदक

खटाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्याच्या चारच दिवस आगोदर प्रशांतच्या वडीलांचे निधन झाले होते. कुस्तीमधले मुख्य प्रेरणास्थान त्याचे वडीलच होते. त्यांच्या जाण्याने प्रशांतची स्पर्धेत सहभागी होण्याची मानसिकताच राहिली नव्हती. तथापि, समस्त जाखणगावकर आणि कुस्तीपरिवारातील त्याच्या मित्रांनी दिलेल्या मानसिक पाठबळामुळे त्याचे मनोर्धैर्य पुन्हा उंचावले. स्पर्धेत मिळवलेले पदक हे त्याने त्याच्या स्वर्गीय वडीलांना अर्पण केले.
          लहाणपणापासून घरची हालाखीची परिस्थिती अनुभवलेल्या प्रशांतचा पदकापर्यंतचा प्रवास हा खरोखरच संघर्षमय आणि अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. वडीलांच्या मृत्यूच्या आगोदर मिरज हॅास्पिटलमध्ये दहा,बारा दिवस त्यांची सेवाश्रूषा करण्यात त्याचा वेळ गेला. स्वाभाविकच त्याला स्पर्धेच्या तयारीसाठी कसलाही सराव करता आला नाही. तसेच त्या अनुषंगाने अत्यावश्यक असलेला खुराक त्याला मिळाला नव्हता. एव्हाना त्याने स्पर्धेत सहभाग घेण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकला होता. दुर्दैवाने वडीलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली होती आणि स्पर्धेला केवळ चार दिवस बाकी आसताना वडील हे जग सोडून गेले.
        मानसिकदृष्ट्या खचुन गेलेल्या प्रशांतला जाखनगावचे ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने पुन्हा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उभारी दिली. गेले पंधरा दिवस ना सराव ना खुराक त्याच प्रमाणे खचलेल्या मनस्थितीत असलेला प्रशांत स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी करेल का ही शंका कुस्तीक्षेत्रातील जाणकारांच्या मनात निर्माण झाली होती.तथापि, प्रशांतने सलग तीन फेऱ्यांमधे  डाव प्रतीडाव करत प्रतिस्पर्धकांवर केलेली मात पाहुन  उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. वडीलांच्या निधनाला चारच दिवस झालेले आसताना केवळ गाव आणि जिल्ह्याच्या नावासाठी प्रशांत स्पर्धेत सहभागी झाल्याचे कळले तेव्हा चक्क सुवर्ण पदक आणि रौप्यपदक पटकावलेल्या मल्लांच्या डोळे देखील पाणावले. साहजिकच काहीक्षण संपुर्ण वातावरण भारावून गेले होते. 

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात मौर्य कुळातील चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने सध्याच्या उत्तर प्रदेशात येत असलेल्या सारनाथ येथे चार सिंहांची प्रतिकृती असणारा स्तंभ बसविला होता. भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ त्यावेळी या भारत भू ने पाहिलेला होता. ब्रिटीशांच्या जोखडातून देश मुक्त झाल्यानंतर या स्तंभाची मुद्रा भारतीय संविधानाने स्विकारलेली होती. चारही बाजूला सिंह असलेली ही मुद्रा भारतीय अस्मितेची आज प्रतिक बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मुद्रा म्हणून या मुद्रेचा सन्मान केला जातो. असे असतानाही 18 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुरेशराव खोपडेंनी हा अशोकस्तंभ डावलून त्याठिकाणी गरुड सदृश्य कबुतराचा पुतळा पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात का बसविला, याचे उत्तर खोपडेंना आज द्यावेच लागणार आहे.

निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, शांतीदूताचा पुतळा हटवून त्याठिकाणी अशोकस्तंभ लावले जाणार असेल तर नांगरे-पाटील यांची चार जिल्ह्यात जाहगिरी असून तेथील लाखो एकरामध्ये कोठेही ते लावावे. शांततेचे प्रतीक काढणे हे पूर्णत: चुकीचे आहे. शांतीदूताबाबत लोकभावनेचा आदर व्हायला हवा, असे आपले स्पष्ट मत आहे.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याबाबतची कारणमीमांसा त्यावेळी मुंबईत कर्तव्य बजावणार्‍या तत्कालीन सर्व पोलिस अधिकार्‍यांनी करावी. तंटामुक्ती योजनेसाठी बक्षीसांची खैरात नकोच, अशा अनेक विषयांवर आपण सेवेत असताना परखड व रोखठोकपणे मते मांडल्याने आयपीएस अधिकार्‍यांची लॉबी माझ्या एन्काऊंटरसाठी टपून बसली असल्याचा गौप्यस्फोट निवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला.

सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

क्रीडा बातम्या

.
भारतीय संघाने सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव करत मालिका ५-१ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवत २०४ धावांचं लक्ष्य भारताला दिलं. प्रत्युत्तरात भारताने फक्त ३२.१ षटकांत २ गडी गमवत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.

.
केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

.
सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या एकेरी आण दुहेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने भारताने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने हाँगकाँगला ३-२ अशी मात दिली. सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेचे नेतृत्व सिंधूकडे सोपवण्यात आले असून नेतृत्वाला साजेशा खेळ करत सिंधूने भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

.
खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या 7 व्या दिवशी, मंगळवारी भारोत्तोलनात महाराष्ट्राच्या जेर्मी लालरीनुंगा व तृप्ती माने यांनी सुवर्णपदके पटकावली. यासह मुले व मुलींच्या भारोत्तोलनात महाराष्ट्राने 2 रौप्य व 3 कांस्यपदकांची कमाई करून महाराष्ट्राला पदकतालिकेत आघाडी मिळवून दिली. राज्याला एकूण 59 पदके मिळाली आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.