सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा : सुजीत शेडगे

2017-12-22

सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा : सुजीत शेडगे

सातारा : जीवनात बुध्दीमत्तेबरोबरच शारिरिक जडणघडणही तितकीच महत्वाची आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, ध्येय, कष्ट आणि सातत्यही हवेच. जीवनात खेळांचे महत्व मोठे आहे. आपण सर्वांनी सुदृढ मनासाठी सुदृढ शरीरही कमवा.आज विजय मिळवला तर हुरळून जाउ नका आणि हरला तर खचून जाउ नका, असे उद्गार शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ मल्लखांबपटू आणि मार्गदर्शक सुजीत शेडगे यांनी काढले. 
सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्य्ाू इंग्लिश स्कुलच्या  2017 च्या वाषिर्ंक क्रिडा महोत्सवास मोठ्या उत्साहात आज प्रारंभ झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुजीत शेडगे उपस्थित होते. त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी  शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सौ.प्राची वेलणकर थत्ते याही पमख पाहुण्या म्हणून होत्या तर प्रभारी शालाप्रमुख डी.एस. कांबळे, क्रिडा महोत्सवाच्या प्रमुख सौ.सीमा जोशी, उपप्रमुख घनश्याम नवले, पर्यंवेक्षक जे. वाय.जाधव,गौतम वाघमारे, सुजाता पाटील, अक्षता जाधव यांची व्यासपीठावर  प्रमुख उपस्थिती होती. 
आमीॅ आणि नेव्ही ग्रुपच्या कॅडेटसच्या सोबत या मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर प्रभारी शालाप्रमुख डी.एस. कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कुरणेश्‍वर येथुन आणलेल्या शाळेच्या क्रिडा ज्योतीचे आणि सरस्वती देवीचे पुजन करुन फुग्यांनंी सजवलेला शाळेच्या नावाचा फलक व जीवंत कबुतरे आकाश सोडत  या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
आपल्या प्रास्ताविकात डी.एस. कांबळे यांनी कला,क्रिडा तसेच सर्वच श्रेत्रात आपली शाळा अग्रेसर असून केवळ बोैध्दिक विकास महत्वाचा नाही तर यासाठी शारिरिक विकास ही व्हावा यादृष्टीने हा महोत्सव शाळा घेत आहे. गेली अनेक वर्षे या महोत्सवातून मोठ्या पातळीवर खेळाडू निर्माण झाले आहेत. निरोगी शरीर हे निरोगी मन निर्माण करते. आज लाभलेले पाहुणे ही याच शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी उत्तुंग यश संपादन केले. असेच यश तुम्ही ही भावी आयुष्यात मिळवा असे सांगितले. 
सौ.प्राची थत्ते यांनी खेळात जिद्द महत्वाची आहे. अभ्यास आणि खेळाचा समन्वय साधा,चिकाटी महत्वाची असून आज खेळत उद्या मोठे व्हा अश्या शब्दात सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रिडा महोत्सवात प्रमुख पाहुण्यांपुढे शालेय मुला मुलींनी रिंग कवायत,निशाण कवायत, घुंगुर काठी,मर्दानी खेळात  पेटलेले पलीते व लाठी काठीचे प्रात्याक्षिक, झांजपथक, मानवी मनोरे, लेझीम पथक, झुंबा हा दक्षिण अफ्रिकेतील एरोबिक्स अर्थात व्यायाम प्रकार सादर केले. यावेळी शाळेच्या घोषपथकाच्या वतीने सचीन राजोपाध्ये व राजेंद्र आफळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी सुरेख बँड,बासरी बिगुल व ढोल वादन केले.  
समारंभात शाळेच्या वतीने राष्ट्रीय तसेच राज्य,विभागीय व जिल्हा स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवेलल्या सर्व मुलामुलींचा सत्कार सन्मान चिन्हे देउन करण्यात आला तसेच दिल्ली येथील  आरडीसी या विशेष संचलनात सहभागी झालेली शाळेची कु.अक्षता सहदेव जाधव या बॉक्संींगपटूचा विशेष सत्कार करण्यात आला.  
समारंभाचे सुत्रसंचालन सुधाकर गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन खटावकर सर यांनी केले. 2 दिवस चालणार्‍या या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रभारी शाला प्रमुख डी. एस. कांबळे, पर्यंवेक्षक जे. वाय.जाधव,गौतम वाघमारे, सुधीर विसापुरे,सौ. पुजा पाटील, क्रिडा महोत्सवाच्या प्रमुख सौ.सीमा जोशी,उपप्रमुख घनश्याम नवले,संग्राम उथळे,कैलास बागल ,एस. एन. जाधव, दिपक पवार, कु. शेवते, पाटील, वाय.डी.जाधव, सौ. हराळे, काकडे, मजलेकर, वनवे. मोरे, कु.जान्हवी देशपांडे, सौ.सुवर्णा देशपांडे आदी परीश्रम घेत आहेत. 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत असलेले मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . ज्यांच्यावर हल्ला झाला त्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मात्र अटक करण्यात आली आहे . त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे .भिडे एकबोते जोडगोळीला अटक केल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होणार नाहि.त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .

सुरुचि राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून यामध्ये आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहाजणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनगाव ते खिंडवाडी ता.सातारा रस्त्यावर दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा.चिलेवाडी ता.कोरेगाव सध्या रा.आळजापूर ता.फलटण) हा युवक शुक्रवारी झालेल्या अपघातात ठार झाला.

क्रीडा बातम्या

.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची उपशाखा असणार्‍या सनातन संस्थेकडून माझ्या जिवितास धोका असल्याचे पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजितदादा पवार यांच्या चाफळ दौर्‍यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या एकाच रथात अनेक महारथी एकत्रित आल्याने या रथाची चाके मधल्या काळात कोणी पंक्चर केली नाहीत तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीत हा रथ रोखणे भल्याभल्यांना कठीण असल्याचे मत जाणकार मंडळीतून व्यक्त केले जात आहे.

.
चंचळी ता. कोरेगाव येथील शेतकरी दिलीप कदम व मुलगा प्रथमेश कदम हे शेतातून घरी येत होते. यावेळी त्यांना ऊसाच्या ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात प्रथमेश चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले.

.
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत

.
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पापुआ न्यू गिनीवर 10 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यात देखील कर्णधार पृथ्वी शॉने सुपर कामगिरी केली


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.