विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेवून, विद्यार्थी घडविणारी अनोखी शाळा…!!

2017-12-22

विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेवून, विद्यार्थी घडविणारी अनोखी शाळा…!!

सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे.  हा जिल्हा  शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे.  हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो.  त्याला शिक्षण क्षेत्रही  अपवाद नाही.  प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे.  ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे.  सातारा जिल्ह्यातील  खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी,  जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने  मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे.  वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.
अपशिंगेची जिल्हा परिषद शाळा ही सर्वांसाठी आता मॉडेल शाळा आहे. नेमकं काय करतात इथले शिक्षक आणि स्थानिकांची शाळा समिती हे पाहण्यासाठी गेलो असता, अनेक सुखद धक्के बसले.  शाळेचे सुशोभित कपाऊंड, गेटच्या आत गेल्यानंतर कमालीची स्वच्छता, मोजकीच पण योग्य त्या जागी हिरवाई, झाडे, मधल्या बाजुला शाळेपर्यंत जाण्यासाठी पेवरब्लॉकचा रंगीत रस्ता (हा गावकऱ्यांनी निधी गोळा करुन केल्याचे समजले),  त्याच्या दोन्ही बाजूला प्रशस्त खेळाचे मैदान. या मैदानाच्या पुढे अतिशय सुबक दगडी इमारत १९०३ साली बांधलेली, ही शाळा पहिली ते सातवी पर्यंतची आहे.  एकूण 9 जण इथे शिक्षक आहेत.  एका शिक्षीकेचा अपवाद वगळता बाकी आठही शिक्षक पदवीधर आहेत. मुख्याध्यापकाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर शाळेतील कमालीची शिस्त लक्षात आली.   मुख्याध्यापकाच्या डाव्या बाजुला एक मोठी सरकती काच असलेल्या आलमारीत या शाळेनी  काय काय केलयं, याच्या अतिशय सुवाच्च अक्षरांमध्ये विविध कलरच्या फाईल्स अतिशय शिस्तीत लावल्याचे बघूनच शाळेच प्राथमिक रुपडे आवडले. या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती जमिला बागवान यांच्या नेतृत्वाखाली मागच्या मे पासून ही शाळा सध्या सुरु आहे.  गेल्या तीन वर्षातील या शाळेच्या प्रगतीचा आलेख खुपच भरीव आहे. आज या शाळेचा पट २८३ एवढा असून यातील ४० विद्यार्थी दुसऱ्या गावावरून स्वखर्चाने या शाळेत येतात.  या शाळेत गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या तळमळीने ८०० पुस्तकांचे ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे.  मुलं खरच वाचतात का, याची उलट तपासणी केली असता, ते त्या पुस्तकाचा सार अगदी न अडखळता सांगत होते.  ‘एक होता कारवार’, ‘अग्नी पंख’, ‘श्यामची आई’ अशी अनेक पुस्तके अतिशय आवडीने हे विद्यार्थी वाचत आहेत. शाळेची वेळ सकाळी दहाची असते मात्र जी मुलं विशेष प्रावीण्य मिळविणारे आहेत, त्यांच्यासाठी सकाळी ९ वाजता शाळा सुरु होते. आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतरचा एक तास ज्यांची अभ्यासात गती थोडी कमी आहे त्यांच्या प्रगतीसाठी  घेतला जातो. यामुळे या शाळेची १० मुले २०१४-१५ पासून नवोदयला लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणात नवोदयला मुलं पास होणारी ही जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे. चौथीच्या शिष्यवृत्तीतही या शाळेचे विद्यार्थी जिल्ह्यात चमकतात.  या विद्यार्थ्यांमध्ये ही  गुणवत्ता कशी काय येते, याचे प्रात्यक्षिक वर्गात जावून पाहता आले.  बी.एस.स्सी. डि.एड असलेले कदम सर मुलांना एलईडीच्या स्क्रीनवर पचन संस्थेविषयी चक्क इंग्रजी मधून पहिल्यांदा आणि नंतर त्याचे मराठी रुपांतर करुन शिकवत होते. त्या स्क्रीनवर आपण घास घेतल्या नंतर कुठे कुठे जातो हे त्या चलचित्रातून दिसत होते, त्यामुळे विद्यार्थ्याना हे द्रकश्राव्य माध्यम डोक्यात अधिक घट बसत असल्याचे लक्षात येत होते. मी त्यानंतर उलट तपासणी म्हणून एका निकम नावाच्या विद्यार्थ्याला आता सरांनी काय शिकविले पुढे येवून सांग, म्हटल्यानंतर तो न घाबरता पुढे आला.  त्या एलईडी स्क्रीनवर  पचन संस्था सांगू लागला. मी आवाक झालो, हा पाठ कालच सुरु झाला असल्याचे कळले.  एवढ्या लवकर ही मुले केवळ या द्रकश्राव्य माध्यम आणि सरांची त्यांच्या प्रती असलेली आपुलकी यामुळे हे विद्यार्थी पटकन अचूकपणे लक्षात ठेवतात असे वाटले, पुढच्या वर्गात इतिहासाचा तास होता. तिथे मिर्झा राजे जयसिंग बरोबर पुरंदर किल्यावरील तह हा पाठ सुरु होता. तिथल्याही विद्यार्थ्यांनी तसेच फटाफट उत्तरे दिली. नंतर हा प्रगत शाळा पॅटर्न, डिजीटल शाळा यांच्या समन्वय आणि शिक्षकांची  शासनाच्या पॅटर्नची १०० टक्के  अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण यामुळेच हे दैदिप्यमान यश या शाळेच्या पदरी पडत आहे हे लक्षात आले.शैक्षणिक गुणवत्तेत वरचष्मा असलेल्या या शाळेचा इयत्ता सातवीत असलेला सुमीत घाडगे बॉक्सिंग मध्ये राज्यस्तरावर खेळतो आहे. दोन वर्षापूर्वी ७ वीत बॉक्सिंग सुरु केलेली प्राची गुरव ही या शाळेची विद्यार्थीनी आता बालेवाडीच्या बॉक्सिंग प्रशिक्षण प्रबोधिनीत  प्रशिक्षण घेत आहे. शाळेच्या खो-खो च्या  संघातील दोन मुलींची निवड विभागीय पातळीवर झाली आहे.  खेळात प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्याना वेगळे कोचिंग आणि प्रोत्साहन असल्यामुळे ही शाळा क्रीडा क्षेत्रातही आपला नावलौकिक करत आहे. यासाठी गावातील नागरिकांच्या आर्थिक पाठबळाबरोबर प्रोत्साहनही असल्याचे सर्व शिक्षक सांगतात.  लोक वर्गणीतून शाळेचा सुसज्ज हॉल, ग्रंथालय, ढोलताशे,  प्रत्येक वर्गात एलईडी, आयडीबीआय बँकेनी  बांधून दिलेले शौचालय, तर इन्फोसीसने बनवून दिलेली लॅब.   गावकऱ्यांच्या मागणीवरुन २०१३ पासून पाचवी सुरु झाली आता सहावी, सातवी सुरु झाली. आता या जिल्हा परिषद शाळेचे नाव सर्वदूर पोहचले आहे.  त्यामुळे गावात इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळावा म्हणून पालक आता पासूनच शाळेत येवून जात असल्याचे श्रीमती बागवान यांनी सांगितले. सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे गाव दत्तक घेतले असून शाळेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून साहाय्य देणार आहेत, असे शिक्षकांनी सांगितले. आता ही शाळा पाहण्यासाठी लोक दूर दूर वरुन येत आहेत.   शाळेचे प्रतिक्रीया पुस्तक विविध लोकांच्या प्रतिक्रीयांनी भरुन गेले आहे.  एक प्रतिक्रिया खुप बोलकी आहे. "मला माझ्या मुलीला या शाळेत शिकावयला आवडले असते", तत्कालीन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्याचे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची ही प्रतिक्रिया या पुस्तकात आहे.  आशा शाळा सगळीकडेच झाल्या तर जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी लागेल. एवढे प्रयत्न झाले तर असे दिवस यायला वेळ लागणार नाही हे निश्चित …!!
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी अधिकारी,
सातारा


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.