‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’

2017-12-21

‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’

मुंबई : '1982मध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. विमानतळावरुन थेट मला ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही अॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. त्या परिस्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेची अॅम्ब्युलन्स माझ्यासाठी धावून आली होती. त्याच अॅम्ब्युलन्समुळे मी वेळेत ब्रीचकॅण्डी हॉस्पिटलला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी बाळासाहेंबाचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती अॅम्ब्युलन्स त्यावेळी तिथे आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती', अशी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची खास आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली आहे. 
‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आजवर कुणालाही माहित नाही, असंही यावेळी अमिताभ बच्चन यांनी म्हंटलं. 
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेबांच्या काही आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले होते.
‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार यायचे. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असयाचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही व्हायचे त्यावेळी बाळासाहेब मला फोन करुन विचारायचे. हे चूक आहे की बरोबर?. एकदा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर असाच एक आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी मला फोन करुन मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि विचारलं की, हे आरोप खरे आहेत का? मी त्यांना सांगितलं की, हे आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर त्यांनी तडक मला सांगितलं. आता घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे.  एवढा धीर त्यावेळी दुसरा कोणत्याच व्यक्तीनं मला दिला नाही.’ अशा अनेक आठवणींना अमिताभ बच्चन यांनी उजाळा दिला. 


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला कारणीभूत असलेले मोहन भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे . ज्यांच्यावर हल्ला झाला त्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना मात्र अटक करण्यात आली आहे . त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे .भिडे एकबोते जोडगोळीला अटक केल्याशिवाय समाजात शांतता प्रस्थापित होणार नाहि.त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पद्मश्री लक्ष्मण माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .

सुरुचि राडा प्रकरणातील तिसरे दोषारोपपत्र (चार्जशीट) जिल्हा सत्रन्यायालयात दाखल झाले असून यामध्ये आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहाजणांना नियमित जामीन मंजूर झाला आहे.

येथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोनगाव ते खिंडवाडी ता.सातारा रस्त्यावर दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा.चिलेवाडी ता.कोरेगाव सध्या रा.आळजापूर ता.फलटण) हा युवक शुक्रवारी झालेल्या अपघातात ठार झाला.

पेज3 बातम्या


.
हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.

.
दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.