साताऱ्यात 8 डिसेंबर पासून सैनिक भरती

2017-12-07

साताऱ्यात 8 डिसेंबर पासून सैनिक भरती

सातारा : दि. 8 ते 18 डिसेंबर 2017 रोजी साताऱ्यामध्ये पोलीस परेड ग्राऊंड येथे  सैन्य भरती होणार असून खालीलप्रमाणे भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. उद्या दि. 8 डिसेंबर 2017 पासून सैन्य भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
दि. 8 डिसेंबर 2017 रोजी रत्नागिरी-1050, सिंधुदुर्ग-545, गोवा(दक्षिण व उत्तर)-241, सांगली जिल्हयातील शिराळा-1167, वाळवा-2200, कडेगाव- 878 असे एकूण  6081 उमेदवार, दि. 9 डिसेंबर 2017 रोजी सांगली जिल्हयातील जत-1959, मिरज-2156, तासगाव-1672, आटपाटी-585 असे एकूण  6372 उमेदवार, दि. 10 डिसेंबर 2017 रोजी सांगली जिल्हयातील पलूस-602, खानापूर-744, कवठेमहांकाळ-1789 तर सोलापूर जिल्हयातील करमाळा-544, मंगळवेढा-1055, बार्शी-1126, सोलापूर(उत्तर)-584 असे एकूण  6444 उमेदवार, दि. 11 डिसेबर 2017 रोजी सोलापूर जिल्हयातील मेढा-782, मोहोळ-822, पंढरपूर-864, माळशिरस-947, सांगोले-1588, सोलापूर(दक्षिण)-540, अक्कलकोट-708 असे एकूण  6251 उमेदवार, दि. 12 डिसेंबर 2017 रेाजी सातारा जिल्हयातील सातारा-4133, माण-1595, जावळी-584 असे एकूण  6312 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे.
तसेच दि. 14 डिसेंबर 2017 पासून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे दि. दि. 14 डिसेंबर 2017 सातारा जिल्हयातील कोरेगाव-3044, खटाव – 2691, खंडाळा-428 असे एकूण 6163 उमेदवार, दि. 15 डिसेंबर 2017 रोजी सातारा जिल्हयातील महाबळेश्वर-71, वाई-1474, पाटण-1600, कराड-2812 असे एकूण 5957 उमेदवार, दि. 16 डिसेंबर 2017 सातारा जिल्हयातील फलटण-1446 व कोल्हापूर जिल्हयातील शाहुवाडी-1677,  पन्हाळा-1292,हातकलंगले-1658 असू एकूण 6073 उमेदवार, दि. 17 डिसेंबर 2017 कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ-1123, करवीर-2600, बावडा-64, राधानगरी-1093, बुधाघर-920,अर्जा-596,दि. 18 डिसंबर 2017 रोजी कोल्हापूर जिल्हयातील कागल-1808, गडहलिंगज-1678, चंदनगड-1620 असे एकूण 5106 उमेदवारांची  वरीलप्रमाणे प्रत्येक विभागाची भरती होणार आहे.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
damini Chavan
Girl sathi jaga ahet ka???

महत्वाच्या बातम्या

नोकरी बातम्या

.
राज्य सेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, तसेच कर सहायक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षा एकत्रित न घेता स्वतंत्रपणे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले.

.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रिया कार्यपद्धती ही हायकोर्टाच्या आदेशांचा सरळसरळ अवमान करणारी आहे. त्यामुळे कन्टेंप्ट ऑफ कोर्टअंतर्गत राज्य सरकारवर कारवाई का करू नये, असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश प्रक्रियेला दिलेली स्थगिती कायम ठेवली.

.
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.

.
अनाथ मुलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आला. अनाथ मुलांसाठी १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेताला आहे. आज मुंबईत झालेल्या या बैठकीत अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2017 ला देखील मान्यता देण्यात आली आहे.

.
राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा विशेष प्रवर्ग तयार करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.