मी माझा भाऊ गमावला : बिग बी

2017-12-05

मी माझा भाऊ गमावला : बिग बी

मुंबई : हरहुन्नरी अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी शशी यांच्या आठवणी लिहित ब्लॉगच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. मी माझा भाऊ गमावला आहे, असे अमिताभ यांनी लिहिले आहे. बिग बी यांनी ब्लॉगची सुरुवात रुमी जाफरी यांच्या एका शायरीने केली आहे.  
बॉलीवुडमध्ये सर्वात चांगले मित्र म्हटले तर अमिताभ आणि शशी यांचे नाव पुढे येते. अनेक चित्रपटांमध्ये दोघांनीही भाऊ आणि मित्राच्या भूमिका साकारल्या आहेत. फक्त चित्रपटातच नव्हे तर रिअल लाईफमध्येही हे दोघे चांगले मित्र होते. अमिताभ यांनी शशी यांच्याबद्दल खूप भावूक असा ब्लॉग लिहिला आहे.  
कशातर्हेने शशी कपूर यांचा प्रभाव आपल्यावर होता, याबद्दल अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. शशी यांची हेअरस्टाईल, त्यांचे बिहेवियर आपण कॉपी करत होतो, असेही त्यांनी लिहिले आहे. शशी यांची पत्नी जेनिफर यांचे निधन झाल्यानंतर शशी खूपच एकटे पडले होते. त्यांनी अनेक आजारांचा सामना केला. तसेच शशी कपूर यांच्याशी जवळीक आणि मैत्री कशा पध्दतीने वाढत गेली, याचे अनुभवदेखील अमिताभ यांनी शेअर केले आहेत. 
प्रेमळ मित्राच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. मी फक्त एकदाच हॉस्पिटलमध्ये शशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मी कधीच हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. मित्राला त्या अवस्थेत पाहू शकत नव्हतो, असेही अमिताभ यांनी लिहिले आहे.
अमिताभ शेवटी लिहिले आहे...'वह मुझे 'बबुआ' कहते थे...आज उनके साथ-साथ मेरे और उनकी जिंदगी के कई पन्ने अधूरे ही चले गए।' 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

ब्लॉग बातम्या

.
मागील दोन दिवसांपासून गाजत असलेल्या भीमा- कोरेगाव हिंसा प्रकरणानंतर दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे राज्यभर पडसाद पहायला मिळाले.. मुंबई- ठाण्यासहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी या आंदोलनामुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागले. या आंदोलनाची झळ बॉलिवूडलाही पोहोचली. आधीच ठरलेले नियोजन डरमळल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली.Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.