सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम ...!!

2017-11-23

सातारा जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम ...!!

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशाल दिशा देण्याचे काम केले आहे. राज्य  व केंद्र शासन लोकांच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. शासनच्या योजना राबविण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो, प्राथमिक शिक्षण  यासह अनेक योजनांमध्ये सातारा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यात जलसंधारण, शिक्षण, स्वच्छतेत जिल्ह्याने विकासाचा नवा आयाम निर्माण केला आहे. यावर टाकलेला थोडक्यात प्रकाश….
जिहे-कटापूर उपसासिंचन योजना
जिहे-कटापूर उपसासिंचन योजना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ही योजना कार्यान्वीत होण्यासाठी त्यांनी मंत्रालय, तसेच जिल्ह्यात अनेक बैठका घेवून हा विषय निकाली काढण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले.  माण व खटाव दुष्काळी भागाला पाणी देवून तिथला शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे ही माझी प्रमाणीक इच्छा आहे. जिहे-कटापूर योजनेत कृष्णा नदीचे पाणी कटापूर येथून तीन टप्प्यात उचलून ते खटाव, माण तालुक्यांतील 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन आहे. यामध्ये माणमधील 15 हजार 800 हेक्टर तर खटाव तालुक्यातील 11 हजार 700 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाने 1997 मध्ये 269.07 कोटी इतक्या किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. पण विविध कारणांनी योजनेच्या कामातील व्याप्तीत बदल, अपुऱ्या तरतुदी, तसेच नवीन तरतुदीमुळे किंमतीत वाढ झाली. त्यामुळे जलसंपदा विभागाने या योजनेस नव्याने 1053.53 कोटी इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2016-17 च्या दरसूचीवर आधारित 1085.53 कोटी रुपयांच्या निधी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रत्यक्ष कामासाठी 983 कोटी रुपये अधिक अनुषंगिक खर्च 102.53 कोटी इतक्या रकमेस मान्यता दिली आहे. तसेच या योजनेस या वर्षी 20 कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. ही योजना पूर्णपणे कार्यान्वीत झाल्यावर खटाव व माणमध्ये पूर्णक्षमतेने पाणी पोहचेल.
धरणग्रस्तांचे पुनर्वसन
मोठी धरणं बांधायची म्हटल्यास सर्वाधिक क्लेशदायक काम म्हणजे शेकडॊ वर्षापासून नांदणा-या गावांचे पुनर्वसन हे आहे. मात्र साता-यातील जनतेनी या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली. त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन सातारा जिल्ह्यात झाले आहे. कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महिंद, कवठे कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणतीस हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ८२ गावठाणांमध्ये होणार असून आता पर्यंत ५७ गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित पुनर्वसन गावठाणातील कामे    पाठपुराव्यामुळे जलदगतीने पूर्णत्वाकडे जात आहेत. गेल्या दोन वर्षात पुनर्वसनाच्या कामाने गती घेतली असून उरमोडी प्रकल्पग्रस्तांचे जवळ जवळ शंभर टक्के पुनर्वसन झाले आहे. पुनर्वसनाच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर अतिशय कमी काळात हे पूनर्वसन पूर्ण झाले आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श पुनर्वसन म्हणून या पुनर्वसनाकडे  पाहिले जात आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
जलयुक्त शिवार अभियान
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्यात सन 2015-16  मध्ये 215 गावांची निवड करण्यात आली होती. त्यासाठी 164.02  कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला. यातून 8 हजार 418 कामे पूर्ण करुन 215  गावे जलयुक्त झाली आहेत.  तसेच यावर्षी जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किवळ येथील ओढा जोड प्रकल्प आणि चांदक-गुळूंब ओढा जोड प्रकल्प हे वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यात आली.  दुसऱ्या टप्यात 2016-17 ला 210 गावाची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली. यामधून 4 हजार 628 कामे पूर्ण झाली असून 834 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर 97 कोटी 97 लाख 93 हजार रुपये खर्च करण्यात आले. या कामांमधून 87 गावे जलयुक्त झाली आहेत. तिसऱ्या टप्यात  2017-18 साठीही 210 गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड झाली असून त्याकामांचे आराखडे तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांना हाताला काम
सुशिक्षीत बेरोजगारांना हाताला काम मिळावे म्हणून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार  नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी “ई.पी.पी.” अंतर्गत सन 2015-16 मध्ये 813, 2016-17 मध्ये 812 व 2017-18 मध्ये जुलै 2017अखेर 251 बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात आले. करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजनेंतर्गत सन 2015-16 मध्ये 833 यामध्ये 242  महिला लाभार्थी, 2016-17 मध्ये 612 यामधील 55 महिला लाभार्थी तर 2017-18 मध्ये जुलै 2017 अखेर एकूण 492 लाभार्थी यामध्ये 169 महिला लाभार्थ्यांना  व्यवसाय, शैक्षणिक करिअर व स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करुन उमेदवारांना इंटरनेट सुविधा (किऑक्स) विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात आले.
वृक्ष लागवड
महाराष्ट्र शासनाकडून वृक्ष लागवड ही योजना लोकसहभागात चळवळ म्हणून राबविण्यात येत असून सातारा जिल्ह्यात    २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ७ लाख ६३ हजार एवढे उद्दिष्टे असताना ८ लाखाच्या वर वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येक विभागाला ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक झाडे लावली आहेत ही टक्केवारी ११६.९ टक्के एवढी आहे. वन विभागाने लावलेल्या झाडांची जगण्याची संख्याही 90 टक्क्याहून अधिक आहे. सातारा जिल्ह्याला २०१९ पर्यंत ५६ लाखाचे उद्दिष्ट असले तरी याच्या किती तरी अधिक वृक्ष लागवड जिल्ह्यात होईल.   
राज्यातला पहिला हागणदारीमुक्त जिल्हा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली.   जिल्ह्यातील प्रशासनाने यात आघाडी घेतली आणि जिल्ह्यातील ११ तालुके आणि संपूर्ण १४९० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या. २५ मार्च २०१७ अखेर राज्यस्तरीय त्रयस्थ संस्थेकडून हागणदारीमुक्त ग्रामपंचायती तपासणी करण्यात आली होती, त्यात सर्व ग्रामपंचायती पात्र ठरल्या. सातारा जिल्हा स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) संकेतस्थळावर फ़ोटॊ अपलोड करण्यामध्येही राज्यात प्रथम क्रमांकावर होता. सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे देशभरात क्वालिटी कौन्सील ऑफ़ इंडीया तर्फ़े स्वच्छचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यात सातारा जिल्हा संपूर्ण देशातून तिसरा आला आहे.
घरकुल योजना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत(ग्रामीण) लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, उपग्रहाद्वारे निरिक्षण (जिओ टॅगींग) आणि घरकुलांना मंजुरी देण्यात सातारा जिल्हा  महाराष्ट्रात तसेच देशात अव्वल ठरला आहे. या योजनेची सर्वच क्षेत्रात  प्रभावी अंमलबजावणी करण्यात राज्यात तसेच देशात देखील सातारा जिल्हा प्रथम स्थानावर राहीला आहे. घरकुल योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षात 6 हजार 665 घरकुले पूर्ण झाली असून यावर 7 हजार 257 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.  तर 4 हजार 725 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.  तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे ही बाब देखील अभिनंदनीय आहे.  
प्राथमिक शिक्षण
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत 2 हजार 713 शाळा चालविल्या जातात.  या सर्व शाळांमधून गेल्या तीन वर्षांपासून ज्ञानरचनावादी दृष्टीकोन अवलंबण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा फायदा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्या चाचणीमध्ये यावर्षी सातारा जिल्हा राज्यात पहिला तर मागील वर्षी दुसरा राहिला आहे. ज्ञानरचनावाद पद्धतीमुळे 2 हजार 713 पैकी 2 हजार 703 शाळा प्रगत झाल्या आहेत.
पाचगणी नगर परिषद
पाचगणी नगर परिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2015-16 मध्ये प्रथम पुरस्कार, राज्यस्तरीय हागणदारी मुक्त शहराचा 2015-16 मध्ये प्रथम पुरस्कार, देशपातळीवरील हागणदारी मुक्त व स्वच्छ शहरमध्ये नावलौकीक  2015-16 प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तसेच  पुणे विभागात हागणदारी मुक्त व स्वच्छ शहराचा (उत्कृष्ट नगर परिषद) प्रथम पुरस्कार 2016-17 मध्ये मिळाला आहे.
पर्यटन पोलीस
जिल्ह्यातील पाचगणी व महाबळेश्वर पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्रामध्ये पर्यटनास येणारे पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून तसेच निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी स्वतंत्रपणे पर्यटन पोलीस ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या पर्यटन पोलीस विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पथकात एकूण 35 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना पेट्रोलिंगसाठी शासकीय दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांना घरे
जिल्हा पोलीस दलातील कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय निवास्थान उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस दलाच्या मालकीच्या जुन्या पोलीस लाईन पाडून त्या ठिकाणी सर्वसुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक नवीन बहुमजली इमारतींचा 200,48,12,958 रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे. निवासस्थानाचे बांधकाम करण्याची निविदा प्रक्रिया पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात बांधकामास सुरुवात होणार आहे.
निर्भया पथक
जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थींची टवाळ, मवाली मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीच्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अखत्यारित निर्भया पथकाची स्थापना दि.16 ऑगस्ट 2016 रोजी करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोकळ्या व निर्भय वातावरणात शाळा व महाविद्यायात शिक्षणासाठी जात असून या पथकाला जनतेतून   प्रतिसाद मिळत आहे. निर्भया पथकाने आजअखेर 10035 करावाया केल्या असून 5443 इतक्या इसमांचे समुपदेशन केले आहे. महिलांच्याबाबतीत असेलेले विविध कायदे समजावून सांगून निर्भया पथकाने जनजागृतीसाठी 1058 प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले.
आता सातारा जिल्ह्यात आरोग्य, ग्राम स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देणार आहे. यातून राज्यात जिल्ह्याचे वेगळेपण उठून दिसेल. आम्ही सातारकर या नावाला ही झळाळी अधिक शोभूण दिसेल हे मात्र  नक्की … !!
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.