मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा वसा, पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेचा पुढाकार

2017-10-12

मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचा वसा, पुण्यातील कर्वे समाज सेवा संस्थेचा पुढाकार

पुणे: कुटुंब व समाजापासून दूर होऊन दिवसेंदिवस रस्त्यावर भटकत फिरणारे, पोटाची खळगी भरण्यासाठी कचराकुंडीत टाकून दिलेले अन्न व तहान भागविण्यासाठी गटारीतील पाणी पिऊन उदरनिर्वाह करणारे, आणि दुर्दैवाने  याच समाजाचा दुर्लक्षित का होईना पण एक महत्वपूर्ण घटक असणारे मनोरुग्ण आज कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने रस्त्यावरून उचलून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्याची कर्वे समाज सेवा संस्था सरसावली असून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज १० मनोरुग्णांना पुण्याच्या विविध रस्त्यांवरून उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे.
जगभरात सर्वत्र १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभाग व कर्जत, जि रायगड येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी हा साजरा करण्यात आला.
राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांच्या हस्ते तसेच संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर, डॉ महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसिक आरोग्य सप्ताहाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मानसिक आजारवर मार्गदर्शनपर व्याख्यानाने सप्ताहाच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
पुण्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या रेहान रझा, रमाकांत वड्डेवार, पूजा व वंदना या समाजकार्यकर्त्यांच्या मदतीने उचलून पुढील उपचार व पुनर्वसनासाठी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रामध्ये पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आपल्या दालनातून बाहेर येऊन रुग्नवाहीकेमध्ये बसलेल्या सर्व मनोरुग्णांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला व त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर, समुपदेशन अभ्यासक्रम प्रमुख डॉ महेश ठाकूर, समन्वयक व प्रमुख प्रा. चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा दादा दडस व समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ससून हॉस्पिटल ते अपंग कल्याण आयुक्त कार्यालय अशी रॅली काढून विविध बॅनर्स, पोस्टर्स व माहिती पत्रके वाटपाच्या माध्यमातून जनजागृती करीत आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

मकरसंक्रांत हा सण म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. या दिवशी माता-भगिनींच्या दागिन्यांवर डोळा ठेवणार्‍या चोरट्यांनी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीनजिक एका महिलेचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याठिकाणी असणार्‍या युवकांनी या दोन चोरट्यांचा जिवाच्या कराराने पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांना जिवाच्या भीतीने दागिने टाकून पळ काढावा लागला. यानंतर सुमारे 20 मिनिटांने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावर पडलेले दागिने हातात घेवून संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. काळ आला होता, पण चोरट्यांची वेळ चुकली अन्यथा याठिकाणी तिळगुळाऐवजी युवकांकडून चोरट्यांना चांगलाच चोप बसला असता.

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही जन्मजन्मांतरीच्या भाग्याची गोष्ट आहे, असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन भागवत यांचे स्वागत केले.

.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे शहरात पार्किंगची समस्या किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय आज आला. गाडी लावण्याच्या वादातून एका कम्युटर इंजिनीअरची हत्या करण्यात आली आहे. नेव्हल बत्तीवाला असं मृत मुलाचं नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत.

.
राज्यातील जनता हैराण असतानाच आज सरकारने शेतीच्या पाण्याचे दर १७ ते ५० टक्के वाढ केली आहे. शेतकऱ्यांसमोर पाण्याचा यक्ष प्रश्न असून शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम सुरु आहे. हे थांबवा अन्यथा राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नांदेडच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे.

.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असणार्या महाराष्ट्रातील ५० समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना मागील ३ ते ४ महिन्यापासून वेतनासाठी समाजकल्याण कार्यालयात फेर्या माराव्या लागत असून अगोदरच वर्षानुवर्षे प्रलंबित असणार्या मागण्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण संचालनालय तसेच विभागीय आणि जिल्हा स्तरावर प्रलंबित असणार्या या मागण्या पूर्ण नं झाल्यास येत्या २६ जानेवारीपासून महाराष्ट्र असोशिअशन ऑफ शोशल वर्क एज्युकेशन (मासवे) मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर यांनी कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.