शिक्षकाने कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याच्या डोळा गेला!

2017-10-08

नवी दिल्ली : मुजफ्फरनगरमधील शारडीन स्कूलमधील एका विद्यर्थ्याला शिक्षकाने जोरदार कानिशिलात लगावल्यामुळे विद्यार्थ्याचा डोळा गेला आहे. सफान असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो इयत्ता पाचवीत शिकतो. एका लहानशा चुकीसाठी शिक्षकाने त्याला काशिलात लगावली. पण यात त्याचा डोळा निकामी झाल्याचा आरोप होत आहे.
     सफनाची चूक इतकीच होती की, त्याने शिक्षकाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्या मित्राच्या बाकाजवळ गेला. यानंतर शिक्षकाने सफानला जोरदार कानशिलात लगावली, यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला आहे.
     या घटनेनंतर सफानच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन, आरोपी शिक्षक आणि शारडीन स्कूल विरोधात तक्रार दाखल केली आहे. शारडीन स्कूलची मुजफ्फरपूरमधील नामांकीत शाळांमध्ये गणना होते. या शाळेत अनेक वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे विद्यार्थीही शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळेतही विद्यार्थ्याबाबत अशी घटना घडल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
     दरम्यान, याप्रकरणी शारडीन स्कूलच्या वतीने कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

मकरसंक्रांत हा सण म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. या दिवशी माता-भगिनींच्या दागिन्यांवर डोळा ठेवणार्‍या चोरट्यांनी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीनजिक एका महिलेचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याठिकाणी असणार्‍या युवकांनी या दोन चोरट्यांचा जिवाच्या कराराने पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांना जिवाच्या भीतीने दागिने टाकून पळ काढावा लागला. यानंतर सुमारे 20 मिनिटांने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावर पडलेले दागिने हातात घेवून संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. काळ आला होता, पण चोरट्यांची वेळ चुकली अन्यथा याठिकाणी तिळगुळाऐवजी युवकांकडून चोरट्यांना चांगलाच चोप बसला असता.

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे.

देश विदेश बातम्या

.
विमान प्रवासादरम्यान फोनला नेटवर्क मिळत नसे. त्यामुळे फोनवरून संभाषण होत नसे. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीही दिली जात नव्हती. मात्र, आता भारतीय दूरसंचार नियामक मंडळने (ट्राय) याबाबत परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे. तसेच विमानात वाय-फायची सुविधा देण्यात येणार आहे.

.
पाकिस्तानमधील एका संघटनेने ‘शहीद-ए-आजम’ पुरस्कारप्राप्‍त शहीद भगत सिंग यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे 6 वर्षांपूर्वी भगत सिंग यांना लाहोरमधील ज्या शादमान चौकात फाशी देण्यात आली तेथे त्यांचा पुतळा उभारावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

.
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शुक्रवारी रात्रीपासून सीमारेषेवरील जवळपास ३० भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात सांबा सेक्टरमध्ये हेडकॉन्स्टेबल जसपालसिंग आणि लान्स नाईक सॅम अब्राहम हे जवान शहीद झाले असून २ नागरिकांचाही मृत्यू झाला.

.
जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

.
सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शुक्रवारी पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सांबा, अरनिया, कठुआ, आर एस पुरा सेक्टर येथील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांना पाकने लक्ष्य केले. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्रीपासून सीमा रेषेवर गोळीबार सुरु असल्याने सीमेलगतच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.