कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन 20 पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी

2017-10-08

कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन 20 पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी

यवतमाळ : कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे.
प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे.
पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
अशीच फवारणी यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतमजूर नितीन सोयाम यांनी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने तीन दिवस त्यांचे डोळे उघडलेच नाही. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डोळे नीट होण्यासाठी पुढचा एक महिना काळजी घ्यावी लागणार आहे. चिनी पंप वापरल्यामुळे असं झाल्याचं सोयाम यांचं म्हणणं आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन जीव गमवावा लागला. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अतिविषारी जहाल कीटकनाशकांचा वापर,  परवाना नसलेली कीटकनाशकांची कृषी केंद्र चालकांकडून होणारी विक्री, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य दक्षता न घेता केली गेलेली फवारणी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी मार्गदर्शनाचा अभाव ही विषबाधा होण्यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे.
चिनी बनावटीचा पंप बाजारात 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे.
फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.
शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत..
ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, रविवारी पहाटे कामेरी (ता. सातारा) येथे नदीपात्रातील वाळू चोरत असताना तलाठी व सर्कल त्या ठिकाणी गेल्यानंतर संशयित दोघांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 5 ब्रास वाळूसह यारी, ट्रॅक्टर असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेळेत वेतन मिळत नसल्याने अडी-अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सातारा जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 622 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना झाला आहे.

मकरसंक्रांत हा सण म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देण्याचा दिवस. या दिवशी माता-भगिनींच्या दागिन्यांवर डोळा ठेवणार्‍या चोरट्यांनी रात्री साडेआठ वाजता शाहूपुरी येथील महालक्ष्मी कॉलनीनजिक एका महिलेचे दागिने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याठिकाणी असणार्‍या युवकांनी या दोन चोरट्यांचा जिवाच्या कराराने पाठलाग केला. त्यामुळे चोरट्यांना जिवाच्या भीतीने दागिने टाकून पळ काढावा लागला. यानंतर सुमारे 20 मिनिटांने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी रस्त्यावर पडलेले दागिने हातात घेवून संबंधित महिलेकडे सुपूर्द केले. काळ आला होता, पण चोरट्यांची वेळ चुकली अन्यथा याठिकाणी तिळगुळाऐवजी युवकांकडून चोरट्यांना चांगलाच चोप बसला असता.

कोयनानगर मधील रासाटी येथील विजय धनाजी जाधव (वय ३५) याने एका महिलेला प्रेमाचे संदेश व्हॉटस् अॅपवरुन पाठवले. हे कृत्य त्याला महागात पडले. त्या महिलेने विजय विरुध्द विनयभंग केल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत केली आहे.

महाराष्ट्र बातम्या

.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाचे दर्शन घडणे ही जन्मजन्मांतरीच्या भाग्याची गोष्ट आहे, असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा भेट देऊन भागवत यांचे स्वागत केले.

.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे शहरात पार्किंगची समस्या किती बिकट झाली आहे, याचा प्रत्यय आज आला. गाडी लावण्याच्या वादातून एका कम्युटर इंजिनीअरची हत्या करण्यात आली आहे. नेव्हल बत्तीवाला असं मृत मुलाचं नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत.

.
राज्यातील जनता हैराण असतानाच आज सरकारने शेतीच्या पाण्याचे दर १७ ते ५० टक्के वाढ केली आहे. शेतकऱ्यांसमोर पाण्याचा यक्ष प्रश्न असून शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहिम सुरु आहे. हे थांबवा अन्यथा राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशी भीती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नांदेडच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे.

.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असणार्या महाराष्ट्रातील ५० समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना मागील ३ ते ४ महिन्यापासून वेतनासाठी समाजकल्याण कार्यालयात फेर्या माराव्या लागत असून अगोदरच वर्षानुवर्षे प्रलंबित असणार्या मागण्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण संचालनालय तसेच विभागीय आणि जिल्हा स्तरावर प्रलंबित असणार्या या मागण्या पूर्ण नं झाल्यास येत्या २६ जानेवारीपासून महाराष्ट्र असोशिअशन ऑफ शोशल वर्क एज्युकेशन (मासवे) मार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दिपक वलोकर यांनी कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.