विच्छा माझी पुरी करा, मोदींसोबत लग्न लावून द्या!

2017-10-07

विच्छा माझी पुरी करा, मोदींसोबत लग्न लावून द्या!

नवी दिल्ली : जयपूरमधून आलेल्या एक 40 वर्षीय महिला मागील एक महिन्यापासून दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे. परंतु, या धरणे आंदोलनाचे कारण जाणून तुम्ही हैराण व्हाल. कारण या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लग्न लावून देण्याची अजब मागणी केली आहे.
माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 8 सप्टेंबरपासून जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत आहे. जयपूरची रहिवाशी असलेल्या या 40 वर्षीय महिलचे नाव जय शांती शर्मा असे आहे. शांती शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लग्न करण्यास उत्सुक आहे. कारण लग्नानंतर तिच्या नवर्‍याने तिला धोखा दिला आहे. त्यामुळे त्याचे दु:ख फक्क पंतप्रधान नरेंद्र मोदीच समजू शकतात.
ते ही एकटेच आहेत
शांती यांचे लग्न सन 1989 मध्ये झाले होते. परंतु लग्नाच्या 1 वर्षानंतर तिच्या नवर्‍याने तिला सोडले. तेव्हापासून ती एकटी आहे. यामुळे त्या म्हणाल्या की, मला माहिती आहे, की लोक मला त्यांना भेटू देणार नाहीत. परंतु पंतप्रधानही माझ्यासारखे एकटे असल्याने त्यांना माझ्या मदतीची आवश्यकता आहे.
...यासाठी पंतप्रधान मोदीसोबत करायचे आहे लग्न
शांती यांना पंतप्रधान मोदींसोबत लग्न का करायचे आहे, असे विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींसोबत लग्न करण्याची माझी इच्छा ऐकूण सर्वजण माझ्यावर हसतात. मला सर्वांनी हाकलून लावले. परंतु मला पंतप्रधानांची सेवा करायची आहे. कारण मोदी यांचा व्यवहार सर्वांसोबत खुपच चांगला आहे. ते गरीब आणि दु:खी लोकांचे गार्‍हाणे ऐकतात, त्यामुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे. तसेच जोपर्यंत पंतप्रधान तिला भेटत नाहीत, तोपर्यंत ती धरणे आंदोलन करत राहणार आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

देश विदेश बातम्या

.
काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला.

.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु असताना जवानाच्या पायाला गोळी लागली होती. मात्र जवानाने हार न मानता दोन हात केले आणि विशेष म्हणजे स्वत: आठ किमी अंतर चालत रुग्णालयात पोहोचला. सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानाचा फोटो शेअर केला आहे.

.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

.
पाकिस्‍तानकडून भारतीय नियंत्रण रेषेजवळ होणार्‍या कुरपतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारीही पाकिस्‍तानकडून जम्‍मू काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ पाकिस्‍तानचे एमआय १७ हे हेलिकॉप्‍टर आल्याची घटना बुधवारी घडली.

.
भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.