माझे राष्ट्रीय पुरस्कार हे ‘मोदींनाच’ देण्यात यावेत; मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते : प्रकाश राज

2017-10-02

माझे राष्ट्रीय पुरस्कार हे ‘मोदींनाच’ देण्यात यावेत; मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते : प्रकाश राज

बंगळुरु : पत्रकार आणि बंगळुरु येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्टीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ‘मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते असून, माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत,’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल ‌किंवा नाही, मात्र सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे त्यांच्या हत्येचे समर्थन करत आहेत. हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारसरणी काय आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सोशल मीडियावर हत्येचे समर्थन करणाऱ्यांना मोदी स्वत:ला फॉलो करतात. याचीच चिंता मला जाणवत आहे. कुठे चालला आहे आपला देश? असे प्रकाश राज म्हणाले. बंगळुरु येथे झालेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा देत ते पुढे म्हणाले की ‘मला पुरस्कार नकोत. तुम्हीच ठेवा ते. चांगले दिवस परत येतील, अशी खोटी आशा मला दाखवू नका. मी एक प्रख्यात अभिनेता आहे, तुम्ही (मोदी) अभिनय करताना मी तुम्हाला ओळखू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? अभिनय काय आहे आणि सत्य काय हे मी ओळखू शकतो. किमान ही गोष्टी जाणून तरी काही आदर दाखवा.’

मोदींनी गौरी लंकेश यांच्याप्रकरणी यापुढेही मौन बाळगले तर पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा प्रकाश राज यांनी दिला. गौरी लंकेश यांना प्रकाश राज ३० वर्षांपासून ओळखत होते. गेल्या महिन्यात गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र् निषेध केला होता.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यासह साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वरकुटे-मलवडी येथील सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी टोळी जमवून, दहशत माजवून खंडणी मागितल्याप्रकरण व इतर गुन्ह्यांसह कारवाई करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती.आता राष्ट्रवादीच्या नेत्यावर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने राष्ट्रवादी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. तर शेखर गोरे यांच्या चारही साथीदारांना अटक करण्यात आली असून आता शेखर गोरे यांना केव्हा अटक होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अरेरावी व मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यातील रणरागिणींसह महाराष्ट्र सैनिकांनी नुकतेच निसरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.

कट्टर हिंदूत्ववादी व शाकाहाराचा पुरस्कार करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सातार्‍यातील कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी चक्क भगवे कारपेट अंथरल्यामुळे कट्टर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, जेवणासाठी खास मांसाहार विभाग निर्माण करुन भाजपच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन सातार्‍यात झाल्याची टीका आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्ते करु लागले आहेत.

देश विदेश बातम्या

.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांसाठीच्या कॅबिनेट समितीने अलीकडेच मंजुरी दिलेले स्किल्स ऍक्विझिशन अँड नॉलेज अवेअरनेस ङ्गॉर लाइव्हलीहूड प्रमोशन (संकल्प) आणि स्किल्स स्ट्रेंदनिंग ङ्गॉर इंडस्ट्रीअल व्हॅल्यू एन्हान्समेंट (स्ट्राइव्ह) हे संकल्प देशा स्किल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी सज्ज झाले आहेत. संकल्प हा केंद्राकडून प्रायोजित संकल्प हा 4455 कोटी रुपयांचा प्रकल्प असून त्यामध्ये जागतिक बँकेकडून 3300 कोटी रुपयांचे सहकार्य समाविष्ट आहे, तर स्ट्राइव्ह हा 2200 की रुपयांचा सेंट्रल सेक्टर प्रकल्प आहे व त्यातील निम्मी तरतूद जागतिक बँकेच्या सहाय्याने केली आहे. संकल्प व स्ट्राइव्ह हे प्रकल्प त्यांच्या परिणामांवर अधिक भर देणारे असून ते व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण या बाबतीत सरकारचा अंमलबजावणीविषयक दृष्टिकोन केवळ संसाधने देण्याऐवजी परिणामांना महत्त्व देत, त्यासाठी कौशल्यविषयक अनुकूल स्थिती निर्माण करण्याकडे वळला असल्याचे दर्शवतात.

.
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारकडून ‘काळापैसा विरोधी दिन’ साजरा केला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. ‘रिझर्व्ह बँकेशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेत मोदींनी असंघटित कामगार क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. नोटाबंदीमुळे मध्यम आणि लघु उद्योजकांना मोठा फटका बसला,’ असेही राहुल गांधींनी म्हटले.

.
साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

.
मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर आता एका नव्‍या अंदाजात दिसणार आहे. क्रिकेटचा देव सचिन 'कॉमिक बुक हिरो'च्‍या माध्‍यमातून आपल्‍या चाहत्‍यांसमोर येत आहे. २०१४ मध्‍ये प्रकाशित झालेले सचिनचे आत्‍मचरित्र 'प्‍लेईंग इट माय वे' प्रमाणेच कॉमिक हिरोदेखील चाहत्‍यांना आवडेल, अशी चर्चा आहे. कॉमिक हिरो बुक खास करुन मुलांसाठी आहे.

नवी दिल्ली : मुजफ्फरनगरमधील शारडीन स्कूलमधील एका विद्यर्थ्याला शिक्षकाने जोरदार कानिशिलात लगावल्यामुळे विद्यार्थ्याचा डोळा गेला आहे. सफान असं या विद्यार्थ्याचं नाव असून, तो इयत्ता पाचवीत शिकतो. एका लहानशा चुकीसाठी शिक्षकाने त्याला काशिलात लगावली. पण यात त्याचा डोळा निकामी झाल्याचा आरोप होत आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.