जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियमला विजेतेपद

2017-09-29

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियमला विजेतेपद

सातारा: विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवण्याचे सातत्य सातारा इंग्लिश मिडियम स्कूलने कायम राखले आहे. शाहू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात निर्मला कॉन्व्हेंट स्कूल नमवून विजेतेपद मिळवले.
       शाहू स्टेडियम येथे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा झाल्या. सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांनी उपांत्य फेरीत न्यू एरा इंग्लिश मिडीयम स्कूल पाचगणीला २४ -६ असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर  अंतिम फेरीतही उत्कृष्ट खेळ करत निर्मला कॉन्व्हेंट स्कूल ३८ -२१ असे नमवून विजेतेपद मिळवले.

       सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे तन्मय कोकरे, सोहन शेळके, सिध्दार्थ बेलकर, साईराज जाधव, आदित्य पवार, आदित्य जाधव, आर्यन जाधव, कारण डिकोंडा, वरद गवाणे, विरेंद्र गिरी, आकाश शिंदे, कुणाल शिराळे यांनी भाग घेतला. त्यांची निवड निवड दि.६ व ७ ऑक्टोबर रोजी सांगली येथे होणा-या कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी झाली आहे.या संघाला राष्ट्रीय खेळाडू श्री.रोहन गुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

       सर्व विजेत्यांचे अभिनंदन शाळेच्या अध्यक्षा रुपाली गुजर, शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक स्वरूप गुजर, शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी केले.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद जोपासणारी व लोकांच्या जीवनाचे अविभाज्य घटक असणारी, सर्वसामान्य लोकांना आपलीशी वाटणारी एसटी आजपासून मात्र एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे चाकरमानी व प्रवाशांसाठी आज मात्र गैरसोयीची झाल्यामुळे ऐन दिवाळी दिवशी चाकरमानी, प्रवाशांचे दिवाळे काढल्याचे चित्र आज दिसून आले.

पुरात बुडालेल्या भावाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मानसिक धक्क्याने बहिणीचाही मृत्यू झाला. मयत पुष्पा शिवाजी जाधव (वय ४५)यांनाही पुरातून वाचविण्यात आले होते.

सातारा व जावली तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवून आपली सत्ता अबाधीत राखली. काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता आमदार गटाने बहुतांश सर्वच ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. विजेते सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी सुरुचीवर जावून गुलालाची उधळण आणि ङ्गटाक्यांची आतषबाजी केल्याने दिवाळीच्या एक दिवस आधीच सुरुचीवर दिवाळीला प्रारंभ झाला.

गेल्यावर्षी कर्तव्य बजावत असताना आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कॉन्स्टेबल अमोल कांबळे आज अंथरुणाला खिळून आहेत. गेले सव्वा वर्षे कोमात असणार्‍या अमोल कांबळेसाठी हजारो जावलीकर आज झटताहेत. व्यसनमुक्ती संघाचे हभप विलासबाबा जवळ यांनी गेली सव्वा वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या अमोल कांबळेसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

क्रीडा बातम्या


.
sdfds

.
सातारा: फुटबॉल खेळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असून अधिकाधिक युवकांनी फुटबॉल खेळाकडे वळावे. सातारा जिल्हा हा मुळातच शौर्याचा, पराक्रमाचा असून या जिल्ह्याने उत्तोमत्तम राष्ट्रीय खेळाडू दिले. यापुढेही हीच उज्वल परंपरा कायम ठेवून साताऱ्याचे शौर्य, पराक्रम आणि क्रीडेचा मोठा इतिहास पुन्हा तो राज्याचाच नव्हे तर देशाचा मानबिंदू व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज व्यक्त केली.

.
सातारा: फुटबॉल खेळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असून अधिकाधिक यवुकांनी फुटबॉल खेळाकडे वळावे. सातारा जिल्हा हा मुळातच शौर्याचा, पराक्रमाचा असून या जिल्ह्याने उत्तोमत्तम राष्ट्रीय खेळाडू दिले. यापुढेही हीच उज्वल परंपरा कायम ठेवून साताऱ्याचे शौर्य, पराक्रम आणि क्रीडेचा मोठा इतिहास पुन्हा तो राज्याचाच नव्हे तर देशाचा मानबिंदू व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज व्यक्त केली.

.
सातारा: भारत देशात U - 17 वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा दि 6 ते 28 आक्टोबर, 2017 या कालावधित आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मुंबई येथे स्पर्धेतील सामने होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने फुटबॉल खेळाकडे विद्यार्थी आकर्षित करणे, खेळाव्दारे सुदृढता वाढावी, निरोगी राहण्यासाठी शाळा पातळीवर तसेच जिल्हयात महाराष्ट्र फ़ुटबॉलमिशन, १मिलियन या कार्यक्रमाची अंमलबजाबणी करण्यात येत आहे. महाविद्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दि.15 सप्टेंबर, 2017 रोजी मोठया संख्येने विदयार्थी फुटबॉल खेळणार आहेत. याप्रसंगी स्वच्छता हीच सेवा या


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.