हार्ट अटॅक व जीवनशैली

2017-09-28

हार्ट अटॅक व जीवनशैली

आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या  वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…
 

 
लठ्ठ प्रकृती,धूम्रपानाची सवय,व्यायामाचा अभाव,मानसिक ताणतणाव,बैठे काम,सुखवस्तू जीवन, स्निग्ध पदार्थांचा अतिवापर,मधुमेहग्रस्त रुग्ण ही हृदयरोग निर्माण होण्याची महत्वाची कारणे आहेत.पूर्वीच्या काळी वाहतुकीच्या साधनाची कमतरताहोतh.शारीरिक श्रमाची कामे अधिक असत परंतु सध्याच्या यंत्रयुगात शारिरीक श्रमाची जागा बौद्धिक श्रमाने घेतली आहे.जात्यावर घरोघरी दळले जाणारे दळण आता चक्कीवरून दळले जाऊ लागले आहे.एवढेच काय तर पीठही आता दुकानात पॅकींगमध्ये सहजपणे मिळू लागले आहे.आपल्या आयुष्यात आता शारीरिक श्रम किती राहिले आहेत हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.शरीरश्रम कमी झाल्यामुळे शरीराचा इन्शुलीनचा प्रतिसाद कमी होतो त्यामुळे रक्तातील साखर वाढून मधुमेह निर्माण होतो व परिणामस्वरूप रक्तवाहिन्या आकुंचन पावून वा रक्तवाहिन्या अपाचित चरबी साठून हार्ट ॲटकचा धोका संभवतो. डॉ.जोर्जे शीहान या अमेरिकन तज्ञाने यास ‘EXERSIZE DEFICIENCY DISEASE’ म्हणजेच शारिरीक कष्टाच्या अभावी होणारा रोग असे म्हटले आहे. म्हणजेच ह्या आजाराचे मुळ आपल्या जीवनपद्धतीत रोवलेले आहे.आजकाल ‘गोळ्या खात राहा व आजचे मरण उद्यावर ढकला’ अशी आधुनिक विचारसरणी झालेली आहे. परंतु हार्ट ॲटॅकचा धोका टाळण्यासाठी मात्र जीवनपद्धतीतील बदल अत्यंत आवश्यक आहे.

जीवनपद्धतीतील हा बदल प्रामुख्याने आहार,विहार व मानसिक स्वास्थ्याशी संबंधीत आहे.त्यांपैकी प्रथम आहाराचा विचार आपण करू.आहारात कमीत कमी चरबीयुक्त पदार्थाचा समावेश असावा. साखर,तूप,मिठाई,आईसक्रिम यांच्या खाण्यावर नियंत्रण हवे. फॅट अर्थात चरबीचे प्रामुख्याने ३ प्रकार संभवतात.त्यातील पहिला प्रकार म्हणजे सच्युरेटेड फॅट होय.हे प्रामुख्याने प्राणीज असूनमांसाहार व तूप यात मुबलक प्रमाणात आढळते.हे कोलेस्टेरॉल वाढवते.दुसरा व तिसरा प्रकार म्हणजे मोनोअनसच्युरेटेड फॅट व पॉलीअनसच्युरेटेड फॅट होय. हे मात्र कोलेस्टेरॉल वाढवत नाही.हेप्रामुख्याने वनस्पतीपासून मिळते.शेंगदाणा,तीळ,सनफ्लोवर,सरसोचे तेल समभाग मिश्रण करून वापरावे. रोज ४  लहान चमचे अर्थात २० gram पेक्षा जास्त तेल वापरू नये.पूर्वी करडईच्या तेलात हृदयाचे रक्षण करण्याची क्षमता आहे असे दाखविले जात होते.परंतु प्रत्यक्षात मात्र करडईत omega -6 fatty acids आहेत जे हृद्यासाठी हितकारक नाहीत याउलट मासे, अळशीच्या बिया यात omega-3 fatty acids चे जास्त प्रमाण असते जे हृदयासाठी हितकारक आहेत.आहारात फायबरचा (तंतुमय पदार्थ)समावेश हवा.फायबरचे प्रामुख्याने २ प्रकार संभवतात.एक शरीरात न विरघळणारे व दुसरे शरीरात विरघळणारे होय. गव्हाचा कोंडा हे शरीरात न विरघळणारे फायबर होत.पिठातील कोंडा चाळून टाकला कि उरलेल्या मैद्यात फायबर उरत नाही. हे न विरघळणारे फायबर पोट साफ होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. पॉलीश न केलेले तांदूळ,सालीसकट डाळी,बीन्स,गाजर ,रताळे,बटाटा,फळभाज्या,मेथीचे दाणे ही शरीरातील विरघळणारे फायबर होत.हे शरीरातील कोलेस्टेरोल कमी करतात.मेथीच्या दाण्याच्या सेवनाने जेवणानंतरची साखर फार वाढत नाही असा अनुभव आहे.

स्थूल व्यक्तीने वजन कसे कमी होईल याकडे लक्ष पुरवावे. त्याकरीता केलेली एक साधी युक्ती अशी की जेवणाआधी शक्यतो भाज्यांचे सूप,साली,फळे,गाजर ,काकडी इ. सलाड खावून घ्यावेत. जेणेकरून भूक कमी होउन प्रमुख अन्न कमी लागते व उपाशीही राहावे लागत नाही. प्रत्यक्ष जेवणाच्या वेळी गप्पा मारणे, टिव्ही पाहणे,पेपर वाचणे या गोष्टी टाळाव्यात.आंबवलेले पदार्थ कमीत कमी खावेत.वजन किती असावे हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असतो तर आपल्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी जे आपले वजन असते ते आपले आदर्श वजन असावे.
               
व्यायाम हा एक दैनंदिन जीवनाचा भाग आहे. व्यायाम म्हणजे दमछाक होईपर्यंत धावणे,ओझे उचलणे,दंड बैठका काढणे हा गैरसमज समाजात प्रचलित आहे.केवळ जलद गतीने (brisk walking) चालण्यानेही हृदयरोगाचा धोका निम्म्याने कमी होवू शकतो. व्यायामाचेही हलका,मध्यम व तीव्र असे तीन प्रकार संभवतात.उदा.झाडूने घर स्वच्छ करणे हा हलका व्यायाम, जात्याने दळण दळणे हा मध्यम स्वरूपाचा व्यायाम ,कुदळाने जमीनीची सेवा करून झाडे लावणे हा तीव्र स्वरूपाचा व्यायाम होय.या दृष्टीने मला वाटते की हार्ट अटॅक न येवू देण्याच्या दृष्टीने झाडू,जाते,कुदळ ह्या तीन गृहदेवताच आहेत.त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास तरी ह्या व्यायाम प्रकारांचा वापर करण्यास हरकत नाही.

मानसिक ताणताणाव टाळण्यासाठी आणखी एका उपचारपद्धतीचा वापर करावा लागतो तो म्हणजे प्राणायाम व योगोपचाराचा.यामुळे मन:शांती तर मिळतेच पण शारिरीक स्वास्थ्यसुद्धा टिकून राहते.अनुलोम विलोम प्राणायाम यांचा अतिशय उत्तम परिणाम दिसून येतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कपालभाती या उपचारपद्धतीचा उत्कृष्ट फायदा झालेला आहे.परंतु प्राणायाम हा शास्त्रोक्त पद्धतीनेच केला गेला पाहिजे. अशाप्रकारे निरोगी व्यक्तीने याचा वापर करून निरोगी राहावे हीच सदिच्छा.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे


.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.