कासची काळजी घ्याच; पण सातार्‍यातील प्रदूषणही पहा !

2017-09-25

कासची काळजी घ्याच; पण सातार्‍यातील प्रदूषणही पहा !

सातारा(गजानन चेणगे) : युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यामुळे सातारा शहराजवळचे कास पुष्पपठार जगाच्या नकाशावर आले. कासचे पुष्पवैभव पाहण्यासाठी जगातून पर्यटक येत असतात. कासचे हे महत्व लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने कासच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. ही बाब स्वागतार्हच असली तरी, देशविदेशातील पर्यटकांना कासला ज्या सातारा शहरातून जावे लागते, त्या सातार्‍यातील प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष दिसत नाही. त्यामुळे ’कासचे पहाच, पण खाली जरा सातार्‍यातही पहा’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.
सातार्‍यातून कास पुष्पपठार जेमतेम 22 किलोमीटर आहे. सातारा शहरातूनच सुरू होणार्‍या यवतेश्वरच्या घाटातून कासचा रस्ता आहे. कासचे पुष्पवैभव त्या ठिकाणी अनादी काळापासून आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्याचा खूपच बोलबाला झाल्याने येथे पर्यटकांचा ओघ सुरू झाला. त्यात युनेस्कोने कासला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यापासून दरवर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक कासला भेट देत असतात. त्यामुळे कास परिसरात व मार्गावर हॉटेल व्यवसायही बहरला आहे. त्यांच्या सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न आहे. त्या सांडपाण्यामुळे भविष्यात कासच्या सौंदर्याला बाधा पोहोचू शकते अशी भीती पर्यावरणवाद्यांना वाटते. या भीतीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून संबंधितांना यासंबंधी नोटीसा बजावल्या आहेत.
प्रदूषणमुक्त काससाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही भूमिका स्वागतार्हच आहे. कासच्या बाबतीत इतक्या संवेदनशील व हळव्या झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने कासच्या पायथ्याशी असलेल्या सातार्‍यातील प्रदूषणाकडेही त्याच भूमिकेतून पाहण्याची अपेक्षा आहे. पण तितकी संवेदनशीलता दिसत नाही. कासला सातार्‍यातूनच जावे लागते. मग ’कास झकास अन सातार्‍यात भकास’ असे चित्र चांगले दिसते का याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपतींची राजधानी राहिलेल्या सातारा शहराबाबत पर्यटकांमध्ये प्रचंड औत्सुक्य असते. पण येथे आल्यावर व येथील परिस्थिती पाहिल्यावर पर्यटकांमध्ये सातार्‍याविषयी काय भावना निर्माण होईल याचाही संवेदनशील प्रदूषण नियंत्रण मंडळाने अभ्यास करायला हरकत नाही.
सातार्‍यात घराघरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी नगरपालिकेच्या घंटागाड्या फिरत असतात. तरीही रस्त्यावरील कचराकुंड्या ओसंडून वाहतानाचे दृश्य पहायला मिळते. पण त्यापेक्षा शहरातील वैद्यकीय कचर्‍याचा प्रश्‍न अतिशय गंभीर आहे. गेल्या दशकभरात शहरात अनेक स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी रूग्णालयांचा तसेच लॅबचा पसारा वाढला आहे. अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सातारा हे मेडिकल हब होत आहे. या असंख्य रूग्णालयांच्या वैद्यकीय कचर्‍याच्या प्रश्‍नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. 
वैद्यकीय कचर्‍यात विविध औषधे, त्यांची रॅपर्स, सुया, शस्त्रक्रिया करून मानवी शरीरातून काढलेला भाग, रक्त, रक्ताने माखलेला काप्ाूस, कपडे आदिंचा समावेश होतो. हा कचरा रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने रस्त्यावर, ओढ्यात अशा ठिकाणी टाकायचा नाही. उघड्यावर टाकल्यास त्यातून अनेक धोके उद्भवण्याची शक्यता असते. मोकाट जनावरांनी त्यातील काही खाल्यास त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ओढ्यात टाकल्यास या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहत जावून नदीत मिसळतील. पाणी योजनांमधून हे पाणी लोकांपर्यंत येईल. हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अपायकारक आहे. वैद्यकीय कचरा टाकलेले पाणी जमिनीत मुरल्यास कूपनलिकेतून ते आरोग्याला हानी पोहोचवेल. या गोष्टी रोगराईला निमंत्रण देणार्‍या आहेत. म्हणून वैद्यकीय कचर्‍याची साठवणूक व विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने झालीच पाहिजे.
वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात कायदे पुरेसे सुस्पष्ट आहेत. त्यामध्ये यासंदर्भात कशी दक्षता घ्यायची याच्या तरतुदी, मार्गदर्शक सूचना आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्राधिकृत केलेल्या एजन्सीचे सदस्यत्व वैद्यकीय व्यावसायिकांनी घेतले पाहिजे. दररोजचा वैद्यकीय कचरा त्या एजन्सीने दिलेल्या बॅगमध्ये एकत्रित साठवला पाहिजे व त्या एजन्सीची गाडी आल्यानंतर त्यांच्याकडे तो सुपुर्द केला पाहिजे. याबाबतीत नेमके काय घडते याचा तपास घेण्याची गरज आहे. शहरात विविध रूग्णालयांच्या परिसरात शोध घेतल्यास वैद्यकीय कचरा रस्त्यात उघड्यावर तसेच शहरातून वाहणार्‍या विविध ओढ्यात टाकल्याचे भयावह चित्र पहायला मिळते. यावरून या समस्येबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळ किती दक्ष आहे ते दिसून येते. शहरातील वैद्यकीय कचर्‍याच्या बाबतीतले चित्र असेच राहिल्यास सातारकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावधान होण्याची गरज आहे. म्हणूनच प्रदूषण नियंत्रण मंडळाने कासच्या पर्यावरणाची जरूर काळजी घ्यावी, नव्हे ती घेतलीच पाहिजे. त्याबाबतची त्यांची भूमिकाही चांगली आहे. पण त्याबरोबर कासच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक सातार्‍याचे सौदर्य व आरोग्य जपावे अशी अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत.

विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट पध्दत 
          वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठीही विशिष्ट पध्दत व यंत्रणा आहे. जाळलेल्या पदार्थांचा धूरसुध्दा वातावरणात मिसळू नये याची काळजी घ्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. कारण हा धूर आरोग्याला हानीकारक असतो. हा कचरा जाळल्यानंतर त्याचा धूर पाण्यात पकडला जातो व नष्ट केला जातो.

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.