अधिकाधिक युवकांनी फुटबॉल खेळाकडे वळावे: विजय शिवतारे

2017-09-15

अधिकाधिक युवकांनी फुटबॉल खेळाकडे वळावे: विजय शिवतारे

सातारा:  फुटबॉल खेळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असून अधिकाधिक युवकांनी  फुटबॉल खेळाकडे वळावे.  सातारा जिल्हा हा मुळातच शौर्याचा, पराक्रमाचा असून  या जिल्ह्याने उत्तोमत्तम राष्ट्रीय खेळाडू दिले. यापुढेही हीच उज्वल परंपरा कायम ठेवून साताऱ्याचे शौर्य, पराक्रम आणि क्रीडेचा मोठा इतिहास पुन्हा तो राज्याचाच नव्हे तर देशाचा मानबिंदू व्हावा, अशी अपेक्षा  पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज व्यक्त केली.

“महाराष्ट्र मिशन फुटबॉल १ मिलियन” व “स्वच्छता हीच सेवा” या उपक्रमाचा शुभारंभ आज श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुलात पालकमंत्री  श्री. शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, नगराध्यक्ष डॉ. माधवी कदम, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुनिता गुरव, सातारा नगर परिषदेचे गटनेते धनंजय जांभळे यांच्यासह अनेक नगरसेवक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी स्वच्छता ही सेवा स्वच्छतेबाबतची शपथ दिली.

विविध क्षेत्रांमध्ये सातारा जिल्ह्याने  राज्यात स्वत:चे असे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे सांगून पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले,  सातारा जिल्ह्याने अनेक नामवंत क्रीडा पट्टु दिले आहेत. यामध्ये खाशाबा जाधव व माणसारख्या तालुक्यातील ललिता बाबर यांच्या नावांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.  माण व खटाव तालुक्यांनी प्रशासकीय सेवेत अनेक नामवंत अधिकारी दिले आहेत.

जिल्ह्यात स्वच्छतेची चळवळ उभी करावी- पालकमंत्री

15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत स्वच्छता हीच सेवा ही मोहीम महाराष्ट्र शासनामार्फत  राबविण्यात येणार आहे.सातारा जिल्ह्यातील प्रशासनाने यात आघाडी घेतली आणि जिल्ह्यातील 11 तालुके आणि संपूर्ण 1490  ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत ची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारणीचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व नागरी संस्थांनी नागरिकांचा सहभाग घेवून ही मोहीम सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून स्वच्छतेची व्यापक लोक चळवळ उभी करावी. यासाठी प्रत्येक मुलाने स्वच्छता दूत म्हणून काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी शेवटी केले.

 

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याने अनेक नामवंत क्रीडापट्टु दिले असून साताऱ्याच्या  श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी खेळाला विशेष प्रोत्साहन दिले होते. आपल्या देशातील क्रीडा स्पर्धक ऑलिंपिकमध्ये चमकली पाहिजेत, अशी अपेक्षा करुन ते पुढे म्हणाले, स्वच्छतेची शपथ घेवून चालणार नाही प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता आपल्यात अंगीकारली पाहिजे यासाठी आपल्या परिसरातून स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, असे सांगून त्यांनी   शेवटी 17 वर्षा खालील होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघास शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, जिल्हा प्रशासनामार्फतही 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत स्वच्छता हीच सेवा ही मोहीम राबविण्यात आहे. जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेला महत्व दिले असून जिल्ह्यातून सर्व ग्रामपंचायतींमध्ये गांडूळ खत निर्मितीचे प्रकल्प सुरु केले आहेत.  त्याचबरोबर नगर पालिकेंच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. फुटबॉल हा खेळ आरोग्यासाठी लाभदायक असून या खेळाकडे युवकांनी वळावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

      या कार्यक्रमास विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

क्रीडा बातम्या

.
डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणा-या महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला. फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुणेकरांनी बाजी मारली. पुरूषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.

.
भारतीय संघाने सहाव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव करत मालिका ५-१ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत सर्व गडी गमवत २०४ धावांचं लक्ष्य भारताला दिलं. प्रत्युत्तरात भारताने फक्त ३२.१ षटकांत २ गडी गमवत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला.

.
केरळ येथील कोयकँड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पियनशिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देशमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातून चमकदार कामगिरी केली असून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. सहाव्या राष्ट्रीय फुटव्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर खरात, लोणारी या दहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.

.
सन २०१६-१७ चे शिवछत्रती क्रीडा पुरस्कार आज जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबई विभागातून नेमबाजी (रायफल शूटिंग) या क्रीडा प्रकारात रुचिरा अरुण लावंड हिचे नाव जाहीर झाले आहे. रुचिरा वयाच्या १३ व्या वर्षांपासून या खेळात पारंगत आहे.

.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूच्या एकेरी आण दुहेरीतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने भारताने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने हाँगकाँगला ३-२ अशी मात दिली. सायना नेहवालने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेचे नेतृत्व सिंधूकडे सोपवण्यात आले असून नेतृत्वाला साजेशा खेळ करत सिंधूने भारताला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.