औषध कंपन्या, विक्रेत्यांची मनमानी

2017-09-10

औषध कंपन्या, विक्रेत्यांची मनमानी

सातारा(गजानन चेणगे) : औषधांच्या आवाक्याबाहेरच्या किमती व औषधविक्रेत्यांचा मनमानीपणा यामुळे नियमित औषधोपचार घ्यावे लागणार्‍या रूग्णांची आर्थिकदृष्ट्या कोंडी होत आहे. त्यातच औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनी काही औषधांच्या दहाऐवजी पंधरा गोळ्यांच्या स्ट्रिप्स तयार करून नवीन संकट निर्माण केले आहे. विक्रेत्यांकडून मागणीप्रमाणे गोळ्यांऐवजी संप्ूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. रूग्णांची ही लूट थांबवण्यासाठी औषध प्रशासन काहीच करत नसल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग आदी विविध आजारांवर रूग्णांना नियमित व दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. विविध तपासण्या, रूग्णालयांची बिले भरून आधीच कंबरडे मोडत आहे. दरमहा औषधांचा खर्च वाढल्याने लोक मेटाकुटीला येत आहेत. त्यात औषध कंपन्या व विक्रेत्यांच्या मनमानीमुळे रूग्णांची अवस्था केविलवानी होत आहे. एकतर औषधांच्या किमती तुलनेत जास्त आहेत. यातील नफेखोरी रोखण्यासाठी सरकार काहीच करत नाही. 
अलीकडे कंपन्यांनी बर्‍याच औषधाच्या पंधरा गोळ्यांच्या स्ट्रिप्स काढल्या आहेत. त्या हिशेबाने त्या स्ट्रिपची किंमतही वाढते. सर्वसामान्य रूग्णांना खिशाचा सल्ला घेऊन गोळ्या खरेदीचा निर्णय घ्यावा लागतो. जवळ जास्त पैसे नसतील, तर रूग्ण डॉक्टरांनी दहा दिवसांचा कोर्स दिला असल्यास पाच दिवसांच्या किंवा महिन्याचा कोर्स दिला असल्यास दहा दिवसांच्या गोळ्या घेत असतात. आर्थिक उपलब्धतेप्रमाणे नंतर गोळ्या घेऊन ते कोर्स प्ाूर्ण करतात. अशावेळी औषध विक्रेते त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे औषधे देत नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. पाच गोळ्या हव्या असतील तरी पंधराची स्ट्रिप घेण्याची सक्ती केली जाते. गोळ्या चुकवता येत नाहीत. चुकवल्या तर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे रूग्णांची दोन्ही बाजुंनी कोंडी होत आहे. औषध प्रशासनाने ही बाब गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
वास्तविक औषध विक्रेत्यांनी ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे औषधे दिलीच पाहिजेत. शिवाय स्ट्रिपच्या काप्ाून दिलेल्या भागावर औषधाचे नाव असले पाहिजे. म्हणजेच त्या हिशेबाने जास्त प्रमाणात नाव छापले पाहिजे. परंतु अनेक औषधांच्या बाबतीत ही त्रुटी दिसून येत आहे. त्याकडेही औषध प्रशासनाचे लक्ष नाही. औषधाचे नाव नसलेला भाग ग्राहकाला दिला गेला आणि रूग्णाने चुकीचा डोस घेतला तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही जबाबदारी कोणाची ?
सरकारने केवळ घोषणाबाजीत न रमता औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, औषध कंपन्यांनी गोळ्यांच्या दहाच्याच स्ट्रिप्स तयार कराव्यात, त्यावरील नावाच्या बाबतीत दक्षता घेतली जाते की नाही याची औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी, ग्राहकांच्या मागणीप्रमाणे विक्रेत्यांनी औषधे द्यावीत, त्यांच्यावर अख्खी स्ट्रिप खरेदी करण्याची सक्ती करू नये. औषध प्रशासनाने याबाबतीत कठोर उपाययोजना करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.