फाळणीपूर्व भारत-पाकिस्तानवर प्रकाश टाकणारा 'व्हाईसरॉय हाऊस'

2017-08-29

फाळणीपूर्व भारत-पाकिस्तानवर प्रकाश टाकणारा 'व्हाईसरॉय हाऊस'

दुसरे महायुद्ध जिंकूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक बाजू लंगडी झाली होती. दुसरे महायुद्ध संपून काही वर्षे लोटूनसुद्धा ब्रिटनची आर्थिक गाडी रुळावर यायला तयार न्हवती. एकेकाळी ज्या साम्राज्यात सूर्यसुद्धा मावळत नव्हता, त्या ब्रिटीश साम्राज्याचा अस्त होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हजारो वर्षाचा सांस्कृतिक वारसा असणार्‍या भारतावर ज्या ब्रिटीश राजसत्तेने दीडशे वर्षे राज्य केले, असा देश फक्त सहा महिन्यांमध्ये सोडावा लागतोय. अठरा पगड जाती, शेकडो भाषा बोलल्या जाणार्‍या व चाळीस कोटी लोकसंख्या असणार्‍या भारताची फाळणी करणे ब्रिटीश राज्यसत्तेसाठी जिकिरीचे काम ठरले होते. तत्कालीन व्हाईसरॉय ऑर्चबिट व्हॉवेल यांची भारत आणि पाकिस्तानची फाळणी करुन देणे ताकदीच्या पलिकडचे होते. त्यामुळे 10 डाऊनिंग स्ट्रीटवरुन क्लेमेट अँटलीचा खलिता आला आणि व्हॉवेल यांना मायदेशी बोलविण्यात आले. राणी व्हिक्टोरिया आणि क्लेमेट अँटली यांनी भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणून एका नावावर शिक्कामोर्तब केले होते आणि ते नाव म्हणजे लॉर्ड माऊंटबॅटन.
राणी व्हिक्टोरियाचा नातू असलेला आणि 46 वर्षाच्या, साडेसहा फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्‍चिमेपासून पूर्वेपर्यंत पसरलेल्या भारताची आणि त्यातील चाळीस कोटी लोकांच्या मानसिकतेची खडानखडा माहिती असणार्‍या लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणून तत्कालीन व्हाईसरॉय हाऊस (आताचे राष्ट्रपती भवन) मध्ये नजर पोहोचेल तोपर्यंतच्या हिरवळीवर आपले पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि तिथूनच खर्‍या अर्थान प्रवास सुरु झाला भारत आणि पाकिस्तान या नवनिर्मितीच्या उंबरठ्यावर असणार्‍या देशांचा. 
डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी क्वॉलिस या आंतरराष्ट्रीय पातळीवर लेखण करुन प्रसिद्ध झालेल्या जोडगोळीने लिहिलेल्या 'फ्रिडम ऍट मिडनाईट' मध्ये आपण या गोष्टी सविस्तर वाचलेल्याच आहेत. भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिक गुरींदर चढ्ढा या प्रतिभाशाली हॉलिवूड दिग्दर्शिकेने नुकताच भारतीय स्वातंत्र्या दिनाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट  रोजी प्रदर्शित  झालेल्या 'व्हाईसरॉय हाऊस' या हॉलिवूडपटाच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान फाळणी होण्याच्या अगोदर सहा महिने व्हाईसरॉय हाऊसमध्ये ज्या सूक्ष्म घडामोडी घडल्या, त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
बिकन (डुकराचे खारवलेले मांस) न्याहरीला आणि संध्याकाळी स्कॉच व्हिस्किचे दोन पेग रिचविल्याशिवाय ज्याची दिवसाची भैरवी होत नव्हती, या इस्लामला हराम असलेल्या गोष्टी दैनंदिन करणारा माणूस पाकिस्तानचा राष्ट्रनिर्माता होतो.मोहंम्मद अली जिना या पाकिस्तानच्या जनतेच्या मनावर गारुड घालणार्‍या व्यक्तिमत्वाची झलक या चित्रपटामध्ये खुमासदारपणे दाखविण्यात आलेली आहे. 
कॉंग्रेस मुस्लिम लीगमधील नेत्यांची आपापली वेगळी राष्ट्रे निर्माण करण्यासाठी चाललेला आटापिटा, चौधरी रेहमत अली गुज्जर ज्यांना नक्श-ए-पाकिस्तान म्हणतात. ज्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे, यांनीच खरी वेगळ्या पाकिस्तानची पहिल्यांदा मागणी केली होती. नेहरु आणि लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्या नाजुक नात्यांवरही या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे.
व्हाईसरॉय हाऊसमध्ये त्याकाळी हिंदू-मुस्लिम आणि शीख समुदायातील सुमारे पाचशे स्त्री आणि पुरुष नोकर म्हणून सेवा करीत होते. त्यांचे आणि माऊंटबॅटन कुटूंबियांचे त्याकाळी ऋणानुबंध जुळले होते. या सगळ्यांच्या धर्माबद्दल असणारी एकमेकांबद्दलची आपुलकी आणि फाळणीनंतर झालेली ताटातूट या हृदयस्पर्शी घटना काळजाचा ठाव घेतात.
नेहरु, गांधी आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यामध्ये जुळलेली मैत्री, तसेच महात्मा गांधी यांनी फाळणीच्या पार्श्‍वभूमीवर देशभर काढलेली भारत जोडो यात्रा या सर्वच गोष्टी संक्षिप्तरुपाने या चित्रपटामध्ये दाखविल्या गेल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या फाळणीमुळे दोन्ही देशातील लोकांना मोठी किंमत मोजावी लागली. सर रेडक्लिफ यांना सीमारेषा निश्‍चितीसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्यातील आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यातील जुगलबंदीही अत्यंत खुमासदार पद्धतीने या चित्रपटात दाखविण्यात आलेली आहे.
भारतीय वंशाच्या ब्रिटीश नागरिक गुरींदर चढ्ढा यांनी व्हाईसरॉय हाऊसच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान फाळणीपूर्व काळ अतिशय कलात्मकतेने चित्रबद्ध केला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ह्यूज बॉंनविले याने लॉर्ड माऊंटबॅटनची भूमिका अतिशय ताकदीने साकारली आहे. जिलियन अँडरसन हिने लेडी एडमिना माऊंटबॅटनची व्यक्तिरेखा साकारली आहे. दिवंगत अभिनेते ओमपुरी, अभिनेत्री हुमा कुरेशी, भारतीय वंशाचा ब्रिटीश अभिनेता मनीष दयाल यांनीही अतिशय ताकदीने आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पॉल मायेदा बर्गस्, मोयला बफिनी यांनी चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत, तर ऑस्कर पुरस्कार प्राप्त भारतीय संगितकार ए.आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत देण्याचे काम केले आहे. जवळजवळ  80 टक्के चित्रपट हा भारतातच चित्रित झाला आहे. तत्कालीन काळ व वातावरणाची सांगड घालण्यात गुरींदर चढ्ढा यांना यश आले आहे.
हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी भारतामध्ये प्रदर्शित झाला. परंतू प्रेक्षकांची वाणवा असल्यामुळे आणि जास्त प्रमाणात  चित्रपटगृह न मिळाल्यामुळे या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. संगीत व प्रणयप्रधान चित्रपटांसाठी चटावलेल्या भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 1 सप्टेंबर रोजी हा चित्रपट पुन्हा जगभर प्रदर्शित होत आहे. तसेच भारतीय प्रेक्षकांसाठी खास हिंदी भाषेमध्ये डब केला आहे. 
भारत-पाकिस्तान फाळणी ही प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकासाठी भळभळती जखम आहे. शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी अतिशय चातुर्याने कॉंग्रेस आणि मुस्लीम लीग यांना खिशात ठेवून भारत-पाकिस्तान फाळणी केली. परंतू दोन्ही बाजूंकडून होणारा रक्तपात ते टाळू शकले नाहीत. आपणच आपल्या हाताने आपल्या दीडशे वर्षाच्या साम्राज्याची फक्त सहा महिन्यांमध्ये राखरांगोळी करतोय, याची भावना व्हाईसरॉय हाऊसच्या माध्यमातून लॉर्ड माऊंटबॅटनच्या चेहर्‍यावर पदोपदी जाणवते. अतिशय कौशल्याने चित्रबद्ध केलेली ही कलाकृती राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील लोकांनी जरुर पहावी. देशातील नवीन पीडिला हा इतिहास काय होता हे किमान कळाले तरी पाहिजे, जेणेकरुन फाळणीपूर्व भारत कसा होता, हे याची देही याची डोळा पाहता येणार आहे.
-संग्राम निकाळजे 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद जोपासणारी व लोकांच्या जीवनाचे अविभाज्य घटक असणारी, सर्वसामान्य लोकांना आपलीशी वाटणारी एसटी आजपासून मात्र एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे चाकरमानी व प्रवाशांसाठी आज मात्र गैरसोयीची झाल्यामुळे ऐन दिवाळी दिवशी चाकरमानी, प्रवाशांचे दिवाळे काढल्याचे चित्र आज दिसून आले.

पुरात बुडालेल्या भावाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मानसिक धक्क्याने बहिणीचाही मृत्यू झाला. मयत पुष्पा शिवाजी जाधव (वय ४५)यांनाही पुरातून वाचविण्यात आले होते.

सातारा व जावली तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवून आपली सत्ता अबाधीत राखली. काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता आमदार गटाने बहुतांश सर्वच ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. विजेते सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी सुरुचीवर जावून गुलालाची उधळण आणि ङ्गटाक्यांची आतषबाजी केल्याने दिवाळीच्या एक दिवस आधीच सुरुचीवर दिवाळीला प्रारंभ झाला.

गेल्यावर्षी कर्तव्य बजावत असताना आनेवाडी टोलनाक्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कॉन्स्टेबल अमोल कांबळे आज अंथरुणाला खिळून आहेत. गेले सव्वा वर्षे कोमात असणार्‍या अमोल कांबळेसाठी हजारो जावलीकर आज झटताहेत. व्यसनमुक्ती संघाचे हभप विलासबाबा जवळ यांनी गेली सव्वा वर्षे अंथरुणाला खिळून असलेल्या अमोल कांबळेसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

पेज3 बातम्या

.
सध्या प्रसिद्ध सिनेनिर्माता हार्वी विनस्टीनच्या सेक्स स्कँडलने हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. पण सुपरस्टार प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्याचे गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना याबाबतची माहिती दिली.

.
मुंबई : सोनी टीव्हीवरील वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ ही मालिका अखेर बंद करण्यात आली आहे. मालिकेचा एपिसोड काल (28 ऑगस्ट) टेलिकास्ट झाला नाही.


.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. तिने एक आठवड्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘फुकरे रिटर्न्स’ ट्रेलर लॉन्च प्रसंगी ती उपस्थित होती. मास्क लावलेला एक फोटो रिचाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आप नेता कुमार विश्वास यांना कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.