रेशीम धाग्याचे 'वाई ' ऋणानुबंध ......!!

2017-08-23

रेशीम धाग्याचे 'वाई ' ऋणानुबंध ......!!

                   तलम वस्त्र म्हटल की डोळ्याच्या समोर येत ते रेशीम ...... ते रेशीम भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.... याचे दाखलेच द्यायचे झाले तर अगदी सातवाहन काळापर्यंत मागे जाता येते. भारतातून ग्रीक आणि रोमन या सभ्यतेला आपल्या कडून हे अतिउच्च प्रतिचे वस्त्र पुरविले जायचे ...... सातवाहनांची राजधानी  प्रतिष्ठान नगरीतून पैठणीची मागणी  मोठ्या प्रमाणावर असल्याचे उल्लेख आहे तसेच कोसल्याचेही काम कापड विनकामासाठी व्हायचे त्यामुळे रेशमाला अनन्य साधारण महत्व सुरुवाती पासूनच होते. औद्योगिक क्रांतीनंतर कापड निर्मितीत मोठी क्रांती झाली मानवी बळावर करायची कामे अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने होवू लागली त्यामुळे कमी मनुष्य बळात भरपूर काम होवू लागल्यामुळे या व्यवसायाचे सूत्र बदललेवाई आणि परिसरात  जुन्याकाळापासून रेशीम काढण्याचे काम होत असे ..... आता राज्य शासनाने वाईत रेशीम पार्क तयार केला आहे..... त्या पार्कचा लेखाजोखा या लेखात मांडण्यात आला आहे.

 

              जिल्हा रेशीम कार्यालयाची स्थापना  रेशीम संशोधन  केंद्र म्हणून  वाई येथे सन 1958 रोजी करण्यात आली. सन 1980 सालापर्यंत वाई हे महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचे मुख्यालय होते. रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश ठेवून स्थापन केलेल्या उद्योगामध्ये रेशीम उद्योगामधील वेगवेगळ्या रेशीम किटकांच्या जाती, तुतीच्या जाती यावर संशोधनही झाले. महाराष्ट्र हे रेशीम उद्योगासाठी अपारंपारीक राज्य असल्याने केंद्रीय रेशीम मंडळाच्या सहाय्याने येथे रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी प्रशिक्षण पथदर्शक फार्म, रिलींग केंद्र, कापड विक्री, शेतकरी - विद्यार्थी प्रशिक्षण व देशविदेशातील पर्यटक भेटी अशा विविध पातळीवरील कार्यरत असणारे महाराष्ट्रातील केंद्र सिल्क व्हॅली म्हणून प्रसिध्द आहे. गेल्या दशकापासून जिल्ह्यातील या केंद्रावर मोठ्या प्रमाणात रेशीम क्रांती झालेली आहे. रेशीम शेतकऱ्यांनी या उद्योगाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्ह्यात 311 रेशीम उद्योजक शेतकरी 319 एकर क्षेत्रावर मानकानुसार रेशीम कोषांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना सुधारीत तुतीच्या जाती व कोषांच्या जातींचा अंडीपुंज पुरवठा जिल्हा रेशीम कार्यालया मार्फत केला जातो. हे केंद्र अजूाही जुन्या वास्तू व साधासामुग्रीवर चालू आहे.

                वाई हे ठिकांण कृष्णातीरी ऐतीहासीक व प्रेक्षणिय स्थळ असून पाचगणी महाबळेश्वर या पर्यटन स्थळापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटन दृष्ट्या वाई हे महागणपतीसाठी प्रसिध्द आहे.  अशा ठिकांणी असणाऱ्या ऐतीहासीक रेशीम उद्योग केंद्राची सुरवात ज्या परिसरातून झाली  त्या वास्तुचे नुतनिकरण करण्यात आले आहे. या रेशीम केंद्रावर दरवर्षी सर्वसाधारण 10 ते 15 हजार पर्यटक, विद्यार्थी शैक्षणिक सहली, विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात. रेशीम उद्योगाची माहिती घेतात व कुतुहलाने कापड व संपूर्ण रेशीम प्रक्रीयेची माहिती मागतात जी सर्वतोपरी दिली जाते.

                    जिल्हा रेशीम कार्यालय, वाई जि. सातारा येथील म्युझीयम/चलचित्रगृह मध्ये लहान अळी संगोपानापासूान ते रेशीम कापड तयार करणे पर्यंत संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. सदर काम हे तीन टप्यामध्ये करण्याचे नियोजित आहे. प्रथम टप्यामध्ये चलचित्रगृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये रेशीम कार्यालय, वाई येथील उपलब्ध जागेतील प्रोजेक्टर लावून रेशीम उद्योगा संदर्भात परिपूर्ण माहिती दाखविण्यात येते सदर चलचित्रगृहाची क्षमता 50 प्रेक्षकांची आहे. सदर चलचित्रगृहासाठी संचालानालयामार्फत रेशीम उद्योगा संदर्भात माहितीपट दाखविण्यात येत आहे. रेशीम उद्योग हा महाराष्ट्रामध्ये अपारंपारीक उद्योग असल्याने बहूतांश जनतेला त्या संबंधि परिपूर्ण व शास्त्रोक्त माहिती नसल्या कारणाने हा माहितीपट त्यांना एकपथदर्शक प्रयोग ठरत आहे. सदर माहिती पट हा 20 मिाटिांचा असून त्यामध्ये अंडीपुंज निर्मिती ते रेशीम कापड तयार करणे पर्यंत संपूर्ण माहीती देण्यात आली आहे. सदर चलचित्रगृह हे जुन्या उपलब्ध असलेल्या इमारतीचे नुतनीकरण करुन उभारले आहे. त्यामध्ये 50 खुर्चांची खरेदी करुन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच माहितीपट दाखविण्यासाठी प्राजेक्टर, साउंड सिस्टीम, डीव्हीडी प्लेअर इत्यादी अनुषंगीक सामुग्री खरेदी केले आहे. सदर चलचित्रगृह शेतकरी चर्चासत्र व प्रशिक्षणासाठी ही उपयुक्त ठरत आहे.

               वाई रेशीम पथदर्शक फार्मवर उपलब्ध असलेल्या जुन्या 3500 स्के.फुट इमारतीचे नुतनीकरण करुन संग्रालय निर्मिती केली आहे. निसर्गातील चार ही प्रकारचे रेशीम म्हणजेच 1) तुती रेशीम 2) टसर रेशीम 3) एरी रेशीम 4) मुगा रेशीम या जातींचे कोष कापड प्रकीया दुर्मिळ मशिनरी, पुस्तके माहितीपत्रक, भिंत्तीचित्रे व कापड इत्यादी प्रकारचे दालन तयार करुन संग्रहीत करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे रेशीम शेतकरी, उद्योजक, पर्यटक व विद्यार्थी यांना  रेशीम उद्योगाची संपूर्ण माहीती याद्वारे देण्यात येईल.

                 सदर म्युझीयम मध्ये कोष खरेदी प्रक्रिया कोष शिजवणेची प्रक्रिया उपलब्ध असलेल्या कॉटेज बेसिन मशिनवर धागा तयार करणे, रि-रिलींग करणे, लडी तयार करणे, व्टिस्टींग करणे व हातमागावर कापड तयार करणे इत्यादी  प्रात्यक्षिके उभी करण्यात येत आहेत. त्याच बरोबर टसर कोषापासून धागा निर्मितीचे मशीनसुध्दा उभारण्यात आले आहे.

               वाई येथील पथदर्शक फार्म, म्युझीयम व चलचित्रगृहाला भेट दणाऱ्या पर्यटकांसाठी रेशीम    चिंता-मंथा कुटीची उभारणी उपलब्ध असलेल्या जागेत नुतनीकरण करण्यात आली आहे. सदर कुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची बैठकीची व जेवण अल्पोपहार बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

                वाई येथील पथदर्शक फार्म हा नैसर्गीक साधन सामुग्रीने संपन्न आहे. फार्मवर वड, पिंपळ, लिंब, निलमोहर, गुलमोहर, आंबा, जांबुळ व फुलझाडे अशी विविध प्रकारची वृक्ष संपदा असुन यामध्ये विविध जातीचे पक्षी प्रमुख्याने मोरांचे वास्तव्य आहे. सदर झाडावर मचान व कुटी उभारण्याचे नियोजन केलेले आहे. ज्यामुळे पर्यटकांना निसर्गाची जवळून अनुभूती घेता येईल.

              त्या प्रमाणे लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क उभारण्याचे नियोजन केले आहे.  कार्यालया अंतर्गत असणाऱ्या पथदर्शक फार्मवर सिंचन विहीर ठिबक सिंचन रेशीम किटक संगोपनगृह तुती रोप वाटीका, रेशीम तुती लागवड अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

               त्याच प्रमाणे वाई पथदर्शक फार्मवर तुती रोपांच्या ट्री व्हरायटीज तयार करण्यात आल्या आहेत. अर्जुन, एैन  या झाडांचे वृक्षारोपन भंडारा येथून रोपे मागवून घेवून करण्यात आली आहे. अर्जुन व एैन टसर रेशीम प्रजातीसाठी खाद्यान्न वृक्ष आहेत. एरी जातीच्या प्रजातीसाठी स्थानिक पातळीवरुन एरंडी बियाणे लावून एरंडीची झाडे तयार करण्यात आली आहेत. सदर झाडांच्या लागवडीमुळे रेशीम किटकांच्या चारही प्रमुख प्रजातीचे संगोपन वाई येथील रेशीम पथदर्शक फार्म करण्याचे नियोजजिले आहे. ज्यामुळे पर्यटकांना शेतकऱ्यांना व विशेषत: विद्यार्थ्यांना रेशमाच्या प्रमुख चारही जातींचे संगोपन एकाच ठिकांणी पहाता येईल.           

                        तशाच प्रकारे रेशीम उद्योगावर आधारीत प्रकाशने सर्वसामान्य वाचकांसाठी काही संबंधित पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. 

                   दुसऱ्या टप्यामध्ये, रेशीम उद्योगाची सुरवात ज्या ऐतिहासिक ठिकाणा पासून झाली  त्या जिल्हा रेशीम कार्यालय, वाई जि. सातारा येथे वाई-1, वाई-4, वाई-7 या रेशीम किटकांच्या प्रजाती विकसीत करण्यात आल्या त्या वाईचे हवामान हे तांत्रीक व वैज्ञानिक कारणास्तव प्रयोगासाठी (Research & Development) योग्य असून सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये एकही संशोधन तथा विकास प्रयोगशाळा नसल्याने अशा प्रकारच्या (Research & Development)  लॅब ची सुरवात करण्याचे नियोजन आहे.  यामध्ये माती परिक्षण, पाणी परिक्षण, तुतीच्या नवीन प्रजाती व किटकांवर प्रयोग करण्यात येवून महाराष्ट्रातील भौगोलीक परिस्थितीनूसार सुधारीत खतांच्या मात्रा, तुतीच्या जाती विकसीत करण्यात येवून त्यांच्या शिफारशी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

                      त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, संशोधन तथा विकास प्रयोगशाळा (Research & Development) चलचित्रगृह व संग्रहालय याची गरज या जिल्हा रेशीम कार्यालयास आहे. रेशीम केंद्रावर दर वर्षी सर्व साधारणपणे 200 शेतकऱ्यांचे तुती लागवड व किटक संगोपनचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यामध्ये तुती लागवडीपासून ते कोष विक्री पर्यंतचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शा करण्यात येते. त्यासाठी शेतकरी प्रशिक्षण हॉल दुरुस्तीचे आयोजन आहे.  त्याप्रमाणे फार्मवरील पूर्ण रस्त्याच्या कामाचे नियोजनही या टप्यामध्ये करण्यात आले आहे.  
                   
--- युवराज पाटील,  

जिल्हा माहिती अधिकारी ,

सातारा


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.