विघ्न टाळावे वीज अपघाताचे...

2017-08-21

विघ्न टाळावे वीज अपघाताचे...

 बारामती: 

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीज अपघाताचे विघ्न टाळण्याची.
        वीज दिसत नाही, मात्र तिचे परिणाम भयावह व जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे आद्य कर्तव्य आहे. कारण पथदिव्यांवरून, घरातून किंवा आकडे टाकून घेण्यात येणारा अनधिकृत वीजपुरवठा हा कोणत्याही क्षणी कोणत्याही अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. 

        महावितरणने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी प्रतियुनिट ३ रुपये १० पैसे अधिक एक रुपया २१ पैसे वाहन आकार; तसेच इंधन अधिभार असे वीजदर ठेवले आहेत. आयोजकांनी अशा उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, हा कमी दर ठेवण्यामागील हेतू आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अधिकृत वीजपुरवठा घेण्यास सार्वजनिक मंडळांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी थोडाफार खर्च कमीअधिक करता येईल, पण वीजपुरवठ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.  

        सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक गणपतीच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी तेथील वीजवहन यंत्रणा योग्य आणि अपघातविरहित असणे आवश्यक आहे. मंडप, स्टेज व इतर साहित्य महावितरणच्या विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवातील मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेतली पाहिजे. गणेशोत्सवात विविध कामांसाठी करण्यात येणारी वायरिंग ही योग्य तसेच दोषविरहित, धोकाविरहित असणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी विजेचे वायर्स विस्कळीत स्वरूपात राहणार नाहीत, याची पुरेपुर काळजी घेतली पाहिजे.
        सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. केवळ काटकसर म्हणून विजेचा भार सहन करू शकत नसणाऱ्या तकलादू वायर्स वापरल्यास शॉर्टसर्किट किंवा वायर्स जळून आग लागण्याची व अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवाचे दिवस पावसाळी असतात तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत वायर्स ढिल्या किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच अपघाताची मोठी शक्यता असते.
        गणेशोत्सवाच्या काळात वीजतारा जळणे, शॉर्टसर्किट होणे किंवा वीजव्यवस्थेत बिघाड होणे आदी घटनांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे तक्रार निवारण केंद्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवणे आवश्यक आहे अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १९१२, १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच वीजपुरवठ्यासाठी तात्पुरत्या वीजमीटरची पेटी पाण्यापासून सुरक्षित राहील अशा ठिकाणी ठेवावी. या पेटीच्या देखभालीसाठी एखाद्या स्वयंसेवकाची नियुक्ती करता येईल. सार्वजनिक ठिकाणी देखावे तयार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा या देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
        अनेक सार्वजनिक मंडळे जनरेटर्सचा वापर करतात. परंतु, वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी एकच न्यूट्रल घेतला जातो. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू करण्यात येतो. परंतु, एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा व जनरेटरचे न्यूट्रल हे स्वतंत्र असण्याची काळजी सार्वजनिक मंडळांनी घेणे अत्यावश्यक आहे.
गणपतीला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली जाते. परंतु, यादरम्यान आजूबाजूला असलेल्या उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर, रोहित्रे आदींपासून मिरवणुकीतील वाहने, देखावे सुरक्षित अंतरावर राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. जाणते-अजाणतेपणाने केलेल्या चुका या वीजअपघातांसाठी क्षम्य ठरत नाहीत. कोणत्याही चुकीसाठी वीज क्षमा करीत नाही. त्यामुळे वीजपुरवठा घेताना सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी महावितरणचे अभियंते, जनमित्र आवश्यक तेथे संबंधित गणेश मंडळांना वीजवहन व्यवस्थेसंबंधी व वीजसुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.
-  ज्ञानेश्‍वर आर्दड, 
जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती परिमंडल


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

मुख्य सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर टीका करत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील कार्यपध्दती अनुषंगाने चार न्यायमुर्तींनी घेतलेली भूमिका समर्थनीय असून त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालय ही संस्था असून त्यातील अशा प्रकारामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगत गप्प राहणे पसंद केल्याने त्यांचे मौनच सर्वकाही सांगून जात असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि बार कौन्सील ऑफ इंडियाचे माजी चेअरमन ऍड. डी.व्ही.पाटील यांनी व्यक्त केले.

येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये महिंद्रा अण्ड महिंद्रा या नामांकित कंपनीसाठी मुलाखती होणार आहेत. टेक्निकल अपरेंटिस आणि डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी या मुलाखती होणार असून मुलाखतींसाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांसोबतच सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. त्यामुळे सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रेनिंग अण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. तुषार शेंडे यांनी केले आहे.

पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक, फोर्स मोटर्सचे प्रमुख डॉ.अभय फिरोदिया यांच्या फोर्स मोटर्स तर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट देण्यात आली. हा सोहळा आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रांगणात विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.

सातारा, जकातवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगरस्थान सातारा आणि विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय जकातवाडी वाचनालयाच्या वतीने विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई जयंती कार्यक्रम संपन्न करणेत आला. यावेळी सागर पवार हे प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांचा जन्मदिन हा आपणा सर्वांना प्रेरणादायी स्त्रोत आहे. विवेकानंदांच्या कार्यातून आणि राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारातून नित्य प्रेरणा घेऊन जीवन उन्नत करावयाचे आहे. त्याचप्रमाणे रोज किमान एक तास प्रेरणादायी पुस्तकाचे वाचनासाठी दिला पाहिजे. गावातील विद्यावर्धिनी वाचनालय आणि शाळा हे नक्कीच वाचकांची वाचनाची भूक वाढवेल व पूर्ण करेल. प्रतिमा पूजन मान्यवरांनी केले

सातारा लिक्स बातम्या

.
"देशात आणि राज्यामध्ये चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येवू लागले आहेत. नव्वदच्या दशकात इडियट बॉक्सच्या बंधात अडकलेल्या लोकांना आता आशयघन विषय बघायला पुन्हा एकदा आवडू लागल्यामुळे चित्रपटगृहांपासून दुरावलेला रसिक मायबाप पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आकर्षित होवू लागला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. हे लोण आता जिल्हा व तालुकापातळीवरही उतरले आहे.

.
"सध्या भीमा कोरेगाव या एकच विषयावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. कधी नव्हे अशी जातीय घुसळण आणि धर्मांधता राज्यात दिसून येतेय. या घटनेमुळे राज्यातील सामाजिक भाईचारा कलुषित झाला आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जो-तो आपापल्या पद्धतीने मांडत आहे. त्यामुळे ही लागलेली आग शमण्यापेक्षा ती अधिक तीव्र होत चालली आहे. पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात हा जातीय आगडोंब कसा विझणार? त्यापेक्षा तो अधिक धगधगेल कसा, याकडेच काही माध्यमे आपला टीआरपी वाढविण्यासाठी नको त्या वेळी, नको त्या विषयावर घसरताना दिसून येत आहेत.

.
सातारा जिल्हा हा सैनिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वराज्यासाठी रक्त सांडण्याचा आणि देशेच्या सेवेचा इतिहास इथल्या मातीतला डि.एन.ए आहे. हा जिल्हा शैक्षणिक प्रगतीत नवनवे उच्चांक स्थापित करतो आहे. हा धडपडणारी गुण प्रत्येक क्षेत्रात दिसतो. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. प्राथमिक शिक्षणात ज्या झपाट्याने जिल्ह्याची प्रगती होत आहे. ती उल्लेखनीय अशीच आहे. आता हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विखळे, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, पाटण तालुक्यातील तारळे(मुळी), वाई तालुक्यातील निकमवाडी, जावळी तालुक्यातील ओझरे या जिल्हा परिषद शाळांनी अतिशय चमकदार शैक्षणिक प्रगती केली आहे. मात्र सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलीटरी) जिल्हा परिषद शाळेने मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळ आणि स्पर्धा परीक्षेतही धवल यश संपादन केले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व शाळाही प्रगत शाळा, डिजीटल शाळा आयएसओ मानांकन प्राप्त आहेत.

.
महाबळेश्वरची ओळख थंड हवेच ठिकाण म्हणून १८ व्या शतकापासून झाली... देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचे सह्याद्रीच्या डोंगर रांगातील गिरीवन शहर .... या शहरापासून जवळच असलेल पाचगणी हेही असच सुंदर आणि टुमदार शहर ... अशा या दोन जगप्रसिद्ध शहराच्या मध्ये भिलार हे गाव वसलेल आहे. या गावाची गेल्या काही वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकविणारे गाव म्हणून ओळख झालेली आहे. इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात हे श्रीमंत पिक घेतल जात... दिवसेंदिवस या भागात देशभरातून आणि जगभरातून पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून या गावाला पुस्तकाच गाव म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खुप गडद झाली असून हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत. नेमके हे पुस्तकाचे गाव ही काय संकल्पना हे समजावून घेण्यासाठी या गावाची प्रत्यक्ष भेट घेवून साधलेला हा संवाद ...... !!

.
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याने राज्याला तसेच देशाल दिशा देण्याचे काम केले आहे. राज्य व केंद्र शासन लोकांच्या अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. शासनच्या योजना राबविण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार, धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो, प्राथमिक शिक्षण यासह अनेक योजनांमध्ये सातारा जिल्ह्याचे उल्लेखनीय काम केले आहे. यात जलसंधारण, शिक्षण, स्वच्छतेत जिल्ह्याने विकासाचा नवा आयाम निर्माण केला आहे. यावर टाकलेला थोडक्यात प्रकाश…


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.