गुळवेल (गिलोय)

2017-08-16

गुळवेल (गिलोय)

मुंबई: 
गुळवेल किंवा गुडुची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) ही भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.
गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागात ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-
" पिबेद्वा षट्पलं सर्पिरभयां वा प्रयोजयेत् | त्रिफलायाः कषायं वा गुडूच्या रसमेव वा ||" - (चरकसंहिता )
" पिप्पला मधु संमिक्ष गुडूची स्वरसं पिबेत | जीर्णा ज्वर कफ प्लहिका सारोचक नाशनम्‌ || " -( भैषज्य रत्नावली )
" गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी | संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी || दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्‌ | कामलाकुष्ठवातास्रज्वरकृमिवमीन्हरेत् | प्रमेहश्वासकासार्शःकृच्छ्रहृद्रोगवातनुत् ||" -(भावप्रकाश )
विविध नावे आणि घटक
विविध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या या गुळवेलीची वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेली नावे पुढीलप्रमाणे -
Latin name - Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae , संस्कृत नाव- अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, मधुपर्णी, वत्सादनी, कुण्डलिनी. मराठी नाव- गुळवेल, अमृता. हिंदी नाव- गीलोय, गुडीच English name - Tinospora, वगैरे. गुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गुडची', 'गरोळ' आणि 'गरुड'ही गुळवेलची आणखी काही मराठी नावे आहेत.
गुळवेलीमधील रासायनिक घटक- ग्लुकोसिन, जिलोइन, १.२ टक्के स्टार्च, बर्व्हेरिन, ग्लुकोसाइड, गिलोइमिन, कॅसमेंथीन, पामारिन, रीनात्पेरिन, टिनास्पोरिक उडणशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लिस्टोराल इत्यादी. या वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' हे आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणारे रोगाणू, अन्य विषाणू समूह आणि कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता आहे.
औषधी उपयोग
नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग , प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. हिच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.