गिलोय

2017-08-14

गिलोय

सातारा : गिलोय ही आयुर्वेदातील अतिशय महत्वाची औषधी वनस्पती असून तिला अमृतासमान मानले जाते. आयुर्वेदात तिला गुडुची, अमृता, छिन्नरुहा, चक्रांगी  आदी नावांनीही ओळखले जाते. बहुवर्षायू तसेच अमृतासमान असल्यामुळे तिला अमृता असे म्हटले जाते. गिलोयचे अनेक फायदे आहेत.

इंग्रजीत गिलोयला टीनोस्पोरा कार्डीफोलिया असे म्हटले जाते. ही एक बहुवर्षीय वेल (लता) आहे. हिची पाने खाण्याच्या पानासारखी असतात. आयुर्वेद साहित्यात हिला तापावरील अत्यंत प्रभावशाली (महान) औषधी मानले गेले आहे त्यामुळे तिला जिविंतिका असेही म्हटले जाते. गिलोयची वेल जंगल, शेतातील मेड, पर्वतांवरील दगड यावर सामान्यत: कुंडलाकार स्वरुपात वाढत जाते. लिंब (नीम), आंबा या वृक्षांच्या आसपासही ही आढळून येते. ज्या वृक्षाचा ती आधार घेते, त्याचे गुणही ती अंगिकारते. लिंबावर वाढणारी गिलोय श्रेष्ठ मानली जाते. हीचे खोड लहान बोटासह अंगठ्या एवढ्या जाडीचेही असते. अतिशय जुन्या गिलोयचे खोड दंडाएवढेही मोठे असते. हिचे ठिकठिकाणाहून मुळे निघून खालच्या बाजूला झुलत राहतात. दगड (चट्टान) व शेतातील मेडांमधील गिलोयची मुळे जमीनीत रुजून नवीन वेलांना (गिलोयना) जन्म देतात. 

वेलाच्या खोडावरील वरची साल ही अतिशय पातळ व भुर्‍या किंवा धूसर रंगाची असते. तिला काढल्यावर आतील हिरव्या रंगाचा मांसल भाग नजरेस पडतो. कापल्यावर अंतर्भाग चक्राकार असल्याचे दिसते. पाने हृदयाच्या आकाराची, खाऊच्या पानासारखी एकांतर क्रमाने व्यवस्थित वाढलेली असतात. ती सुमारे २ ते ४ इंच व्यासाची असतात. स्निग्ध असतात तसेच त्यांच्यात ७ ते ८ नाड्या असतात. पर्णदेठ सुमारे १ ते ३ इंच लांब असतो. फुले ग्रीष्म ऋतूत छोट्या छोट्या पिवळ्या गुच्छांच्या स्वरुपात येतात. फळेसुद्धा गुच्छांच्या स्वरुपातच लागतात व ते लहान वाटाण्याच्या (मटर) आकाराचे असतात. पिकल्यावर ते रक्तासारखे लाल होतात. बी शुभ्र, चकचकीत (चिकने), थोडेसे वाकडे तसेच मिरचीच्या दाण्यांसारखे असते. गिलोयचा उपयुक्त भाग म्हणजे तिचे खोड. पानेही उपयुक्त असतात. 

ताज्या खोडाची साल हिरवी तसेच गुदेदार असते. त्याची बाहेरील त्वचा (साल) ही हलक्या भुर्‍या रंगाची तसेच अतिशय पातळ असते व कागदाच्या पानांसारखी सुटते. ठिकठिकाणी वर आलेल्या गाठी दिसून येतात. सुकल्यावर हेच खोड पातळ होते. सुकलेल्या खोडाचे लहान-मोठे तुकडे बाजारात ठेवलेले दिसतात. जे गोलाकार व सुमारे १ इंच व्यासाचे असतात. या खोडांपासून साल सहजपणे वेगळी करता येते. हिचा स्वाद तिखट असतो परंतु, वास काही विशेष असत नाही. याचे परिक्षण करण्याची साधी पद्धत म्हणजे हिच्या काढ्यात (क्वाथमध्ये) थोडेसे आयोडीन मिसळल्यास ते गर्द निळ्या रंगाचे होते. हे तिच्यात स्टार्च असल्याचे निदर्शक आहे. सामान्यपणे हिच्यात भेसळ कमीच होते परंतु, शुद्धतेची खात्री करणे गरजेचे असते. मूळ (कंद) गुडुची व एक असामी प्रजाती हिच्या अन्य जातींच्या औषधी वनस्पती आहेत त थापि त्यांचे गुण वेगवेगळे आहेत. 

वैज्ञानिक वर्गीकरण

जगत : पादप

विभाग : मॅग्नोलियोफाईटा

वर्ग : मॅग्नोलियोप्सीडा

गण : रॅननक्युलालेस

कुळ : मेनिस्पर्मासिएई

वंश : टिनोस्पोरा

जाती : टी. कॉर्डीफोलीआ

द्विपद नांव: टिनोस्पोरा कॉर्डीफोलीआ


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.