सरंजामशाही संज्ञांचे खूळ आतातरी डोक्यातून उतरणार काय ?

2017-08-05

सरंजामशाही संज्ञांचे खूळ आतातरी डोक्यातून उतरणार काय ?

सातारा (संग्राम निकाळजे ) : ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि पुण्यात कृषी आयुक्त पदावर कार्यरत असणारे सुनील केंद्रेकर यांनी पत्रव्यवहार, संचिका आणि मोबाईल मॅसेजमध्ये नावाच्या अगोदर सर, माननीय, साहेब अशा विशेष व सरंजामशाहीला प्रोत्साहन देणार्‍या संज्ञा वापरु नयेत, असे परिपत्रक काढून भारतीय राज्यघटनेचा खर्‍या अर्थाने सन्मान केला आहे. 
शासकीय कार्यालयात किंवा राजकीय वर्तुळामध्ये वरिष्ठांकडून कनिष्ठांना सापत्नभावाची वागणूक देण्यात येते. ते पदोपदी जाणवतेही. वरिष्ठांचा आदर केलाच पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. मात्र, काही वरिष्ठांकडून कनिष्ठांची जाणीवपूर्वक कुचंबणा करण्यासाठी एका विशिष्ठ संज्ञांचा वापर करण्यासाठी आग्रह धरला जातो. हाच पायंडा शासकीय कार्यालयात किंवा राजकीय वर्तुळामध्ये पाडला गेल्यामुळे नामदार, रावसाहेब, भाऊसाहेब, सरकार, श्रीमंत, मॅडम, मॉं साहेब, राणीसाहेब, महाराज, बॉस, सर या सरंजामी संज्ञांचा लोकशाहीमध्ये सर्रास वापर केला जातो. किंबहुना तो वापर करण्यास उद्युक्त केले जाते. त्यामुळे लोकशाही नसून ठोकशाही असल्याचे पदोपदी जाणवते.
काही वर्षांपूर्वी वसईचे शिवसेना पुरस्कृत तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी सातार्‍याचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात सरंजामी वतनांच्या विरोधात खंडकर्‍यांच्या बाजूने राज्यभरात रान उठवले होते. त्यावेळी हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. माजी आमदार विवेक पंडित यांनी खंडकरी शेतकर्‍यांना बरोबर घेवून सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चासुद्धा काढला होता. यावेळी विवेक पंडित यांनी उदयनराजे यांना वारसा हक्काने मिळणारी श्रीमंत व छत्रपती या दोन संज्ञांवर आक्षेप घेवून या संज्ञा उदयनराजेंनी लोकशाहीत वापरु नयेत, याबाबत राष्ट्रपतींशी पत्रव्यवहारसुद्धा केला होता.
 राष्ट्रपती कार्यालयाने व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या पत्रांना केराची टोपली दाखवली, ही गोष्ट वेगळी. विवेक पंडित यांनी उदयनराजेंच्या विरोधात स्टंट करुन घोषणाबाजी करत उदयनराजेंनी विशेष संज्ञा न वापरता आपले नाव उदयन भोसले असे करावे, अशी मागणी केली होती. यामुळे सातार्‍यातील जनता प्रक्षुब्ध झाली होती. सातारा शहराला त्यावेळी पोलीस छावणीचे रुप आले होते. असे असतानाच खासदार उदयनराजे यांनी स्वत:च्या विरोधात निघालेल्या मोर्चामध्ये सामील होत मोर्चेकर्‍यांचे मन जिंकले होते. मला छत्रपती उदयनराजे म्हणा, नुसते उदयनराजे म्हणा, उदयन म्हणा किंवा उद्या म्हणा असे विधान केले होते. उदयनराजेंच्या या पवित्र्यामुळे उपस्थितांनी तोंडात बोटे घातली होती.
खा. उदयनराजे वारसा हक्काने चालत आलेल्या संज्ञांबद्दल किती उदार आहेत, याचे उत्तम उदाहरण खासदार उदयनराजेंनी संपूर्ण महाराष्ट्रात घालून दिले होते. परंतू त्याच्या नेमके उलटे चित्र फलटण आणि राज्यातील इतर घराण्यांबद्दल दिसून येते. याठिकाणी अजूनही सरंजामी संज्ञा लावण्यास लोकांना मजबूर केले जाते. काही दिवसांपूर्वी आम्हीच फलटणच्या राजाला फलटण 'नरेश' ही उपाधी दिली होती. परंतू ती त्यांना फारशी रुचली नसल्याने त्यांनी आमच्यावर आगपाखड केली, ही गोष्ट वेगळी.
भारतीय राज्यघटनेने राजा असो अथवा सामान्य प्रजा असा भेदभाव न ठेवता खालसा झालेल्या संस्थानिकांना आणि सामान्य लोकांनाही सम-समान अधिकार दिले. या देशात कोणीही मोठा नाही आणि छोटाही नाही. असे असताना अनेक संस्थानांकडून नावाच्या अगोदर लागणार्‍या सरंजामशाही संज्ञांसाठी आग्रह धरला जातो. तसा पत्रव्यवहारही केला जातो आणि सार्वजनिक जिवनातही त्याच संज्ञांचा त्यांच्याकडून वापर केला जातो. आजचे युग हे डिजिटल युग आहे. या डिजिटल युगात बॅनर्स, फ्लेक्सची चलती आहे. दादा, बॉस, भाई (भाई हे नाव यांच्यामुळेच खराब झाले) या विशिष्ट प्रवृत्ती दर्शविणार्‍या संज्ञांमुळे लोकांच्याही ज्ञानात भर पडली. ओंगळवाणे चेहरे गोरेपान करुन अनेकांनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे.
केंद्रीय - राज्य मंत्रीमंडळे वशासकीय कार्यालयात शिष्टाचार म्हणून विशिष्ट संज्ञांचा वापर करावा म्हणून राज्यघटनेने मान्यता दिलेली आहे. परंतू या संज्ञा सरंजामशाहीचे प्रतिक असल्याचे दर्शवितात. एखाद्याबद्दल आदराने बोलणे, त्याबाबत आदरार्थी संज्ञा वापरणे हा ज्याचा त्याचा 'विनय' झाला. ज्येष्ठ सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सरंजामी संज्ञांबाबत परिपत्रक काढून एक उत्तम आदर्श राज्यामध्ये घालून दिला आहे. त्यांच्या या 'विद्रोही'  विचारांचे स्वागत  कितीजण करतात ?, हे पाहणे  औत्सुक्याचे ठरणार आहे.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.