स्वाईन फ्ल्यू : एक आरोग्य समस्या

2017-07-25

स्वाईन फ्ल्यू : एक आरोग्य समस्या

            सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये फ्ल्यू चे बाधित रग्ण आढळले, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून योग्य तो उपचार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ए एच1 एन1 या विषाणूची बाधा होवू नये म्हणून काळजी घ्यावी असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी नुकतेच आवाहन केले होते. आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने  यांनी स्वाईन फ्ल्यू बाबत जागृती व्हावी म्हणून हा सविस्तर लेख लिहिला आहे . . .

               

                सन 2009 मध्ये साथ स्वरुपात आलेला इन्फ्ल्यूइंझा ए एच 1 एन 1 विषाणू हा जणू आपल्या वातावरणाचा अविभाज्य भागच झालेला आहे. आपल्या राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत फ्ल्यू रुग्णांचे प्रमाण वाढतांना दिसते. हा एक संसर्गजन्य रोग असून एका संक्रमीत माणसांकडून दुसऱ्या माणसांकडे प्रसारित होतो. डुक्कराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी काहीही संबंध नाही. परंतू डुक्करामध्ये सतत वावरणाऱ्या व्यक्तींस लवकर स्वाईन फ्ल्यूची बाधा होते. आपल्या सातारा जिल्ह्यात या वर्षामध्ये आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने मृत होणाऱ्या व्यक्तींची संख्या 8 इतकी आहे.

                रुग्णांच्या नाकातील व घशातील स्त्राव, थुंकीमार्फत या आजाराचा प्रामुख्याने प्रसार होताना दिसतो. ताप येणे, खोकला येणे, घसादुखणे, घशात खवखव होणे, शिंका येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी,अशक्तपणा, जुलाब होणे, उलट्या होणे इत्यादी या आजाराचे काही महत्वाची लक्षणे आहेत. 5 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्चरक्तदाब किंवा इतर हृदयरोग असणारे व्यक्ती मधुमेह, फुफूस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणारे व्यक्ती चेतासंस्थेचे विकार असणारे व्यक्ती, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास झालेले व्यक्ती, दिर्घकाळ स्टेरॉईड औषधे घेणारे व्यक्ती अशा लोकांना या आजाराची लागण पटकन व तीव्र स्वरुपात होते.

                स्वाईन फ्ल्यूचे निदान प्राथमिक लक्षणांवरआधारित आहे. निदानासाठी रुग्णांच्या घशातील द्रव्य पदार्थाचा नमुना(थ्रोट स्वॉब) प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. हा स्वॉब व्हायरल ट्रॉन्सपोर्ट मेडिया (व्हीटीएम) मध्ये घेतला जातो. या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे  सुविधा उपलब्ध आहे. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष तसेच मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयात उपलब्‍ध आहेत. लवकरात लवकर  म्हणजे लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात उपचार सुरु केल्यास औषधांचा उत्तम गुण येतो. 15 सप्टेंबर 2009 रोजी अमेरिकन एफडीएने स्वाईन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रमाणित केली. ती घेतली की, 10दिवसात शरिरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.

इन्फ्ल्यूइंझा ए एच 1 एन 1 चा अधिशयन कालावधी हा 1 के 7 दिवसांचाआहे. बाधित रुग्णांकडून हा आजारप्रसारित होत असल्याने रुग्णांच्यानिकट सहवासात असणाऱ्या व्यक्तीस हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. बाधित रुग्णांच्या संसर्गजन्य कालावधीत रुग्णाच्या 6 फुटापेक्षा जवळ सहवासात असणाऱ्या व्यक्तीस निकट सहवासीत म्हणावे. ज्या निकट सहवासित व्यक्तीमध्ये इन्फ्ल्यूइंझा सदृश्य लक्षणे आढळतात त्यांना औषधोपचार देणे महत्वाचे आहे. त्यामुळे रुग्णांस विलग ठेवणे (आयसोलेशन) महत्वाचे आहे. हा आजार टाळण्यासाठी आपले हात नेहमी साबण-पाण्याने स्वच्छ धुवावेत, गर्दीमध्ये जाण्याचे शक्यतो टाळावे. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांशी संपर्क येत असताना तोंडावर मास्क लावावा. धुम्रपान करणे शक्यतो टाळावे. योग्य त्याप्रमाणात पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी.

                अशा प्रकारे व्यक्तींना आपले आरोग्य जपावे व स्वाईन फ्ल्यूच्या विळख्यात अडकू नये असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

                                                                                                                                                                -डॉ. दिलीप माने,

                                                                                                                                                                जिल्हा आरोग्य अधिकारी,

                                                                                                                                                                 जिल्हा परिषद, सातारा.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्रा बातम्या

.
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे

.
आजकाल कमी वयातच हृदयाच्या आजाराने मरण पावणाऱ्या व्यक्तीची संख्या समाजात वाढताना दिसत आहे.अचानकच छातीत दुखायला लागून मरणप्राय वेदना देणारा हा आजार खरच अचानकच उद्भवतो का ह्याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.आपल्या शरीरातील पेशी जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते. कोणत्याही कारणामुळे हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा बंद अथवा खंडीत झाल्यास हृदयाच्या पेशी मृतप्राय होवून निर्माण होणाऱ्या छातीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनापूर्ण आजारास हार्ट अटॅक म्हणतात.यामध्ये प्रामुख्याने छातीच्या ठिकाणी दुखणे, कधी डाव्या हाताला दुखणे,कधी मानेच्या डाव्या बाजूला दुखणे,खूप घाम येणे, मळमळणे,धाप लागणे असिडीटी सारखी लक्षणे निर्माण होतात. दि.29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त या आजारा विषयी काही माहिती लेखात थोडक्यात देत आहोत…

.
सातारा: खैराचे झाड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर आढळून येते. भारतात पंजाब, उत्तर-पश्चिम हिमालय, मध्यभारत, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, कोकण, आसाम, ओरिसा, दक्षिण भारत आणि पश्चिम बंगाल येथे खैराची झाडे आहेत. ही झाडे जास्तकरून नदीच्या काठावर येतात. हे झाड बाभळीच्या झाडाप्रमाणे असते. जेव्हा झाडाचे खोड एक फूट जाड होते, तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करून भट्टीत शिजवून त्याचा काढा बनवला जातो. त्यानंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते. यालाच कत्था (कात) म्हटले जाते. काताचे दोन प्रकार आहेत - लाल रंगाचा व दुसरा सफेद रंगाचा. यातील सफेद रंगाचा कात औषधी असतो.

.
मुंबई: तज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचा समावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.

.
मुंबई: हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.