दाऊद... छोटा राजन... आणि 'आर्मस्ट्रॉंग'

2017-07-23

दाऊद... छोटा राजन... आणि 'आर्मस्ट्रॉंग'

वाढलेली पांढरी शुभ्र दाढी... दगदगीने दमलेले शरीर... डोक्यावर घातलेली कानटोपी... एकेक पाऊल संभाळत चाललेले एकेकाळी तोर्‍यात राहिलेला माणूस शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना आव्हान देणारा... निधड्या छातीचा वाघ गलितगात्र, हवालदिल झालेला पाहून काळजात चर्रर झाले. 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधानभवनात माजी उपमुख्यमंत्री व सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असणारे छगन भुजबळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्यानंतर स्वपक्षांबरोबर विरोधी पक्षातील नेतेही हळहळले होते, असे चित्र पहावयास मिळाले. त्यानंतर समाजमाध्यमांमध्ये (सोशल मिडिया) याबाबत  मॅसेज फिरु लागले आणि त्यानंतर डोळ्यासमोर भुजबळांचा भूतकाळ तरळू लागला. 
पांढरा शुभ्र झब्बा-पायजमा, गळ्यात नेहमीप्रमाणे मफलर, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा असे हे रुबाबदार व्यक्तिमत्व विधीमंडळात अथवा राज्यभरात कोठेही गेलेतरी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गलका जमा व्हायचा. परंतू सरकार बदलल्यानंतर घर काय परंतू घराचे वासेही फिरतात, याची अनुभूती सध्या भुजबळांच्याबाबतीत दिसून येत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातील भ्रष्टाचाराचे प्रकरण मनी लॉंडरिंग असे अनेक प्रकरणांमध्ये भुजबळ आज तुरुंगात आहेत. एकेकाळी मुंबई हादरवून सोडणारे हे व्यक्तिमत्व प्रथमपासूनच शरद पवारांचे 'आशिक' होते. 1999 साली शरद पवार स्वाभिमानीच्या लाटेवर आरुढ झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बाळसे देण्याचे काम भुजबळांनी केले. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर भुजबळांनी पवारांनी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले गृहमंत्रीपद देवून पवारांना खर्‍या अर्थाने 'आर्मस्ट्रॉंग' केले होते.
दरम्यान, मुंबईतील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मोठ्या प्रमाणावर यश आले होते. दाऊद इब्राहिम व अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन या मुंबईमधील दोन महत्त्वाच्या गँगचे कंबरडे मोडल्यामुळे 90 च्या दशकामध्ये मुंबईमधील वाढलेली गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यात मुंडेंना काही अंशी यश आले होते. परंतू कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर येताच या दोन्ही टोळ्यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये डोके वर काढले होते. त्याच्यामुळे मुंबईत पुन्हा गँगवॉर भडकतेय का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच १४ सप्टेंबर 2000 रोजी दाऊद इब्राहीमचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील याने पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला हाताशी धरुन अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या जवळ असणार्‍या एकाला फोडून  शकीलचा शार्पशूटर मुन्ना झिंगडा याने बँकॉक येथे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर जिवघेणा हल्ला घडवून आणला होता. 
यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन राजनचा खास रोहित वर्मा व त्याची पत्नी जागीच ठार झाले होती गंभीर जखमी झालेल्या अंडरवर्ल्ड डॉन राजनला तेथील एका हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही घटना भारतीय प्रसारमाध्यमांनी वार्‍यासारखी पोहोचवल्यानंतर मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ व आयबी या सर्व प्रकरणामध्ये या घटनेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतानाच तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेत पोलीस अधिकार्‍यांची बैठक बोलावली. मुंबईत गुन्हे अन्वेषणमधील काही अधिकार्‍यांचे पथक तयार करुन अंडरवर्ल्ड डॉन राजनच्या प्रत्यार्पणासाठी बँकॉकला पाठविण्याची तयारीही पूर्ण झाली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली असल्याने इंटरपोलचे स्थानिक पोलीसही अंडरवर्ल्ड डॉन राजनच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवून होते. 
असे असताना भुजबळांच्या आदेशावरुन मुंबईतील क्राईम ब्रँचचे अधिकारी बँकॉकमध्ये अंडरवर्ल्ड डॉन राजनच्या प्रत्यार्पणासाठी पोहोचले होते. त्यावेळी एअरपोर्टवरच भारतीय गुप्तचर यंत्रणा (रॉ) एजंटनी या अधिकार्‍यांना ताब्यात घेवून चांगलेच खडसावले होते. त्यामुळे ते मुंबई पोलीसांचे पथक तेथून हात हालवत पुन्हा मुंबईमध्ये आले होते. आयबी आणि रॉ च्या गुप्त रिपोर्टनुसार दाऊद इब्राहीम व छोट्या शकीलच्या इशार्‍यावरच छगन भुजबळांनी हे पथक अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या प्रत्यार्पणासाठी बँकॉकला पाठविले होते, हे उघड झाले होते. यानंतर प्रत्यार्पणाचा विषय हा केंद्रीय तपास यंत्रणांकडे येत असल्यामुळे मुंबई पोलीसांनी यामध्ये ढवळाढवळ का केली, याबाबत केंद्रीय गृहविभागाने  मुंबई पोलिसांना कारणे दाखवा  नोटीसही पाठवली होती. हे प्रकरण अंगलट येत आहे की काय, असे वाटत असतानाच भुजबळांनी आपले गॉडफादर शरद पवारांना याबाबत आपणास वाचविण्याची विनंती केली.
 त्यानंतर शरद पवारांनी याबाबत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री तथा उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना याबाबत  हा विषय संपविण्याबाबत विनंती केली. त्यामुळे भुजबळ त्यावेळी वाचले होते. छोटा शकीलच्या इशार्‍यावरुनच भुजबळांनी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या प्रत्यार्पणासंदर्भात घाई केली होती, असे तत्कालीन घटनांवरुन दिसून येते. त्याचवेळी प्रत्यार्पण घडवून आणून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा गॅम करण्याचा प्लॅन डी गँगने आखला होता. मोहरा म्हणून भुजबळांचा वापर मोठ्या खुबीने डी गँगने केला होता. यावेळी डी गँग आणि आयएसआयकडून भुजबळांना कोट्यवधी रुपये मिळाल्याचे अंडरवर्ल्ड वर्तुळातून बोलले जात होते. भुजबळांना अटक होण्याच्या आधी दाऊद इब्राहीमचा खास आणि मुंबईमधील बडा बिल्डर शाहीद बलवा  याचे भुजबळांच्या मुलाशी व पुतण्याशी व्यवसायिक संबंध होते. त्याच संबंधांच्या माध्यमातून 'आर्मस्ट्रॉंग' या कंपनीच्या नावाने हवाला, मनी लॉंडरिंग व इतर उद्योगात छगन भुजबळ व त्यांचे संपूर्ण कुटूंब आकंठ बुडाल्याचे चित्र होते व ते शाश्‍वत सत्य आहे. तपासयंत्रणांनाही या सगळ्या गोष्टी माहित आहेत.
या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर भुजबळांबाबत सोशल मिडियावर फिरत असणारे मॅसेज बघून शिसारी आल्यासरखे झाले. हल्ली सोशल मिडियामुळे रावाचा रंक आणि रंकाचा राव, वाल्मिकीचा वाल्या एका रात्रीत होत असतो. मात्र, भुजबळांसाठी हे सर्व काही  होण्यासाठी काही दशके लागली हे विशेष. केवळ लोकनेते  भुजबळांसाठीच हा सारा प्रपंच.


                                                                                                                                                      -संग्राम निकाळजे 

 


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा लिक्स बातम्या

.
काल सातार्‍यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असे शक्तीप्रदर्शन करुन भाऊबंदकीसह राष्ट्रवादीचे बुरुज सेनापतींच्याच साक्षीने उद्ध्वस्त करुन आगामी लोकसभा चढाईचे मनसुबे जाहीर केले. राष्ट्रवादीत असूनही राष्ट्रवादीचे कधीच न झालेले खा. उदयनराजे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांकडून व पदाधिकार्‍यांकडून वाढदिवसादिवशी दगाफटका होणार आहे, असे माहित असूनही राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांना वाढदिवसाच्या व्यासपीठावर आणून स्थानिक आमदारांसह विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही ‘चेकमेट’ दिला आहे.

.
लोकप्रियता कोणालाही लाभत नाही, हे जेवढे खरे तितकेच ती सहजपणे कोणालाही मिळवता येत नाही हेही सत्य. लोकप्रियता कुशल कार्यकर्तृत्वातून आणि धुरंधर नेतृत्वातून प्राप्त करता येते. आजच्या घडीला अल्पावधीत स्वतःच्या कार्कुशलतेतून प्रचंड लोकप्रियता मिळवणारं भारतातील एक भारदस्त नांव म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

.
छत्रपती शिंवराय यांच्या आभाळाएवढया कार्यकर्तुत्वाचे असलेले दडपण आणि छत्रपती किताबाचे थेट मानकरी असलेले उदयनराजे, यांची प्रत्येक गोष्टीत तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते. कुणीही काळाचा आणि परिस्थितीचा संदर्भ पहात नाही.सोशल मिडीया मध्ये टयुटर, फेसबुक,यु टयुब, वॉटस अप, ई.मेल, स्वतः यातील काहीही न पहाणारे, परंतु सर्वांत जास्त चर्चेत असलेले,व्यक्तीमत्व, म्हणजे उदयनराजे. त्यांच्या एका बाईटने, शब्दाने किंवा अस्तित्वाने, सामाजिक अशांततेचे रुपांतर, शांततेत होते. कोणताही वाद आणि संघर्ष असला तरी त्याचा केंद्रबिंदू उदयनराजे असतात. त्यांच्या विषयी सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांच्या तक्रारी असतात. पण तक्रार असणारे त्यांच्या समोर गेले की, त्या तक्रारीच स्वतःच नाहीश्या होतात.

.
सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी 14 फेब्रुवारी 2000 साली सातारा येथील ब्रिटीशकालीन पोलीस मुख्यालयाच्या पुढ्यात शांततेचे प्रतिक म्हणून पोलीस फायरिंग रेंजवर उडविण्यात येणार्‍या बंदुकींच्या पुंगळ्या वितळवून कबुतराचा पुतळा बसविला होता. गेली 18 वर्षे हा पुतळा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढ्यात दिमाखात उभा होता. सातारा जिल्हा पोलीस ही इमारत हेरिटेज वास्तू म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांनी याठिकाणी बसून पश्‍चिम महाराष्ट्राचा गाडा हाकलेला आहे. अशा ऐतिहासिक वास्तूसमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी हा पुतळा उभा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाबरोबर या कबुतराची नाळ घट्ट झाली होती.

.
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे. सोशल मीडियाच्या या अद्भुत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटुंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.