त्रिपुरा, यूपीसह गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंग

2017-07-17

त्रिपुरा, यूपीसह गुजरातमध्ये क्रॉस व्होटिंग

नवी दिल्ली - देशाच्या 14 व्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात झाली. खासदार आणि आमदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. राष्ट्रपती निवडणुकीत 3 राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंगचे वृत्त आहे. त्यामध्ये त्रिपुरा, यूपी आणि गुजरातचा समावेश आहे.
सुमारे 63% मतांसह कोविंद यांचा विजय निश्चित मानला जातो. 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह 55 खासदारांनी आपापल्या राज्यांत मतदान करण्याची परवानगी घेतली. मतदान सकाळी 10 पासून सायं 5 पर्यंत चालले. मतदान संपताच मतपेट्या विमानाने संसद भवनातील स्ट्राँग रूममध्ये पाठवण्यात आल्या. यांची मोजणी 20 तारखेला होणार आहे.
खासदार- आमदार मतदान केंद्रात स्वत:चा पेन नेऊ शकत नाहीत. ते म्हैसूरला डिझाइन केलेल्या पेनानेच मत देतील. मतदान केंद्राबाहेर उभा कर्मचारी त्यांना हा पेन देईल. गेल्यावेळी हरियाणात राज्यसभेसाठी सुभाष चंद्रांच्या निवडणुकीत चुकीच्या पेनाने मतदान केल्यामुळे अनेक मते रद्द झाल्यावरून वाद उद्भवला होता.
खासदारांसाठी हिरव्या रंगाची मतपत्रिका तर आमदारांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल.
एकूण 32 मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. एक केंद्र संसद भवनात असून राज्य विधानसभांमध्ये एक-एक केंद्र असेल. आयोगाने 33 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. दोन संसद भवनात व उर्वरित एक-एक राज्य विधानसभांमध्ये असेल. 
रामनाथ कोविंद : जवळपास 63%
रालोआ : 48 %, अण्णाद्रमुक, बीजद, टीआरएस, जदयू, वायएसआर काँग्रेस व इनेलोही सोबत. त्यांची मते 15%
मीरा कुमार : 34%
काँग्रेस 15%, तृणमूल काँग्रेस, सप, बसप, राजद, डावे पक्ष, आप, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेससह 18 पक्षांची मोट. त्यांची मते 19%.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

देश विदेश बातम्या

.
काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला.

.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु असताना जवानाच्या पायाला गोळी लागली होती. मात्र जवानाने हार न मानता दोन हात केले आणि विशेष म्हणजे स्वत: आठ किमी अंतर चालत रुग्णालयात पोहोचला. सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानाचा फोटो शेअर केला आहे.

.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

.
पाकिस्‍तानकडून भारतीय नियंत्रण रेषेजवळ होणार्‍या कुरपतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारीही पाकिस्‍तानकडून जम्‍मू काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ पाकिस्‍तानचे एमआय १७ हे हेलिकॉप्‍टर आल्याची घटना बुधवारी घडली.

.
भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.