चिमुकल्यांना उंचीवर चढवण्यात साहस काय? हायकोर्टाचा शेलारांना सवाल

2017-07-17

चिमुकल्यांना उंचीवर चढवण्यात साहस काय? हायकोर्टाचा शेलारांना सवाल

मुंबई:  पाच वर्षाच्या मुलाला उंचीवर चढवणे यात कोणतं साहस आहे? साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय? असे सवाल करत हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. इतकंच नाही तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी यापुढे दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाताना काळजी घ्यावी, असंही हायकोर्टाने सुनावलं.
दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकार म्हणून घोषित करा, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाला विरोध करत, हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
दहीहंडीपर्यंत न्यायालयाने घातलेल्या निर्बंधात बदल न झाल्यास राज्य सरकार अध्यादेश काढेल, असं आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं होतं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि अधिवक्ता यांची गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसंबंधी 6जुलैला बैठक झाली. त्यानंतर शेलार यांनी ही माहिती दिली होती.
दहीहंडी मंडळाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी राज्यशासन विशेष सल्लागार तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी या उत्सवांच्या अटींच्या कायद्यात पालट करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपरिक सण साजरे होण्यासाठी आवश्यक त्या अनुमती द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोऱ्यांच्या निर्बंधांसंबधातील पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. गोविंदांच्या सुरक्षेसाठी काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत, त्याचं लेखी स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून मागवलं आहे.
दहीहंडी उत्सवात 20 फुटांच्या वरती मनोरा लावता येणार नाही, 18 वर्षांखालील गोविंदांना मनोऱ्यात सहभाग घेता येणार नाही, असे निर्बंध सुप्रीम कोर्टाने घातलेले आहेत. त्याविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.


Social Sharing




आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्यासह साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वरकुटे-मलवडी येथील सौर उर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी टोळी जमवून, दहशत माजवून खंडणी मागितल्याप्रकरण व इतर गुन्ह्यांसह कारवाई करण्यात आली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती.आता राष्ट्रवादीच्या नेत्यावर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने राष्ट्रवादी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. तर शेखर गोरे यांच्या चारही साथीदारांना अटक करण्यात आली असून आता शेखर गोरे यांना केव्हा अटक होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अरेरावी व मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यातील रणरागिणींसह महाराष्ट्र सैनिकांनी नुकतेच निसरे फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.

कट्टर हिंदूत्ववादी व शाकाहाराचा पुरस्कार करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सातार्‍यातील कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी चक्क भगवे कारपेट अंथरल्यामुळे कट्टर हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, जेवणासाठी खास मांसाहार विभाग निर्माण करुन भाजपच्या बदलत्या संस्कृतीचे दर्शन सातार्‍यात झाल्याची टीका आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना कार्यकर्ते करु लागले आहेत.

महाराष्ट्र बातम्या

.
‘नोगा’ उत्पादनाच्या मार्केटिंग व विक्रीवर भर द्यावा. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. देशातील 20 महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकावर नोगा उत्पादनाचे विक्री केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

.
दैनंदिन जीवनाच्या ताण-तणावापासून दूर जाण्यासाठी, मनावरील नैराश्याची जळमटं दूर करण्यासाठी लहान मुलांमध्ये मिसळले पाहिजे. निरागसता हा लहान मुलांचा विशेष गुण आहे. भावी आयुष्य निकोपपणे घालवण्यासाठी मुलांनी आयुष्यभर ही निरागसता जोपासली पाहिजे, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केले.

.
पुण्यावरुन सोलापूरला निघालेल्या हुतात्मा एक्सप्रेसवर भिगवण नजीक दरोडा पडला आहे. बोरीवेल गावाजवळ क्रॉसिंगला गाडी पाच मिनिटांसाठी थांबली असता हा प्रकार घडला आहे.

.
गुजरातमधील विकास बघून प्रचारासाठी विषय न उरल्याने काँगेस पक्ष जातींच्या मुद्यावर तर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. मात्र भाजपा केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले.

.
लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलीस व एक झिरो पोलीस या सर्वांना आज सकाळी सांगली जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय युवराज कामटेंसह 5 जणांना बडतर्फ करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.