दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद

2017-07-15

दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद

मुरबाड : माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. 
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते 
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी 2016 मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात 4 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर ऑगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
 दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन 2016 पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बातम्या

.
पोलिसांना अडकविण्यासाठी आरोपीने पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. फिरोज उर्फ चिंधी शाब्बीर खान असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

.
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन. त्याठिकाणी लाखो प्रवासी ये जा करतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण. रविवारी रात्रीसाडे आठ वाजताची वेळ. दोन चिमुकल्या मुलींना एक अज्ञात इसम रेल्वे स्थानकात सोडून जातो. त्यापैकी एकी मुलीचे वय अवघे दोन वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे. सुदैवाने या दोन्ही मुली रेल्वे पोलिसांच्या हाती लागतात. तेव्हा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जाते.

.
विकिपीडियाने आयोजित केलेल्या ‘विकी लव्हस् मोनुमेंटस’ या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेत पी.खरोटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी च्या खंडोबा यात्रेचे छायाचित्र जगातील प्रथम क्रमांकाचे छायाचित्र ठरले आहे. ‘विकी लव्हस मोनुमेंट्स’ या संकल्पनेवर आधारित जगातील वारसा स्थळांचे छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती.

.
गणेश पेठ दूधभट्टीलगतच्या नागझरी नाल्यात एका पंधरा ते सोळा वर्षांच्या मुलासह दोघा पुरुषांचे मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. कचरा गोळा करण्याऱ्या दोन गटातील भांडणावरुन हे तिहेरी हत्याकांड प्रकरण घडल्याचं उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे.

.
आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणे अनिवार्यच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.