मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार : रामदास आठवले

2017-07-15

मागासवसर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करणार : रामदास आठवले

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ करावे, अशी राज्यभरातून मागणी होत आहे. त्यानुसार ते आज सामाजिक न्याय विभागाच्या झालेल्या बैठकीत  मागासवर्गीय महामंडळाचे एकूण 635.99 कोटी कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे कर्ज माफ करावे यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागासवर्गीयांच्या कर्जमाफीचे निवेदन देणार आहोत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिली .
सह्याद्री अतिथी गृह मलबार हिल येथे सामाजिक न्याय मंत्रालयाची विविध विषयांवर बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे तसेच मागासवर्गीय औद्योगिक संस्थांवरील कारवाई स्थगित करण्याबाबत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्यात आज  बैठक झाली. मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे 162, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे 239 कोटी, लिंडकोम 68.79 कोटी, ओबीसी महामंडळाचे 85 कोटी, अपंग विकास महामंडळाचे 37.06 कोटी, आदिवासी विकास महामंडळाचे 32 कोटी असे एकूण 635. 99 कोटी रुपयांचे कर्ज थकबाकी आहे .
मागासवर्गीयांचे सर्व कर्ज शासनाने माफ करावेत यासाठी आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे कर्जमाफ करण्याची मागणी करणार आहोत असे यावेळी ना. रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
तसेच 372  मागासवर्गीय औद्योगिक  संस्थांपैकी 132 संस्थावर  लेखा समितीने  अपहाराचा  ठपका ठेवला असून त्यापैकी 40  संस्थावर गंभीर गुन्हा दाखल आहे . उर्वरित  92 संस्थांवर कारवाई शिथिल करावी त्यांना नव्याने संधी देण्यात यावी असे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा दिवसांपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या झगमगाटात जिल्ह्यात पाऊस सुरू असून, अनेक गावांच्या तलाव आणि बंधाजयात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकजयांत आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र, अधूनमधून व अनेक ठिकाणी सतत पडणाजया पावसामुळे पिकांचे नुकसानही होऊ लागले आहे. लिंब, गोवे परिसरात ढगफुटीने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरणही दिसून येत आहे.

कन्यागत पर्वाची मंगळवारी सांगता झाल्यानंतर कृष्णामाई नदीला तब्बल ७५० मीटर लांबीची साडी नेसविण्यात आलेली होती. ती बुधवारी नदीतून बाहेर काढण्यात आली. नदीतून बाहेर काढलेली साडी ही सैदापूर, प्रीतिसंगम घाट परिसरातील गरीब व स्वच्छता करणाºया गरजू महिलांना दान करण्यात आली.

अंदोरी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा अंदोरी या शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गाचे सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 32 इंची एलसीडी व दोन साऊंड असा एकूण 16 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

सातार्‍यातील सावकारीप्रकरणी महेश तपासे याला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर जप्त केलेल्या त्याच्या घरातील कागदपत्रांचे मूल्य प्राथमिक माहितीनुसार 10 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले असून, आकडेमोड करताना त्यांनाही घाम फुटू लागला आहे. दरम्यान, या घटनेतील इतर पाच संशयितांची नावे तपासात स्पष्ट झाली असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना झाली आहेत.

महाराष्ट्र बातम्या

.
यावर्षीचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने आणि मान्यता ऑनलाईन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची गाळप हंगाम 2017-18 च्या हंगाम नियोजन आणि ऊस गाळप आढावा बैठक पार पडली. या बैठकीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांची उपस्थित होती.

.
मुंबई: मुंबईत भरदिवसा अंधारुन येऊन, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून पावसाचं अजिबात वातावरण नव्हतं. मात्र दुपारी 2 च्या सुमारास अचानक अंधारुन आलं आणि पावसाला सुरुवात झाली.

.
अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी (अंबाबाई) हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या बैठकीत संयुक्तपणे घेण्यात आला.

.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांना घरी बसविल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणे यांनी केली. नारायण राणे साहेब हे जेथे जातील, तेथे आमचा विजय निश्‍चित आहे, असा दावा त्यांनी आज कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना केला. कॉंग्रेसने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आज येथे झालेल्या मेळाव्यात राणे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी राणे पितापुत्रांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

.
स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या नव्या पक्षाची अखेर मोर्चेबांधणी पूर्ण केलीये. घटस्थापनेला म्हणजेच 21 सप्टेंबरच्या मुहूर्तावर नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. 'संवादाकडून संघर्षाकडे' असं संघटनेचं ब्रिदवाक्य असणार असल्याचंही सदाभाऊंनी सांगितलं. तसंच हातकणंगलेतून राजू शेट्टी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.