UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?

2017-07-14

UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?

नवी दिल्ली : यूपीए सरकारला आपल्या शेवटच्याच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करायचं होते, असे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, भागवत यांना हिंदू दहशतवादाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी यूपीए सरकारमधील मंत्री प्रयत्न करत होते.
 पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी समोर आलेल्या या  खळबळजनक वृत्तामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
अजमेर व मालेगाव बॉम्बस्फोटानंतर यूपीए सरकारनं हिंदू दहशतवाद असा मुद्दा उपस्थित केला होता. या अंतर्गत यूपीए सरकारला मोहन भागवत यांना जाळ्यात अडकवायचे होते आणि यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेतील बड्या अधिकार्‍यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. 
टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, तपास अधिकारी व काही वरिष्ठ अधिकारी अजमेर व अन्य काही बॉम्बस्फोटांमधील तथाकथित भूमिकांसाठी मोहन भागवत यांची चौकशी करणार होते. हे अधिकारी यूपीए सरकारमधील मंत्र्यांच्या आदेशावरुन काम करत होते. चौकशीसाठी या अधिकारी मोहन भागवत यांना ताब्यात घेणार होते, अशी माहिती समोर आली आहे.  
फेब्रुवारी 2014 मध्ये कारवां मॅगझिनमध्ये संशयित दहशतवादी स्वामी असिमानंद यांची मुलाखत छापण्यात आली होती. यात मोहन भागवत यांना कथित स्वरुपात हल्ल्यासाठी प्रमुख प्रेरणा असे म्हणण्यात आले होते. यानंतर यूपीए सरकारनं राष्ट्रीय तपास यंत्रणांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली, मात्र तपास यंत्रणांचे प्रमुख शरद कुमार यांनी यास नकार दिला. मुलाखतीच्या या टेपचा ते फॉरेन्सिक तपास करणार होते, मात्र जेव्हा ही बाब पुढे वाढली नाही तेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हे प्रकरण बंद केले.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

देश विदेश बातम्या

.
काश्‍मीरमध्ये घुसण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी तयारीत असल्याचा दावा श्रीनगरमधील चिनार तुकडीचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज केला.

.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 208 कोब्रा बटालियनच्या एका जवानाने पायाला गोळी लागली असतानाही नक्षलवाद्यांशी दोन हात करत आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं आहे. नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु असताना जवानाच्या पायाला गोळी लागली होती. मात्र जवानाने हार न मानता दोन हात केले आणि विशेष म्हणजे स्वत: आठ किमी अंतर चालत रुग्णालयात पोहोचला. सीआरपीएफने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जवानाचा फोटो शेअर केला आहे.

.
सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

.
पाकिस्‍तानकडून भारतीय नियंत्रण रेषेजवळ होणार्‍या कुरपतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारीही पाकिस्‍तानकडून जम्‍मू काश्मीरमधील पूंछ येथे नियंत्रण रेषेजवळ पाकिस्‍तानचे एमआय १७ हे हेलिकॉप्‍टर आल्याची घटना बुधवारी घडली.

.
भारतीय हवाई दलाची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने MiG-21 लढाऊ विमान उडवत गगनभरारी घेतली आहे. यासोबतच अवनी चतुर्वेदीने इतिहासात आपल्या नावाची नोंद करत एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. 19 फेब्रुवारीला सकाळी अवनी चतुर्वेदीने गुजरातमधील जामनगर एअरबेसवरुन उड्डाण घेतलं आणि यशस्वीपणे मिशन पूर्ण केलं. अवनी चतुर्वेदी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.