सातारा बॉक्सिंग अकॅडमीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला- सुहास पाटील

2017-07-14

सातारा बॉक्सिंग अकॅडमीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला- सुहास पाटील

सातारा- गेल्या दोन तीन वर्षात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये सातारा जिल्ह्याचे नाव सातत्याने झळकत आहे. सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध वजन आणि वयोगटात उज्वल यश मिळवले असून नुकत्याच झालेल्या ज्युनियर महाराष्ट्र अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकॅडमीने पाच पदकांची कमाई करुन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला, असे गौरवोद्गार जिल्हा क्रीडाअधिकारी सुहास पाटील यांनी काढले. 

चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत विविध वजनगटात सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या स्वप्नील साळवी याने सुवर्णपदक, कुणाल माने व ओंकार कदम यांनी रौप्यपदक तर, मुकुल शिंदे आणि श्रीधर फरांदे यांनी कांस्पपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या स्वप्निल साळवी याची गुवाहाटी (आसाम) येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी सुहास पाटील बोलत होते. यावेळी अकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, रविंद्र होले, अमर मोकाशी, जगन्नाथ जगताप, सौ. पुष्पलता जगताप आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीद्वारे गुणवत्ताधारक खेळाडू तयार होत असून बॉक्सिंग खेळाचा प्रसार होण्यासाठी आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्‍वासन क्रीडा अधिकारी पाटील यांनी यावेळी दिले. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रमांचा लाभ खेळाडूंना झाला पाहिजे. यासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंनीही सकारात्मक प्रयत्न करुन उज्वल यश संपादन करावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. 

यशस्वी खेळाडूंचे दौलत भोसले, विजय मोहिते, विश्‍वास मोरे, निलेश यादव, मोहन पांडे, दिपक कदम, जितेंद्र भोसले, सौ. सुजाता भोसले, सहा. पोलीस निरीक्षक भूषण आडके, सौ. तन्वी जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, राजेंद्र हेंद्रे. रविंद्र झुटींग आदी मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा : कामगार युनियनच्या फोडाफोडीचा प्रयत्न ज्यांनी केला ते कोणीही कामगार नसून त्यांना सभेत आपले म्हणणे मांडा, असे सांगण्यात आले होते. परंतु, त्यापैकी कोणीही बैठकीला उपस्थित राहिले नाही. व कामागारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे कितीही झाले तरी कामगार संघटना अभेद्यच आहे. उलट संघटनेत फूट पाडणार्‍यांनाच अपमानित होण्याची वेळ आली, असे प्रतिपादन कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ऍड. धैर्यशील पाटील यांनी केले.

जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानेही राष्ट्रवादीचे खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र सातारा पोलिस त्यांना अटक करण्यासाठी पुढाकार घेतील का ? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे.

न्हाळेवाडी (ता.सातारा) येथे अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन मनसेचे राज्य उपाध्यक्ष व दिव्यदत्त दिगंबर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप मोझर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

सातारा: जमिनीच्या कारणावरुन सुरु असलेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पिकाची नासधुस केल्याची तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयीन स्थगिती आदेश धुडकावून पाचवड (ता.वाई) येथील नितीन पांडुरंग गायकवाड व अन्य सात जणांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सचिन व संतोष शिवाजी हगवणे (रा. अमृतवाडी, ता. वाई) यांनी केला आहे.

क्रीडा बातम्या

.
महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इंग्लंड आणि भारताचा महिला संघ एकमेकांशी या महामुकाबल्यात भिडणार आहे. पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवण्यासाठी कर्णधार मिताली राजच्या संघाने कंबर कसली आहे.

.
मुंबई: कर्णधार मिताली राजची वार्षिक कमाई जवळजवळ 5.5 कोटी आहे. तरीही तिचं राहणीमान फारच साधं आहे. आजही ती आपल्या जुन्या घरातच राहते.


.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबई नगरी परिघाच्या बाहेर जसजशी वाढू लागली, तसतशी पोटापाण्यासाठी राज्यासह देशभरातून विस्थापितांचे लोंढे मुंबई नगरीमध्ये धडकू लागले. दादर, परळ, भोईवाडा, चेंम्बुर, घाटकोपर या उपनगरांमध्ये मिळेल त्या जागेमध्ये फाटक्या आभाळाखाली, फाटक्या चिंध्यांची पाले बांधून जगण्यासाठी हातातोंडाच्या लढाईसाठी हे विस्थापित जगू लागले.

.
हैदराबाद: अखेरचे षटक... पुण्याला जिंकण्यासाठी ११ धावांची आवश्यकता! पुणे जिंकणार अशी अटकळ; पण मिचेल जॉन्सनने आपला सारा अनुभव पणाला लावत दोन गडी बाद करत मुंबई इंडियन्सला आयपीएल जेतेपद पटकावून दिले. हैदराबादेतील राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंटवर एका धावेने मात करत तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपदावर नाव कोरले.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.