अशक्य ते शक्य करण्याची मोदींची क्षमता : सरसंघचालक

2017-07-12

अशक्य ते शक्य करण्याची मोदींची क्षमता : सरसंघचालक

नवी दिल्ली : कुठलेही अशक्य काम शक्य करून दाखविण्याची अफाट क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे. आतापर्यंत मोदींनी कितीतरी अशक्यप्राय वाटणारी कामे प्रत्यक्षात करून दाखविली आहेत. मात्र, सरकारला अद्यापही खूप काम करायचे बाकी आहे. पण सर्वच कामे सरकार करू शकत नाही, त्यामुळे समाजातील सर्वांनीच अशा कामात आपले योगदान दिले पाहिजे, कारण आपल्याला देशाला त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचे आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले.
सुलभ इंटरनॅशनलचे डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनचरित्रावर तयार केलेल्या कॉफीटेबलबुकचे लोकार्पण करताना डॉ. भागवत बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष बलदेव शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राजधानीतील मावळणकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा गौरव करताना डॉ. पुळे भागवत म्हणाले की, मोदींचे नेतृत्व आज देशातील जनतेच्या आशेचे किरण बनले आहे. काही जण अहंकाराने काम करतात, तर काही जण भीतीने. काही जणांना मजबुरीने काम करावे लागते. पण लोकांबद्दल ज्याच्या मानत आपुलकी आहे, त्यालाच लोक स्वीकारतात. मोदी आज असेच भक्तीने आणि आपुलकीने काम करीत आहेत.
मोदी आज प्रसिद्धीच्या झोतात राहूनही काम करीत आहेत, या प्रसिद्धीचा कोणताही परिणाम त्यांच्यावर होत नाही, कारण गुजरातचे मुख्यमंत्री बनण्यापूर्वी ते संघाचे प्रचारक होते. त्यामुळेच ते आधी जसे काम करायचे तसेच आताही करीत आहेत, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, आज मोदी पंतप्रधान आहेत, कारण त्यांना लोकांसाठी काम करायचे आहे. पण उद्या ज्यांना कामे करायची आहेत, पण तो पंतप्रधान बनू शकला नाही तर काय करायचे. त्यामुळे ज्यांना लोकांसाठी काम करायचे, त्यांना कोणत्याही पदाची गरज नाही.
मात्र, आज समाजात नवा पायंडा पडला आहे. लोकांना आपल्यासाठी काम करणारा दुसरा कोणीतरी हवा असतो, आणि मोदींच्या रूपात तसा ठेकेदार लोकांना मिळाला आहे, असे स्पष्ट करत डॉ. भागवत म्हणाले की, आपली जबाबदारी दुसर्यावर ढकलण्याची सवय लोकांना लागली आहे.
कर्तृत्ववान लोकांचेच जीवनचरित्र लिहिले जाते, कारण अशा जीवनचरित्रातून लोकांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत असते. पण त्यासाठी ते जीवनचरित्र नीट वाचावे लागते, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, मोदी यांचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान हा प्रवास खरोखरच समजून घेण्यासारखा आहे. चरित्र लिहिणे सोपे आहे, पण चरित्र समजून लिहिणे कठीण आहे. असे जीवनचरित्र शब्दश: नाही तर त्याचा मतितार्थही वाचता आला पाहिजे.
भाजपाचे राष्ट्रीय अमित शाह यांनी आपल्या भाषणात मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा आढावा घेताना मोदी सरकारच्या तीन वर्षांची उपलब्धीही सांगितली. मोदी यांचा बालक ते पंतप्रधान व्हाया संघ प्रचारक हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे शाह यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण हा आमच्या कामाचा आधार आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत देशात नुसत्याच गोष्टी केल्या गेल्या, पण विकासाचे काम फक्त मोदींच्या कार्यकाळातच झाले, असे ते म्हणाले. पुस्तकाच्या शीर्षकातील लिजेंड या शब्दाला आपला आक्षेप आहे, असे स्पष्ट करत शाह म्हणाले की, मोदी यांचे जीवन अतिशय गरिबीत आणि कष्टात गेले. प्रारंभी डॉ. बिंदेश्‍वर पाठक यांनी मोदी यांच्यावरील कॉफीटबेलबुकमागची पार्श्‍वभूमी विषद केली. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष बलदेव शर्मा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पंतप्रधान मोदींच्या कार्याचा गौरव केला.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

येथील श्री नटराज मंदीराच्या महारुद्र, महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवात पुणे येथील नृत्यांजली नृत्यसंस्थेच्या गुरु डॉ.वसुंधरा श्रीधरन यांच्या 14 कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याचे बहारदार सादरीकरण करत महोत्सवात सातवा दिवस संपन्न केला.

जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु आहे. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, 28 तासाहून अधिक काळानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरुच आहे. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतू एका निर्दोषाला शिक्षा होवू नये, असा आपला कायदा सांगतो. कायद्याने वागा, कायद्याने चाला असा संदेश आपल्या लोकशाहीने सामान्यजनांना दिलेला आहे. मात्र, काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी कायद्याचा कसा दुरुपयोग करतात, याचे उत्तम उदाहरण सध्या फलटण तालुक्यात बघावयास मिळत आहे. ज्याच्यावर खरोखरच अन्याय-अत्याचार झाला आहे, त्याला फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागते. परंतू गुंडापुंडांच्या व राजकीय व्यक्तींच्या खोट्या तक्रारींसाठी मात्र फलटण शहर पोलिसांकडून पायघड्या घातल्या जातात.

वावरहिरे, ता. माण येथील एका मोबाईल दुकान चालकास जुना राग मनात धरुन तेथील 16 जणांनी घरी जावून बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यास आलेल्या त्या युवकाच्या वयोवृद्ध आजीसह कुटूंबियांसही बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे.

देश विदेश बातम्या

.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवरील कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात अनेकदा भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कारवाई केली असून, यामधील काही कारवाया 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होत्या. मात्र सध्या भारतीय लष्कर कोणताही गवगवा न करता अत्यंत शांतपणे सीमेपार जात सर्जिकल स्ट्राईक करत आहे. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान नियंत्रण रेषेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र ही कारवाई नियंत्रण रेषा पार करुन करण्यात आल्याचंच जगभरातून सांगण्यात येत होतं.

.
सीमारेषेवर वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानं काश्मीर खो-यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) सकाळी बारामुल्ला परिसरातील पट्टन भागात जवानांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

.
पाकिस्तान नव्या अणुबॉम्मची निर्मिती करत असून त्याचा सर्वाधिक धोका भारताला असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने दिला आहे. भारत व पाकिस्तान दरम्यानचे संबंधही भविष्यात तणावाचे राहाणार असल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. पाकिस्तान भारतावर मोठा अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एका शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात १७ शाळकरी विद्यार्थी ठार झाले असून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार करणार्‍या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

.
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूत खुद्द लष्कर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम सुरु आहे. लष्करी जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत आणखी 5 जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते. शनिवारी रात्रीच लष्कर प्रमुख बीपीन रावत घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, 28 तासाहून अधिक काळानंतर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरुच आहे. याप्रकरणी बीपीने रावत यांनी रविवारी खास बैठक बोलवली असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.