आयुर्वेदिक उत्पादनांवर १२% GST, पतंजली नाराज

2017-05-23

आयुर्वेदिक उत्पादनांवर १२% GST, पतंजली नाराज

नवी दिल्ली: आयुर्वेदिक उत्पादनांवर लावण्यात आलेल्या १२ टक्के जीएसटीबाबत योग गुरू रामदेव यांच्या पतंजली कंपनीने नाराजी व्यक्त केली असून जीएसटी दराच्या या निर्णयाबाबत सरकारने पुर्नविचार करावा, यासाठी पत्र लिहिणार असल्याचे कंपनीच्यावतीने पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाला यांनी म्हटले आहे. सध्या आयुर्वेदिक उत्पादनांवर ५ टक्के कर लागत होता. या उत्पादनांवरील कर वाढविल्यास चांगले आरोग्य वा चांगल्या जीवनाशिवाय चांगले म्हणजेच 'अच्छे दिन' येणार नाहीत, असेही ते म्हणाले.
टुथपेस्ट, शॅम्पूपासून ते बिस्किटांपर्यंत आयुर्वेदावर आधारित उत्पादने बनविणाऱ्या पतंजली या कंपनीने स्वतःचे 'स्वदेशी कंपनी' असे ब्रॅण्डिंग करत नफ्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांना योग्य दरात आरोग्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमुळे उत्पादनांच्या किमतीवर होणाऱ्या परिणाम पाहता किमतींबाबत शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही 'इनपूट क्रेडिट अॅडजस्टमेण्ट'चा विचार करू, असेही पतंजलीने म्हटले आहे.
सध्या कंपनीच्या टुथपेस्ट आणि हेअर ऑइल या उत्पादनांचा मार्केट शेअर अनुक्रमे ९ व ८ टक्के असा आहे. मागील आर्थिक वर्षात १०,५६१ कोटींचा महसूल प्राप्त करत ग्राहक उत्पादन कंपनी म्हणून पतंजली हिंदुस्थान युनिलिव्हरनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर कोलगेट पामोलिव्ह, GSK कंज्युमर हेल्थकेअर, पी अॅण्ड जी हायजीन अॅण्ड हेल्थकेअर या कंपन्यांनाही तिने मागे टाकले होते. आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये पतंजलिला मिळालेले यश पाहिल्यानंतर इतर ग्राहक उत्पादन कंपन्यांनीदेखील आपल्या उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश केला. GST दरामुळे आयुर्वेदिक उत्पादनांच्या वाढणाऱ्या किमतींमुळे डाबर आणि इमामी या कंपन्याही निराश झाल्या आहेत. सरकार एकिकडे पारंपरिक भारतीय पर्यायी चिकित्सा व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असताना दुसरीकडे आयुर्वेदिक उत्पादनांवरील कर वाढवित असेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसेल, असे डाबर इंडिया कंपनीचे सीएफओ ललित मलिक यांनी म्हटले आहे.


Social Sharing
आपली प्रतिक्रिया
प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या

सातारा : कामगार युनियनच्या फोडाफोडीचा प्रयत्न ज्यांनी केला ते कोणीही कामगार नसून त्यांना सभेत आपले म्हणणे मांडा, असे सांगण्यात आले होते. परंतु, त्यापैकी कोणीही बैठकीला उपस्थित राहिले नाही. व कामागारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे कितीही झाले तरी कामगार संघटना अभेद्यच आहे. उलट संघटनेत फूट पाडणार्‍यांनाच अपमानित होण्याची वेळ आली, असे प्रतिपादन कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ऍड. धैर्यशील पाटील यांनी केले.

जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानेही राष्ट्रवादीचे खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र सातारा पोलिस त्यांना अटक करण्यासाठी पुढाकार घेतील का ? याबाबत शंका उपस्थितीत केली जात आहे.

न्हाळेवाडी (ता.सातारा) येथे अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन मनसेचे राज्य उपाध्यक्ष व दिव्यदत्त दिगंबर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप मोझर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

सातारा: जमिनीच्या कारणावरुन सुरु असलेल्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन पिकाची नासधुस केल्याची तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयीन स्थगिती आदेश धुडकावून पाचवड (ता.वाई) येथील नितीन पांडुरंग गायकवाड व अन्य सात जणांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सचिन व संतोष शिवाजी हगवणे (रा. अमृतवाडी, ता. वाई) यांनी केला आहे.

देश विदेश बातम्या

.
अमेरिकेनं दिलेल्या एका अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख ‘आझाद कश्मीर’ असा करण्यात आला आहे, ज्याचा भारतानं कडाडून निषेध केला आहे. १९ जुलै रोजी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं एक अहवाल सादर केला आहे. ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेरिरिझम’ असं या अहवालाचं नाव आहे. याच अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

.
मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना ऑपरेशन टेबलवर रुग्ण चक्क गिटार वाजवत होता. ही घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरुच्या भगवान महावीर जैन हॉस्पिटलमधील आहे.

.
नवी दिल्ली - राज्यसभा सभापति हमीद अंसारी यांनी बहुमजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी मंजूर केला आहे.

.
नवी दिल्ली: संपूर्ण भारत देशासह जगभराचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. कोविंद यांना ६५.३५% मते मिळाली तर विरोधी उमेदवार मिराकुमार यांना ३४.३५% मते मिळाली.

.
देशाचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार हे आज स्पष्ट होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल. संसद भवनाच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर यूपीएकड़ून मीरा कुमार रिंगणात आहेत.


Careers

Advertise with us

Privacy policy
Copyright     TODAY MEDIA NETWORK ,  All rights reserved.